शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

चातुर्मास विशेष : रोज एक अभंग, भावार्थ आणि निरूपण : सुंदर ते ध्यान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 7:00 AM

चातुर्मासानिमित्त सुरु केलेल्या या उपक्रमात आपण संतांनी लिहिलेल्या अभंगांचे चिंतन करत आहोत.

जय हरी माऊली. पंढरपुरच्या पांडुरंगाचा विषय निघाला, की जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा अभंग मुखी येतोच. काय प्रासादिक ओळी आहेत बघा. त्या गुणगुणताना विठुरायाचे सगुण रूप डोळ्यासमोर आपोआप उभे राहते. कसे आहे ते रूप?

सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी, कर कटावरी ठेवोनिया।तुलसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर,तेचि रूप।।मकर कुंडले, तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणि विराजीत।।तुका म्हणे माझे, हेचि सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने।।

या शब्दांबरोबर लता दीदींचा दैवी आवाज कानात घुमला नसेल तरच नवल. त्याला सुंदर संगीत साज चढवला आहे, संगीतकार श्रीनिवास खळे यांनी. हा अभंग ऐकत असताना मन थेट विठुरायाच्या पायाशी पाहोचते आणि सुंदर रूप पाहताना आपलीही समाधिस्थ अवस्था होते. 

तुकाराम महाराज तर विठ्ठल भक्त. त्यांनी स्वत: निर्गुण भक्ती केली. परंतु, समाजाला भगवंत दाखवायचा, तर तो सगुण रूपात असायला हवा, म्हणून त्यांच्या भावावस्थेत दिसणारा पांडुरंग त्यांनी सदर अभंगातून रेखाटला आहे. 

विठुरायाच्या सान्निध्यात असणारे तुकोबा, या अभंगात वर्णन करताना सुंदर `ते' ध्यान म्हणत आहेत. `ते' ऐवजी `हे' हा शब्द त्यांना वापरता आला असता, परंतु त्यांनी सुंदर ते ध्यान असे म्हटले, या मागचा तर्क सांगताना ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर सांगतात, `पंढरीला भक्तांसाठी, घेऊनि कर कटी, भीमा निकटी' उभे राहिलेले हे सावळे परब्रह्म सगुण आहे. त्याचे ध्यान करताच ते आपल्यासमोर येते. या ध्यानाचा त्या ध्यानाशी असलेला संबंध दाखवताना तुकाराम महाराजांनी `हे' ऐवजी `ते' हा शब्द वापरला असावा.' 

म्हणूनच कदाचित आपणदेखील भगवंताच्या दर्शनाला गेलो असता, डोळे मिटून घेतो. किती हा विरोधाभास? ज्या दर्शनासाठी तासन् तास रांगेत आपण ताटकळत उभे असतो, तो दर्शनाचा क्षण आला, `देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी' अशी अवस्था असताना मात्र आपण डोळे मिटून घेतो. कारण, आपल्या हृदयस्थ परमेश्वराची प्रतिमा आणि गाभाऱ्यात उभा असलेला विठोबा या दोन्ही प्रतिमा एकच आहेत ना, याची खात्री करून घेत असतो. ही तुलना, म्हणजेच तुकाराम महाराजांच्या लेखी `सुंदर ते ध्यान' आणि `सुंदर हे ध्यान' यातला फरक असेल.

संतरचना समजून घेणे अवघड. वरवर सोपे वाटणारे शब्द बरेच काही गूढ सांगून जातात. जसे की, वर केलेली शाब्दिक उकल. बाकी, उर्वरित अभंगात महाराजांनी त्यांना दिसलेला पांडुरंग कसा आहे, त्याचे वर्णन केले आहे. 

कटेवर हात ठेवून विटेवर उभा असलेला पांडुरंग, त्याच्या गळ्यात तुळशी माळ आणि कमरेभोवती पितांबर नेसले आहे. असे सोज्वळ, सात्विक रूप भक्तांना नेहमीच आवडते. त्याच्या कानात मत्स्य आकाराची कुंडले आहेत, गळ्यात कौस्तुभ रत्न आहे. हे रूप सावळे असले, तरी हा सगळा श्रुंगार त्याला शोभून दिसत आहे. अशा रूपात विठ्ठलभक्त कायम रमू शकतो....!

विठुरायाचे रूप पाहून तुकाराम महाराजांची जी अवस्था होते, तशीच आपलीही अवस्था ही अभंगवाणी ऐकून होते. चला तर मग, दिवसाची मंगलमय सुरुवात करुया, मुखाने `जय हरी विठ्ठल' म्हणूया...!

टॅग्स :chaturmasचातुर्मास