हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. या दिवशी श्रीराम भक्त हनुमान यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. तसेच पौर्णिमेनिमित्त भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळविण्यासाठी या दिवशी उपवास केला जातो. सौभाग्यप्राप्तीसाठी लक्ष्मी मातेचीदेखील पूजा केली जाते. यासाठी काही खास उपाय केल्यास खूप फायदा होईल. हे उपाय केल्यास धन आणि सौभाग्य वाढण्यास फायदा होऊ शकतो. या उपायांबद्दल जाणून घेऊया.
चंद्रोदय वेळ - १६ एप्रिल, शनिवार, ०६ वाजून २७ मिनिटे
या दिवशी पूजेबरोबरच पुढील उपाय करा-
>>देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी चैत्र पौर्णिमेला लक्ष्मी स्तोत्राचे पठण करा. यासोबतच संध्याकाळी दिव्याचे दान करणे शुभ राहील.
>>चैत्र पौर्णिमेला चंद्रदेवतेची पूजा करण्याचा नियम आहे. या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी एका भांड्यात पाणी, दूध आणि थोडे तांदूळ एकत्र करून चंद्राला अर्घ्य द्यावे. त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील.
>>जर पती-पत्नीमध्ये काही वाद झाला तर पौर्णिमेच्या वेळी दोघे मिळून चंद्रदेवाला अर्घ्य देतात. यामुळे वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल.
>>कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी लक्ष्मी पूजेसह कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. यानंतर मातेचा आशीर्वाद घेऊन लाल कपड्यात गोवऱ्या बांधून तिजोरीत किंवा कपाटात ठेवाव्यात.
>>धन आणि अन्न वाढीसाठी देवीच्या मंदिरात जाऊन नारळ अर्पण करावा. नारळ हे लक्ष्मीचे रूप असल्याचे मानले जाते. म्हणून त्याला आपण श्रीफळ असे म्हणतो. श्री म्हणजे लक्ष्मी. नारळ अर्पण केल्यानेदेखील लक्ष्मी माता प्रसन्न होते.
>>याशिवाय पौर्णिमेच्या निमित्ताने गोर गरिबांना यथाशक्ती दान, गोमातेची पूजा, मूक प्राणी पक्ष्यांना दाणा पाणी ठेवा, त्यायोगेही भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचा वरद हस्त प्राप्त होईल.