Shukrawar Shukra Stotra: भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये अनेकविध प्रचलित आहे. कुळाचार, कुळधर्म आणि परंपरेप्रमाणे वर्षानुवर्षे गोष्टी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतात. ज्योतिषशास्त्र आणि पंचांगानुसार, रविवार ते शनिवार या सर्व वारांवर ग्रहांचा अंमल, प्रभाव अधिक असतो, असे सांगितले जाते. त्या त्या वारानुसार, देवता आणि ग्रहांची आराधना, उपासना केली, तर त्याचे सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
नवग्रहांपैकी शुक्र या ग्रहाचा प्रभाव आणि अंमल शुक्रवार या दिवसावर असतो, असे म्हटले जाते. शुक्र हा सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आकर्षण आणि प्रेमाचा कारक ग्रह मानला जातो. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र ग्रहाची स्थिती कमकुवत असेल तर जीवनातील अनेक गोष्टींमध्ये प्रतिकूल प्रभाव पडू शकतो, असे सांगितले जाते. शुक्राचा प्रतिकूल प्रभाव कमी होऊन सकारात्मकता यावी, यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितल्याचे म्हटले जाते. शुक्र ग्रहाच्या बीज मंत्राचा जप करण्यासोबतच शुक्रवारी या एका प्रभावी स्तोत्राचे पठण करावे. यामुळे सुख समृद्धी मिळू शकते, असे सांगितले जाते. शुक्रवार हा लक्ष्मी देवीला समर्पित असल्यामुळे या स्तोत्राचे पठण करण्यापूर्वी लक्ष्मी देवीचे मनोभावे पूजन, नामस्मरण करावे, असा सल्ला दिला जातो. तसेच आपल्या हातून कळत-नकळत घडलेल्या चुकांसाठी क्षमायाचना करावी. हे स्तोत्र पठण करणे शक्य नसेल, तर श्रवण करावे. यथाशक्ती शुक्र ग्रहाच्या मंत्राचा जप करावा, असे सांगितले जाते.
शुक्र मंत्र
शुक्र एकाक्षरी बीज मंत्र- ‘ॐ शुं शुक्राय नम:।तांत्रिक मंत्र- ‘ॐ द्रां द्रीं द्रौं स: शुक्राय नम:।
शुक्र स्तोत्र
नमस्ते भार्गव श्रेष्ठ देव दानव पूजित।वृष्टिरोधप्रकर्त्रे च वृष्टिकर्त्रे नमो नम:।।
देवयानीपितस्तुभ्यं वेदवेदांगपारग:।परेण तपसा शुद्ध शंकरो लोकशंकर:।।
प्राप्तो विद्यां जीवनाख्यां तस्मै शुक्रात्मने नम:।नमस्तस्मै भगवते भृगुपुत्राय वेधसे।।
तारामण्डलमध्यस्थ स्वभासा भसिताम्बर:।यस्योदये जगत्सर्वं मंगलार्हं भवेदिह।।
अस्तं याते ह्यरिष्टं स्यात्तस्मै मंगलरूपिणे।त्रिपुरावासिनो दैत्यान शिवबाणप्रपीडितान।।
विद्यया जीवयच्छुक्रो नमस्ते भृगुनन्दन।ययातिगुरवे तुभ्यं नमस्ते कविनन्दन।।
बलिराज्यप्रदो जीवस्तस्मै जीवात्मने नम:।भार्गवाय नमस्तुभ्यं पूर्वं गीर्वाणवन्दितम।।
जीवपुत्राय यो विद्यां प्रादात्तस्मै नमोनम:।नम: शुक्राय काव्याय भृगुपुत्राय धीमहि।।
नम: कारणरूपाय नमस्ते कारणात्मने।स्तवराजमिदं पुण्य़ं भार्गवस्य महात्मन:।।
य: पठेच्छुणुयाद वापि लभते वांछित फलम।पुत्रकामो लभेत्पुत्रान श्रीकामो लभते श्रियम।।
राज्यकामो लभेद्राज्यं स्त्रीकाम: स्त्रियमुत्तमाम।भृगुवारे प्रयत्नेन पठितव्यं सामहितै:।।
अन्यवारे तु होरायां पूजयेद भृगुनन्दनम।रोगार्तो मुच्यते रोगाद भयार्तो मुच्यते भयात।।
यद्यत्प्रार्थयते वस्तु तत्तत्प्राप्नोति सर्वदा।प्रात: काले प्रकर्तव्या भृगुपूजा प्रयत्नत:।।
सर्वपापविनिर्मुक्त: प्राप्नुयाच्छिवसन्निधि:।।
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.