शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

Chaitra Purnima 2023: चैत्र पौर्णिमेची रात्र आहे खास, 'या'उपायांनी लक्ष्मी माता करेल धन वैभवाची बरसात!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2023 1:49 PM

Chaitra Purnima Astro Tips: पौर्णिमा ही लक्ष्मी मातेची आवडती तिथी, या तिथीवर ज्योतिष शास्त्राने दिलेले उपाय केले असता तुमची आर्थिक परिस्थिती बदलू शकते!

यंदा ६ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमा आहे. पौर्णिमेच्या तिथीला लक्ष्मीपूजा केली असता आपली आर्थिक स्थिती पालटते असा भाविकांचा अनुभव आहे. यासाठी ज्योतिष शास्त्राने काही तोडगे दिले आहेत, ते जाणून घेऊ. या दिवशी गंगा स्नान तसेच उपयुक्त वस्तूंचे दान केल्याने मनुष्याची सर्व पापांपासून मुक्तता होते आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. 

हिंदू धर्मग्रंथांमध्ये प्रत्येक तिथीचे वेगळे महत्त्व आहे. पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दानासह माता लक्ष्मीची पूजा केली जाते. चैत्र पौर्णिमा ही हिंदू नववर्षाची पहिली पौर्णिमा आहे. या दिवशी माता लक्ष्मीसह भगवान श्री हरीची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात पैशाची कमतरता येत नाही. या दिवशी केलेले काही ज्योतिषी उपाय माणसाचे भाग्य उजळण्यास मदत करतात. चला जाणून घेऊया अशाच काही उपायांबद्दल, ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक अडचणी दूर होतात. 

चैत्र पौर्णिमा तिथि २०२३

हिंदू कॅलेंडरनुसार, यंदा चैत्र पौर्णिमा ५ एप्रिल रोजी सकाळी ०९. १८ मिनिटांनी सुरू होत आहे आणि ही तिथी ६ एप्रिलचा सूर्योदय पाहणार असून रोजी सकाळी १०.०३ मिनिटांनी समाप्त होईल. कोणतीही तिथी ज्या दिवशीचा सूर्योदय पाहते त्या तिथीची तारीख ग्राह्य धरली जाते. त्यानुसार ६ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेचे व्रत केले जाईल. यादिवशी देशभरात हनुमान जन्मोत्सवही साजरा केला जातो. या दिवशी केलेले उपाय विशेष फळ देतात. 

चैत्र महिन्यातील पौर्णिमेला पुढील उपाय करा: 

>>ज्योतिष शास्त्रानुसार चैत्र महिन्यातील पौर्णिमा देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी खूप खास असते. या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्यानंतर पिंपळाच्या झाडाला कच्चे दूध आणि गंगाजल अर्पण करावे. यामुळे व्यक्तीला पितृदोषापासून मुक्ती मिळते.

>>याशिवाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी गरजूंना सूर्यास्तापूर्वी अन्नदान करा आणि शक्य असल्यास यथाशक्ती आर्थिक मदत करा. तसे केल्याने लक्ष्मी कृपा प्राप्त होते. 

>>चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेला पांढरी मिठाई, बत्तासे किंवा तांदुळाची खीर अर्पण केल्यास लाभ होतो. यासोबत या दिवशी कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. हा उपाय केल्याने घरातील संपत्ती कधीही कमी होत नाही, उलट वाढतच जाते आणि देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते.

>>या दिवशी चंद्रदेवाची पूजा करताना कच्च्या दुधात तांदूळ मिसळून चंद्रदेवाला अर्पण केल्यानेही कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते. यासोबतच धनाच्या देवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो. यासोबतच या दिवशी 'ओम श्रं श्रीं श्रं स: चंद्रमसे नमः' किंवा 'ओम ऐं क्लीं सोमया नमः' या मंत्राचा जप केल्यास लाभ होतो.

>>याच दिवशी हनुमान जन्मोत्सव असल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्याबरोबर हनुमंताच्या पूजेलाही विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. या दिवशी हनुमानजीची विधिवत पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होते असे म्हणतात.

टॅग्स :Hanuman Jayantiहनुमान जयंती