शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

Chandra Grahan 2022 : आज चंद्रग्रहण; अशा वेळी आपल्या पूर्वजांनी आपल्या हितासाठी सांगितलेले नियम अवश्य पाळले पाहिजेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 9:22 AM

Chandra Grahan 2022 : ग्रहण काळात स्त्री आणि पुरुषांसाठी वेगवेगळी उपासना आणि नियम सांगितले आहेत, कोणते ते जाणून घ्या!

'ग्रहण' या शब्दात एवढी नकारात्मकता भरली आहे, की आपण एखादे होणारे काम होत नसले तर `काय ग्रहण लागले आहे', असे म्हणतो. या नकारात्मकतेतून ग्रहणाची तीव्रता लक्षात येते. ग्रहण ही भौगोलिक अवस्था आपल्या मानसिक अवस्थेवर तीव्रतेने परिणाम करते. यासाठीच ग्रहणकाळात देवाचे नाव घ्या असे सांगितले जाते. आज चंद्रग्रहण आहे. त्यानिमित्ताने ग्रहण कालावधीत कोणत्या गोष्टींचे पथ्य पाळायला हवे ते जाणून घेऊया. 

आज वैशाख पौर्णिमा. ही तिथी बुद्ध पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. आजच्या पावन दिवशी चंद्रग्रहण लागले आहे. ते भारतातून दिसणार नाही, तरीदेखील ग्रहणकाळाचा प्रभाव मात्र समस्त सजीव सृष्टीवर परिणामकारक ठरतो. म्हणून या कालावधीत ईशचिंतन करा असे पूर्वापार सांगितले जाते. 

सूर्य-चंद्र ग्रहणात गायत्री मंत्र करावा. याखेरीज अथर्वशीर्ष, पुरुषसुक्त, श्रीसूक्त, रुद्र, नवग्रहांचे मंत्र तसेच अथर्वशीर्षाची २१ आवर्तने करावीत. ग्रहणकाळात शक्यतेवढे नाम:स्मरण करावे.

स्त्रियांनी स्तोत्र पठण जसे की, महिम्न, व्यंकटेशस्त्रोत्र, विष्णु सहस्त्रनाम, गणेश-देवी सहस्त्रनाम तसेच नामजप करावा. आपल्या इष्ट देवतेचे स्मरण करून जप करावा. जसे की, श्रीराम जय राम जय जय राम, नमो भगवते वासुदेवाय. इ. नाम घेत असताना आसन घ्यावे. पलंगावर बसू नये. लोळत पडू नये. आपली नित्यकर्म करत प्रभूचे नाम स्मरावे. 

चंद्र हा पृथ्वीला शीतलता देणारा ग्रह आहे. तो ग्रहणातून मुक्त व्हावा आणि शीतलतेचे चांदणे शिंपडीत राहावा अशी भगवंताकडे प्रार्थना करावी. एकदा का ग्रहण सुटले, की आपत्ती टळली या विचाराने अन्न, वस्त्र, शिधा गरजूंना दान करावे. 

हे नियम आपल्या पूर्वजांनी पूर्वापार पाळले आहेत. आपणही यथाशक्ती सहयोग देऊन ईशकार्यात सहभाग घ्यावा आणि ग्रहणकाळ आपल्या नित्यकर्माबरोबरच परमेश्वर चिंतनात घालवावा.

टॅग्स :Lunar Eclipseचंद्रग्रहण