Chaitra Sankashti Chaturthi April 2023: मराठी नववर्षाला सुरुवात झाली आहे. वर्षभर सण-उत्सवांची रेलचेल असणार आहे. त्यासोबतच अनेक अद्भूत शुभ योगही जुळून येणार आहेत. प्रथमेश असलेल्या बुद्धिदाता, सुखकर्ता गणपती बाप्पाची कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षात चतुर्थीचे व्रत केले जाते. पैकी वद्य पक्षातील संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च मानले जाते. यंदा ०९ एप्रिल २०२३ रोजी चैत्र महिन्यातील संकष्ट चतुर्थी आहे. कोट्यवधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. मात्र, चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये, असे म्हटले जाते. यामागील कारण आणि देशभरातील प्रमुख शहरांमधील चंद्रोदयाची वेळ जाणून घेऊया... (Chaitra Sankashti Chaturthi April 2023 Moonrise Timings)
चैत्र संकष्ट चतुर्थी: ‘या’ शुभ योगात करा बाप्पाची पूजा; चिंतामणी चिंतामुक्त करेल!
चैत्र संकष्ट चतुर्थी: रविवार, ०९ एप्रिल २०२३
चैत्र वद्य चतुर्थी प्रारंभ: रविवार, ०९ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ०९ वाजून ३५ मिनिटे.
चैत्र वद्य चतुर्थी समाप्ती: सोमवार, १० एप्रिल २०२३ रोजी सकाळी ०८ वाजून ३७ मिनिटे.
बाप्पाच्या पूजनाची शुभ वेळ: ०९ एप्रिल रोजी सकाळी ०९ वाजून ३५ मिनिटांपासून ते १० वाजून ४८ मिनिटांपर्यंत.
अमृत योगातील पूजनाची वेळ: ०९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजून ४८ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून २२ मिनिटांपर्यंत.
भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा आहे. संकष्ट चतुर्थी व्रत प्रदोष काळी केले जाते. तसेच यामध्ये चंद्रोदय आणि चंद्रदर्शन महत्त्वाचे असल्यामुळे चैत्र महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण आणि पूजन रविवार, ०९ एप्रिल २०२३ रोजी करावे, असे म्हटले जाते.
हिंदू नववर्षातील पहिली संकष्टी; पाळा 'हे' चार नियम वर्ष जाईल आनंदी!
प्रत्येक संकष्ट चतुर्थीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. अनेकांना प्रश्न पडतो की, अनेकदा सूर्यास्तानंतरही काही वेळ तृतीया असते. तर या दिवशी संकष्टी का? उपास तर तृतीयेमध्ये होते. तरीही संकष्ट चतुर्थी त्याच दिवशी करायची असते. कारण संकष्ट चतुर्थीचे व्रत प्रदोष काळी करावयाचे व्रत आहे. हे व्रत चतुर्थी प्रधान आहे. याबाबत पुराणात एक कथा आहे.
संकष्टीला तुझे दर्शन घेतल्याखेरीज कोणी उपवास सोडणार नाही
गणेशाचे जे स्वरूप आहे ते चंद्राला नीट कळले नाही. चंद्राने गणेशाची टवाळी केली. त्यावर गणपतीने त्याला शाप दिला. तुझे तोंड कोणी पाहणार नाही. हा शाप देण्यामागचे कारण एवढेच होते, की कोणीही कोणाच्या व्यंगावर हसू नये आणि कोणाला कमी लेखू नये. चंद्राला त्याच्या चुकीची जाणीव झाली. गणपतीने त्याला क्षमा करत उ:शाप दिला, की गणेश चतुर्थीला तुझे दर्शन कोणी घेणार नाही पण संकष्टीला तुझे दर्शन घेतल्याखेरीज कोणी उपवास सोडणार नाही. गणेशाने दिलेल्या शब्दाचे पालन सर्व भक्त करतात. चतुर्थीला चंद्रदर्शन घेऊन उपवास सोडतात. काही जण एकादशीप्रमाणे दोन्ही वेळ उपवास करतात. परंतु संकष्टीच्या व्रतात दोन्ही वेळचा उपवास अपेक्षित नाही. म्हणून चंद्रदर्शन झाल्यावर काहीच नाही, तर निदान भात खाऊन उपवास सोडावा, असे सांगितले जाते.
देशातील काही प्रमुख शहरांतील चंद्रोदय वेळ
शहरांची नावे | चंद्रोदयाची वेळ |
मुंबई | रात्रौ ०९ वाजून ५६ मिनिटे |
ठाणे | रात्रौ ०९ वाजून ५६ मिनिटे |
पुणे | रात्रौ ०९ वाजून ५१ मिनिटे |
रत्नागिरी | रात्रौ ०९ वाजून ५१ मिनिटे |
कोल्हापूर | रात्रौ ०९ वाजून ४६ मिनिटे |
सातारा | रात्रौ ०९ वाजून ४९ मिनिटे |
नाशिक | रात्रौ ०९ वाजून ५४ मिनिटे |
अहमदनगर | रात्रौ ०९ वाजून ४९ मिनिटे |
धुळे | रात्रौ ०९ वाजून ५२ मिनिटे |
जळगाव | रात्रौ ०९ वाजून ४९ मिनिटे |
वर्धा | रात्रौ ०९ वाजून ३६ मिनिटे |
यवतमाळ | रात्रौ ०९ वाजून ३७ मिनिटे |
बीड | रात्रौ ०९ वाजून ४४ मिनिटे |
सांगली | रात्रौ ०९ वाजून ४५ मिनिटे |
सावंतवाडी | रात्रौ ०९ वाजून ४६ मिनिटे |
सोलापूर | रात्रौ ०९ वाजून ४१ मिनिटे |
नागपूर | रात्रौ ०९ वाजून ३४ मिनिटे |
अमरावती | रात्रौ ०९ वाजून ४० मिनिटे |
अकोला | रात्रौ ०९ वाजून ४३ मिनिटे |
छत्रपती संभाजीनगर | रात्रौ ०९ वाजून ४८ मिनिटे |
भुसावळ | रात्रौ ०९ वाजता ४८ मिनिटे |
परभणी | रात्रौ ०९ वाजून ४१ मिनिटे |
नांदेड | रात्रौ ०९ वाजून ३८ मिनिटे |
धाराशीव | रात्रौ ०९ वाजून ४१ मिनिटे |
भंडारा | रात्रौ ०९ वाजून ३२ मिनिटे |
चंद्रपूर | रात्रौ ०९ वाजून ३१ मिनिटे |
बुलढाणा | रात्रौ ०९ वाजून ४६ मिनिटे |
मालवण | रात्रौ ०९ वाजून ४८ मिनिटे |
पणजी | रात्रौ ०९ वाजून ४५ मिनिटे |
बेळगाव | रात्रौ ०९ वाजून ४३ मिनिटे |
इंदौर | रात्रौ ०९ वाजून ५१ मिनिटे |
ग्वाल्हेर | रात्रौ ०९ वाजून ४९ मिनिटे |
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"