शहरं
Join us  
Trending Stories
1
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : योगायोग! उद्या निकाल लागणार, त्याच वेळी पहाटेच्या शपथविधीला पाच वर्ष पूर्ण होणार
3
Maharashtra Vidhan Sabha Results 2024: मुंबईतील 36 मतदारसंघांची  ‘येथे’ होणार मतमोजणी
4
'या' मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांचं पारडं जड, सत्तास्थापनेत किंगमेकरही ठरणार?
5
तुमचं Aadhaar कार्ड हरवलंय, आणि नंबरही लक्षात नाहीये; आता काय करावं लागेल? जाणून घ्या 
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: मुंबईतील २४ मतदारसंघांत महिलांचा 'मत'टक्का पुरुषांपेक्षा जास्त! 
7
छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे यांच्यात 'कांटे की टक्कर'; विक्रमी मतांचा फायदा कुणाला होणार?
8
दिंडोरीत पुन्हा घड्याळाची टिकटिक, की वाजणार तुतारी?
9
IND vs AUS : KL राहुलच्या विकेटसह पडली वादाची ठिणगी; खरंच चिटिंग झाली? (VIDEO)
10
Kalbhairav Jayanti 2024: शनिवारी चुकवू नका काल भैरवाची 'ही' उपासना; मिळेल सुख, दूर होईल निराशा!
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
12
Video - नवरा-नवरीला गिफ्ट द्यायला आला अन् खाली कोसळला; स्टेजवरच हार्ट अटॅकने मृत्यू
13
ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिना खानचं टीव्हीवर कमबॅक, Bigg Boss 18 मध्ये दिसणार
14
केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले
15
मुंबईत मतमोजणीची तयारी पूर्ण; २,७०० हून अधिक कर्मचारी, १० हजार पोलीस तैनात
16
करमाळ्यात कुर्डूवाडीसह ३६ गावे ठरणार गेमचेंजर; 'हा' फॅक्टर निर्णायक राहणार!
17
Adani Group Stocks: आरोपांनंतर अदानी समूहाचे शेअर्स आजही गडगडले; 'या' कंपनीला सर्वाधिक फटका
18
अभिनयक्षेत्रातून निवृत्ती घेणार का? अनिल कपूरला नाना पाटेकर म्हणाले- "माझ्याकडे काम नसेल तर..."
19
कोहलीचा 'विराट' संघर्ष कायम! हेजलवूडच्या अतिरिक्त उसळी घेणाऱ्या चेंडूवर 'किंग'ची झाली 'शेळी'
20
तेराव्या वर्षी सेल्समन म्हणून काम, आईकडून १० हजार घेऊन सुरू केला व्यवसाय, उभारला ३३ हजार कोटींचा ब्रँड

Chhath Puja 2024: छठ पूजा; गतवैभव प्राप्तीसाठी द्रौपदीनेही केले होते हे कडक व्रत!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2024 10:06 AM

Chhath Puja 2024: यंदा ५ ते ८ नोव्हेंबर छठ पूजेचे व्रत केले जाईल, त्यात कार्तिक षष्ठीचा अर्थात ७ नोव्हेंबरचा दिवस महत्त्वाचा; वाचा या व्रताचे महत्त्व आणि पार्श्वभूमी!

महाराष्ट्रीय लोक संक्रांतीला जशी सूर्याची उपासना करतात, त्याप्रमाणे उत्तर भारतीय लोक छठ पूजेच्या निमित्ताने सूर्याची उपासना करतात. कार्तिक महिन्याच्या शुक्ल षष्ठीपासून अर्थात दिवाळीनंतर छठ पूजेची (Chhath Puja 2024)सुरुवात होते. या पूजेला छठ पूजा तसेच सूर्य षष्ठी पूजा असेही म्हणतात.यंदा ५ नोव्हेंबरपासून छठ पूजेला सुरुवात झाली असून ७ तारखेला सूर्याला अर्घ्य दिले जाणार आहे आणि ८ नोव्हेंबर रोजी व्रताची पूर्तता केली जाणार आहे. छठ पूजेचे व्रत अतिशय कठीण असते. हे व्रत करणारे भाविक ३६ तासांचा निर्जला उपास करतात. 

छठ पूजा ही सूर्यदेवाची उपासना आहे. वेद पुराणातील माहितीनुसार छठ देवी, सूर्यदेवाची बहीण आहे. छठ पूजेच्या वेळी त्या दोहोंची पूजा करून त्यांना प्रसन्न केले जाते. छठ पूजा विशेषत: बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, नेपाळ या ठिकाणी केली जाते. या प्रदेशातील लोक विश्वभर पसरले असल्यामुळे त्यांच्याबरोबर छठ पूजेची परंपराही पसरली आहे. संतानप्राप्तीसाठी, पुण्यसंचयासाठी, सुख-समृद्धीसाठी आजही छठ पुजा भक्तीभावाने केली जाते.

छठ पूजेमागील पौराणिक कथा: (Mythological story behind Chhath Puja 2024)

असे म्हणतात, की छठ पूजेचा प्रारंभ सूर्यपुत्र कर्णाने केला. कर्ण हा दानशूर होताच, शिवाय तो सूर्यपुत्र असल्यामुळे जन्मत:च त्याला कवचकुंडले प्राप्त झाली होती. त्या कवचकुंडलाची शक्ती वाढावी, म्हणून कर्ण रोज सकाळी पाण्यात राहून सूर्यदेवाची उपासना करत आणि सूर्याला अर्घ्य देऊन मगच दिवसाची सुरुवात करत असत.

महाभारताच्या राजकारणात, द्युतात आपले सर्वकाही गमावल्यानंतर पांडवांना त्यांचे गतवैभव परत मिळावे, म्हणून द्रौपदीनेदेखील सूर्याची उपासना केली होती. सूर्य देवांच्या आशीर्वादाने तिची मनोकामना पूर्ण झाली.

राजा प्रियंवदाने पुत्रकामेष्टी केला होता. त्याच्या पत्नीला मूल झाले, परंतु ते जन्मत: मृत होते. राजा खूप उदास झाला. महत्प्रयासानंतर पुत्रप्राप्तीचा योग आला, तोही असा, या विचाराने तो आत्मसमर्पण करू लागला. त्यावेळेस देवसेना नामक देवी प्रगट झाली आणि तिने राजाला सूयोपासना करायला सांगितली. राजाने तसे केले. कालांतराने त्याच्या वंशात तेजस्वी बालक जन्माला आले. 

पौराणिक कथेनुसार जरासंध राजाच्या पूर्वजांना कुष्ठ रोग झाला होता. तत्कालीन राजाची महारोगातून सुटका व्हावी, म्हणून धार्मिक अनुष्ठानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मुख्यत्वे सूर्यदेवाची पूजा केली होती. त्या पूजेचे फळ राजाला मिळाले आणि तो रोगमुक्त झाला. तेव्हापासून आजतागायत ही पूजा श्रद्धेने केली जाते.

छठ पुजेचे शास्त्रीय कारण: (Benefits of Chhath Puja 2024)

सर्व प्रकाराच्या रोगातून, तापातून मुक्तता व्हावी, हीदेखील या पूजेची शास्त्रीय बाजू आपल्याला मानता येईल. सूर्याची किरणे प्रखर असतात. त्यात अनेक जीवजंतूचा नायनाट करण्याची क्षमता असते. तसेच सकाळची कोवळी किरणे शरीराला पोषक असतात. म्हणून डॉक्टरदेखील डी व्हिटॅमिन मिळवण्यासाठी रोज सकाळी अर्धा तास सूर्यप्रकाशात चालण्याचा किंवा व्यायाम करण्याचा सल्ला देतात. सूर्यप्रकाशाचे महत्त्व जाणून आपल्या संस्कृतीने सूर्योपासनेचे आणि सूर्यनमस्काराचे संस्कार घातले आहेत. दिवाळीचा कालावधी थंडीचा. अशात उबदार किरणांनी शरीराला हायसे वाटावे, सर्दी, ताप यांसारख्या किरकोळ आजारांपासून सुटका व्हावी, यादृष्टीनेही छठ पूजेचे महत्त्व लक्षात घेता येते. 

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२४Mahabharatमहाभारत