Shree Shankar Maharaj: दत्तात्रेयांचे अवतार मानले गेलेले श्री स्वामी समर्थ यांचे एक शिष्य म्हणजे शंकर महाराज. शंकर महाराज अवतारी पुरुष होते. श्री सद्गुरु शंकर महाराज हे उंचीने फार कमी आणि जन्मतः अष्टावक्र व आजानुबाहू होते. त्यांचा उत्साह हा वाखाणण्यासारखा असे. प्रथमदर्शनी महाराजांचे वागणे एखाद्या लहान मुलाप्रमाणे वाटे. पण त्यांचे तेज आणि योग सामर्थ्य त्यांच्या चेहेऱ्यावरून ओतप्रोत ओसंडत असे. स्वतःला अज्ञानी आणि गांवढळ संबोधणारे महाराज जेव्हा बोलत तेव्हा मात्र भल्याभल्यांची तोंड बंद होत असत. शंकर महाराजांची मंदिरे, मठ अनेक ठिकाणी आहेत. शंकर महाराज यांना मानणारा, त्यांची भक्ती करणारा वर्गही मोठा आहे.
श्री सद्गुरू शंकर महाराज यांचे नामस्मरण, उपासना करणारे भाविक देश-विदेशात असल्याचे सांगितले जाते. कठीण काळात शंकर महाराज पाठीशी उभे राहिल्याचे अनुभव अनेक जण सांगतात. शंकर महाराज हे स्वामी समर्थ महाराजांना गुरु मानत. शंकर महाराजांचा आवडता नंबर होता १३. कारण विचारले असता ते म्हणत " सबकुछ तेरा, कुछ नाही मेरा" महाराज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावानी प्रसिद्ध आहेत. श्री शंकर महाराजांचा पारमार्थिक उपदेशही अगदी साधा असे. अनेकांना त्यांनी अनेक प्रकारे मार्गदर्शन केले. आपल्याकडे दत्तगुरुंसह अनेकांच्या बावन्नी प्रसिद्ध आहेत, त्याचे नियमित पठण, श्रवण केल्यास वेगळीच अनुभूती मिळते. शुभाशिर्वाद प्राप्त होतात. आत्मविश्वास वाढतो, मानसिक बळ मिळते. सकारात्मकता येते, असे अनेकांचा अनुभव असल्याचे सांगितले जाते.
श्री सद्गुरू शंकर महाराजांचे बावन्नी स्तोत्र अतिशय प्रभावी असल्याचे सांगितले जाते. श्री शंकर महाराज म्हणजेच साक्षात दत्तगुरुंचा अवतार असल्याचे सांगितले जाते. ज्यांना ज्यांना शक्य आहे, त्यांनी नियमितपणे सद्गुरू श्री शंकर महाराजांची बावन्नी याचे पठण करावे. पठण शक्य नसल्यास श्रवण करावे. शंकर महाराजांवरील विश्वास कायम ठेवावा, असे म्हटले जाते.
सद्गुरू श्री शंकर महाराजांची बावन्नी
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु। गुरुर्देवो महेश्वरः ॥गुरुर्साक्षात परब्रम्ह। तस्मैश्री गुरुवे नमः ॥
जय शिव शंकर शुभंकरा। श्री दत्ताच्या अवतारा ॥भव भय हारक हरिहरा। विनम्र वंदन स्वीकारा ॥धृ.॥वाघांच्या सहवासात । बाळ प्रकटले रानात ॥चिमणाजीला दृष्टांत। देवूनी स्वगृही आलात ॥१॥असंख्य केल्या कृष्ण लीला। अंतापुरच्या गावाला ॥जो तो धावे बघण्याला। छकुल्या शंकरच्या लीला ॥२॥हिमनग शिखरावर फिरले। विश्वामधुनी संचारले ॥अक्कलकोटी श्री आले। विनम्र गुरुचरणी झाले ॥३॥शुभरायांच्या मठातून। किर्तन करिती जनार्दन ॥दत्तरूप त्या दाखवून। प्रकट झाले जनातून ॥४॥तेथे रंगता ते भजनी। प्रत्येकास दिसे नयनी ॥जिकडे तिकडे भक्तगणी। शंकररूपे ये दिसुनी ॥५॥मेहेंदळेच्या वाड्यात। उत्सव शिवरात्री करीत ॥वर्णपालटे शरीरात। शिवशंभूसम श्री दिसत ॥६॥श्रीपादवल्लभ दिसती कुणा। कुणा पंढरीचा राणा ॥कुणा भवानी कृष्ण कुणा। दर्शन देती भक्तांना ॥७॥जरी पुण्यातून नच जाती। असंख्य पत्रे तरी येती ॥हजार उत्सवाला असती। अनेक गावी श्री दिसती ॥८॥अल्लख वदता मुखातून। पिंड निघाली भूमीतून ॥पाथर्डीस हे शिवस्थान। भोवती नाथांचे ठाण ॥९॥नाथ समाधी मढीतली। तेथील शांत धुनी झाली ॥अल्लख देवूनी आरोळी। क्षणात प्रज्वलित केली ॥१०॥
मेहेंदळे सौभाग्यवती। जीवन संपवण्या जाती॥पूर्णत्वाला तिज नेती। रसाळ ज्ञानेश्वरी कथिती ॥११॥गिरीनारीच्या गिरी जाती। वायुभक्षण जे करिती ॥भोजन साधुना देती। संगती प्राणीही असती ॥१२॥कुरुक्षेत्रावर जी घडिली। मनास घटना ना पटली ॥गीता कैसी सांगितली। शंका कोणीतरी विचारली ॥१३॥बघता रोखुनी त्यावती। दिसली ज्योतिर्मय मूर्ती ॥कृष्णापरी त्या श्री दिसती। तत्क्षण ज्ञानगीता प्राप्ती ॥१४॥सोमवातीच्या शुभ दिवशी। स्वरूप लिंगात्मक दिसती ॥उत्कट प्रीती ज्या पाशी। तोच बघे त्या तेजाशी ॥१५॥महाराजांच्या जिभेवर। लिंग वसतसे खरोखर ॥समर्थ स्वामी गुरुवर। पूजन करिती सत्वर ॥१६॥समर्थ स्वामी माउलीने। तृप्त केले स्तनपाने ॥ऐसे सांगती अभिमाने। शिरसावंद्य गुरुवचने ॥१७॥प्रधान लंडनला जाती। तेव्हा मातापिता जाती ॥सदगुरुला मनी स्मरीती। तत्क्षण सन्मुख श्री येती ॥१८॥पर्वत गिरीनारी नेती। दत्त्प्रभुना बोलाविती ॥समक्ष अंत्यविधी करिती। शिष्य मनोरथ पुरविती ॥१९॥प्रधान झाले शिष्ठा प्रधान। लाभे गुरुभक्तीचे ज्ञान ॥उत्कट भक्ती प्रीती महान। गुरुह्रीद्यांचे प्रपंच प्राण ॥२०॥
गाणगापूरला श्री जाती। रुद्रा घाटावर श्री बसती ॥निर्गुण पादुकांवरती। ब्राम्हण पूजा जी करती ॥२१॥महारांजाच्या पडे शिरी। जो तो मनी आश्चर्य करी ॥सन्मानाने मठांतरी। घेऊन येती श्री स्वारी ॥२२॥भस्मे वरती अति माया। पदपंकज शिरी ठेवूनिया ॥स्वरूप गुरुचे जाणाया। दृष्टी दिव्य दिली सदया ॥२३॥गुरूने आपला मज म्हणून। जवळी घ्यावे आवळून ॥ऐसी इच्छा प्रकटून। फुलारी दादा घे वचन ॥२४॥तत्क्षण शरीरी संचरून। आपणासारखे त्या करून ॥केले आश्वासन पूर्ण। कृतार्थ दादांचे जीवन ॥२५॥गणेश अभ्यंकर यांना। युद्धावरती असतांना ॥असंख्य गोळ्या पायांना। चाटुनी गेल्या खुणाविना ॥२६॥विजार चाळण सम झाली। तरीही जाणीव नच झाली ॥लीला कोणी ही केली। अंतरी जान कृपा झाली ॥२७॥सद्गुरू असता काशीत। ब्राम्हण वैदिक हिणवीत ॥भोंदू अजागळ अशिक्षित। जाणे काय कसे वेद ॥२८॥सागरगोटे झेलीत। कन्या खेळतसे तेथ ॥तिच्या मुखातून बोलवीत। बृह्स्पतीसम श्री वेद ॥२९॥नवरात्रीच्या अष्टमीस। शरीरी दुर्गेचा वास ॥करिती तांडव नृत्यास। अनंत नमने मातेस ॥३०॥
सप्तचिरंजीव जे असती। त्यातील श्रेष्ठ असे विभूती ॥तो मी मारुती या जगती। स्वये मुखाने श्री वदती ॥३१॥नवले विनवी सदगुरुला। दावा विष्णूपद मजला ॥सागर तीरावर नेला। सुवर्ण पदपंकज दिसला ॥३२॥लांब चरण ते स्पर्शून। उर्मी उसळल्या मनातून ॥व्योमी बघता यर दिसून। किरीटी चमके लखलखून ॥३३॥तात्यावारती अति प्रीती। अनन्य शरणागती असती ॥तात्या जणू की प्रतिकुती। दुसरी सद्गुरूंची मूर्ती ॥३४॥परस्परांची बदलून। कामे करिती समजून ॥कुणा न ये हे कळून। कोण शिष्य नि गुरु कोण ॥३५॥समाधीतुनी प्रकटती। मिठीत रुद्रांना घेती ॥पृथ्वीभोवती फिरविती। साक्षित्वाची दिली प्रचिती ॥३६॥मी शंकर कैलासपती। अवतरलो या भूवरती ॥समज द्यावया जगाप्रती। कार्य असे हे ममचित्ती ॥३७॥विविध रंग या जगतात। इथले मात्र नसे तेथ ॥ज्ञात न कोणा हे होत। ज्ञान असे हे अतिगुप्त ॥३८॥स्वतःस कोणी ओळखिल। तो मज निश्चित जाणेल ॥धनदौलत जरी उधळील। तरीही त्याला नुमजेल ॥३९॥घे घे जाणुनी तू मजला। अथवा पश्चाताप भला ॥कार्यभाग न मम अडला। अडेल माझ्यावीन तुझला ॥४०॥
कांचनसम हे अक्षरबोल। कोरूनी दगडावरती खोल ॥सुवेळी तुझला स्मरतील। शब्द सुधेसम हे अनमोल ॥४१॥केले तुझला गुह्य खुले। साधुनी अपुले घेई भले ॥शरणांगत मज जे आले। ते मी निश्चित उद्धारीले ॥४२॥अशक्य काम करी शक्य। ऐसे ज्याचे ब्रीदवाक्य ॥भक्तांशी जो करी सख्य। लिलया देई सदा मोक्ष ॥४३॥भिऊ नको मी पाठीशी। असता भीती तुला कैशी ॥वचनबद्ध जो भक्तांशी। का नच त्यावर विश्वाशी ॥४४॥योगक्षेम मी चालविण। ऐसे दिद्धले न वचन ॥त्याचे चिंतन मनी करून। चिंता द्यावी अर्पून ॥४५॥सद्गुरू येथुनी नच गेले। चिरंजीव ते असती भले ॥अनेक वेळा श्री उठले। समाधीतुनी प्रकटले ॥४६॥अंत जगाचा होईल। सुभक्त तितुके रक्षील ॥ऐसे ज्याचे दृढबोल। प्रीती अपेक्षी बहुमोल ॥४७॥ऐसा समर्थ स्वामीला। भव मनीचा सांगितला ॥भक्ती प्रीती दे मजला। परमार्थाचा मार्ग भला ॥४८॥मिठीत मजला घेवून। आईपरी घे चुंबन ॥माझा याळ असे म्हणून। कृतार्थ करी हे जीवन ॥४९॥बावन्नी भाऊदासाची। प्रीतीसुद्धा जणू भक्तीची ॥प्राशन करता मिळायची। मधुरा भक्ती सद्गुरूंची ॥५०॥बावन्नी ज्याच्या स्मरणात। अमलभाव हा हृदयात ॥सद्गुरूंच्या तो सावलीत। हिच फल श्रुती पदरात ॥५१॥जय शिव शंकर शुभंकरा। श्री दत्ताच्या अवतारा ॥भव भय हारक हरिहरा। विनम्र वंदन स्वीकारा ॥५२॥
॥ जय शंकर ॥॥ श्री गुरुदेव दत्त ॥