शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

Champa Shashthi 2023: चंपाषष्ठीनिमित्त खंडेरायासाठी करा हा चविष्ट नैवेद्य आणि द्या अस्सल गावरान टच!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 10:34 AM

Champa Shashthi 2023: आज चंपाषष्ठी आणि खंडेरायाची षडरात्र समाप्तीचा दिवस, त्यानिमित्त खंडोबाला कोणता नैवेद्य दाखवला जातो ते पहा आणि जरूर करा. 

आज १८ डिसेंबर, मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी, तिलाच चंपाषष्ठी असे म्हणतात. आजच्या दिवशी मार्गशीर्ष प्रतिपदेपासून सुरु झालेले खंडोबाचे नवरात्र संपते. ही नवरात्र सहा दिवसांची असल्याने तिला षटरात्र असेही म्हणतात. आजच्या दिवशी खंडेरायाला निरोप देताना त्याच्या आवडीचा बेत आखला जातो, तो म्हणजे वांग्याचे भरीत आणि भाकरीचा. तसेच या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात. थंडीचे दिवस सुरू झाल्याने बाजारात छान भरताची वांगी उपलब्ध होऊ लागली आहेत. त्याचा नैवेद्य देवाला दाखवून त्याची कृपादृष्टी त्यात पडावी आणि त्याची लज्जत आणखी वाढावी, त्यात प्रसादत्व उतरावे म्हणून आज हा नैवेद्य आवर्जून करा. फूड ब्लॉगर वैदेही भावे यांच्या चकली. कॉमवर दिलेली रेसेपी जरूर करून बघा!

वांग्याचे भरीत

साहित्य:

१ मोठे वांगे (साधारण १ पौंड)२ मध्यम कांदे, बारीक चिरून१ मोठा टोमॅटो, बारीक चिरून

फोडणीसाठी:

२ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १/८ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, १/४ टीस्पून लाल तिखट किंवा २ हिरव्या मिरच्या,३ ते ४ मोठ्या लसूण पाकळ्या, बारीक चिरूनचवीपुरते मीठचिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी

कृती:

१) वांगे भाजून घ्यावे.२) वांगे गार होवू द्यावे. वांगे सोलून आतील गर बाजूला काढावा आणि सुरीने रफली चिरावे.३) कढईत तेल गरम करावे. मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट घालून फोडणी करावी. त्यात चिरलेली लसूण घालून १०-१५ सेकंद परतावे.४) कांदा घालून पारदर्शक होईस्तोवर परतावे. कांदा छान परतला गेला कि टोमॅटो घालून एकदम मऊ होईस्तोवर परतावे.५) मीठ आणि सोललेले वांगे घालून व्यवस्थित मिक्स करावे. तळापासून परतावे म्हणजे तळाला वांगे चिकटून जाळणार नाही. कडेने तेल सुटेस्तोवर परत राहावे (साधारण ५ ते ८ मिनिटे)गरम भरीत भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर सर्व्ह करावे.

टॅग्स :Khandoba Yatraखंडोबा यात्राPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३