पृथ्वीचं संवर्धन करण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्यात आध्यात्मिक गुरू, पद्मविभूषण पुरस्कार विजेते सद्गुरू जग्गी वासुदेव कायमच पुढाकार घेतात. यासोबतच इशा फाऊंडेशनच्या माध्यमातून ते अध्यात्म, शिक्षण आणि पर्यावरण विषयांमध्येही काम करतात.
विजय दर्डा हे शिक्षणतज्ज्ञ, माजी संसदपटू, 'सकल जैन समाज'चे संस्थापक आणि लोकमत मीडियाचे चेअरमन असून ते लोककल्याणासाठी काम करतात. महाराष्ट्राच्या विकासासाठी, विशेषत: विदर्भावर लक्ष केंद्रीत करून त्यांनी उचललेल्या पावलांचं सगळ्यांनीच कौतुक केलं आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी यवतमाळचा विकास करण्यास ते वचनबद्ध आहेत.
३ सप्टेंबर २०२० रोजी संध्याकाळी ५ वाजता विजय दर्डा हे सद्गुरुंना, पर्यावरण आणि त्याच्या संवर्धनासंबंधीच्या विचारांना चालना देणारे काही प्रश्न विचारतील. सद्गुरुंनी दिलेल्या माहितीमुळे प्रेक्षकांच्या ज्ञानात भर पडेल आणि त्यांना 'कॉन्शस प्लॅनेट' चळवळीसाठी काम करण्याची प्रेरणा मिळेल.
विजय दर्डा खालील विषयांना स्पर्श करतील:
- पर्यावरण आणि अध्यात्म यांचं सह-अस्तित्व शक्य आहे का?- कोविड १९ महामारीतून मिळालेल्या शिकवणीचा वापर करून आपण पृथ्वीसाठी कसं काम करू शकतो?- विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वसामान्य नागरिक काय करू शकतात?- पोषक वातावरण नसताना शेतकरी काय करू शकतात?- नद्यांचं संवर्धन करण्यासाठी, त्या जिवंत ठेवण्यासाठी सरकार काय करू शकतं?
महाराष्ट्र आणि पृथ्वीशी संबंधित विविध मुद्द्यांवर ते संवाद साधतील. या दोन व्यक्तिमत्वांच्या संवादातून अनेक वेगळे विचार आणि व्यावहारिक उपाय समोर येतील.
या चर्चेचा प्रीमिअर टेलिकास्ट पाहा आज, ३ सप्टेंबर २०२० रोजी संध्याकाळी ५ वाजता फक्त YouTube.com/LokmatBhakti, YouTube.com/Lokmat या आमच्या यू-ट्युब चॅनल्सवर आणि Facebook.com/Lokmat या फेसबुक पेजवर!