शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
2
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
3
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
4
हिंदू समाजाने स्व-सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज: सरसंघचालक मोहन भागवत
5
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
6
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
7
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
8
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
9
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
10
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
11
डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ
12
मुलीला कुशीत घेत सुटकेचा जीवघेणा थरार; रणदिवे कुटुंबाच्या समोर उभा होता मृत्यू
13
लोकसंस्कृतीवरील अडाणीपणाचा शिक्का पुसला; तारा भवाळकर यांनी व्यक्त केली भावना
14
निवडून आलेल्या सरपंच महिलेस पदावरून काढणे सहज घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
15
इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!
16
१९५ एकर जमीन संस्था, आमदारांच्या घरांसाठी; मंत्रिमंडळ बैठकीत येणार मढबाबतचा प्रस्ताव
17
अजित पवार गट पदाधिकारी हत्या प्रकरणात तिघांना अटक; राजकीय वैमनस्यातून काढला काटा
18
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
19
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
20
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी

Chanakyaniti: मुख्यत्त्वे 'हे' तीन गुणधर्म असलेले पुरुष बायकांच्या पसंतीस उतरतात, जाणून घ्या वैशिष्ट्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 4:28 PM

Chanakyaniti: स्त्रीमन समजून घेणे अवघड आहे, तरीदेखील आचार्य चाणक्य यांनी पुढील ३ गुणांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. 

चाणक्य नीतीमध्ये मनुष्य स्वभावाशी निगडित अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. चाणक्यनीती वाचली असता आचार्य चाणक्य यांनी किती बारकाईने विविध पैलूंचा अभ्यास केला आहे ते लक्षात येते. याठिकाणी लेखाचा विषय स्त्रियांना आकर्षून घेण्याचा मुद्दा नसून स्त्रीमन समजून घेणे हा आहे, ते लक्षात घेतले पाहिजे.  त्यासाठी आचार्यांनी दिलेले मुद्दे समजून घेऊ. 

व्यवहारात चोख : मुलांच्या तुलनेत मुली काटकसरी असतात. त्यांना उधळपट्टी करणारी मुलं सहसा आवडत नाहीत. व्यवहारात चोख असणारी व्यक्ती त्यांना जबाबदार आणि कर्तव्यदक्ष वाटते. अशा व्यक्तींवर मुली विश्वास ठेवतात. याउलट पाण्यासारखा पैसा खर्च करणाऱ्यांवर अविश्वास दाखवतात. म्हणून केवळ मुलींनी आपल्याशी बोलावे म्हणून नाही, तर आपल्या भवितव्याच्या दृष्टीने जमा खर्च हिशोब आणि गुंतवणुकीवर प्रत्येक पुरुषाने भर दिला पाहिजे!

चांगला श्रोता : प्रत्येकाला जशी बोलणारी व्यक्ती हवी असते तशी हक्काची ऐकणारी व्यक्तीही हवी असते. दरवेळी सल्ले उपयोगी पडत नाहीत, तर निमूटपणे ऐकून घेणारी व्यक्ती हवी असते, कारण भिंतीसमोर मन मोकळे करता येत नाही, तिथे व्यक्तीच हवी असते. पुरुषांना खोड असते पूर्ण ऐकून न घेता मध्येच बोलून विषय तोडण्याची! महिलांना या गोष्टीचा भयंकर राग येतो. त्यामुळे त्या अशा लोकांना टाळतात. मात्र जे पुरुष शांतपणे सगळं ऐकून घेतात, विश्वास संपादन करतात त्यांच्याशीच महिला मनमोकळेपणाने बोलतात. 

प्रामाणिकपणा : समोरची व्यक्ती आपल्या विश्वासास पात्र आहे असे वाटेपर्यंत महिला पुरुषांशी बोलत नाहीत. पुरुषांच्या वागण्या बोलण्यात एकवाक्यता नसेल तर महिलांना ती व्यक्ती बोलण्यास योग्य वाटत नाही. महिला जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे आपले मन मोकळे करतात, त्याअर्थी त्यांनी त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास टाकलेला असतो, मात्र त्या विश्वासाला तडा देत समोरच्या व्यक्तीने त्यांच्याशी प्रतारणा केलेली त्यांना जराही सहन होत नाही. म्हणून पुरुषांनी त्यांच्यापासून कोणतीही गोष्ट न लपवता आहे ती परिस्थिती त्यांच्यासमोर ठेवली तर त्यांचा प्रामाणिकपणा महिलांना भावतो आणि असे पुरुष महिलांच्या विश्वासास पात्र ठरतात!

हे तीनही गुण प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी यांच्यात दिसून येतात, म्हणून त्यांची जोडी आदर्श जोडी मानली जाते. दोघांच्या संगनमताने संसार झाला तर मनुष्य शून्यातून विश्व उभे करू शकतो याचीही प्रेरणा त्यांच्या नात्यातून मिळते!