शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

CoronaVirus: कोरोनाचा धोका टाळण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 3:59 PM

कोरोना विषाणूमुळे आलेल्या या आव्हानात्मक परिस्थितीत तुमची रोगप्रतिकार शक्ति हीच सर्वाधिक महत्वाची आहे. तुमची रोगप्रतिकारशक्ति नैसर्गिक रीतीने वाढवण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेल्या ८ टिप्स या लेखात देत आहोत.

कोविड – १९ महारी अनेक देशांमध्ये पसरत असतांना, संपूर्ण जग या विषाणूला आवर घालण्यासाठी आणि त्याला फैलण्यासासून रोखण्यासाठी झगडते आहे. ज्यांची रोगप्रतिकार्शक्ती चांगली आहे ते लोक या कोरोना विषणूचा सामना चांगल्या प्रकारे करण्यासाठी सज्य आणि अधिक समर्थ असतील या गोष्टीवर डोक्टरांच देखील मतैक्य आहे. सद्गुरू इथे आपली रोगप्रतिकार शक्ती थोड्या काळात नैसर्गिक रीतीने कशी वाढवता येतील हे इथे सांगतात.सद्‌गुरु: विषाणू ही मानवी जीवनासाठी काही नवीन गोष्ट नाही. आपलं अस्तित्व अक्षरश: जिवाणू आणि विषाणूंच्या महासमुद्रात आहे. महत्वाची गोष्ट ही आहे की हा विशिष्ट विषाणू आपल्यासाठी नवीन आहे म्हणून आपल्या शरीराला त्याचा त्रास होतोय. ज्या प्रकारे इतर बर्‍याच गोष्टींचा सामना आपल्या शरीरानं आतापर्यंत केला त्याचप्रकारे आपलं शरीर आवशक ती प्रतिद्रव्ये (अॅंटीबॉडीस) निर्माण करून या विषणूचा देखील सामना करू शकेल यासाठी आपल्याला काही गोष्टी करता येणं शक्य आहे. हा या विषाणू वरचा इलाज नक्कीच नाहीये पण या सोप्या गोष्टींचं पालन केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की तुमची प्रतिकारशक्ती सहा ते आठ आठवड्यात किमान काही टक्के तरी अधिक सुधारलेली असेल. स्वत:च्या आणि इतरांच्या जिवाला धोका न होता या परिस्थितीतून बाहेर पाडण्यासाठी त्याच गोष्टीची तुम्हाला गरज आहे.१. कडूलिंब आणि हळदकाही पर्वतरांगा सोडल्या तर भारतात बहुतेक भागात कडूलिंब सापडतो आणि हळद तर सगळीचकडे मिळते. आजकाल नॅनो-टर्मरीक नावाचा प्रकार आला आहे ज्याची शोषणशक्ती आपल्या नेहमीच्या हळदीपेक्षाजास्त आहे.

कडूलिंबाचे आठ-दहा पानं आणि थोडीशी हळद कोमट पाण्यातून घेणे ही एक साधी गोष्ट तुम्ही करू शकता. तुम्ही सकाळी उपाशीपोटी हे मिश्रण पिलं तर बाहेरच्या जीवजंतूंचा सामना करण्याची तुमची क्षमता अनेक पटीनं वाढेल. तसं अगदी लगेच घडणार नाही, पण तीन ते सहा आठवड्यात बराच फरक पडू शकेल. हे प्रत्येकाला आपल्या घरी करता येणं शक्य आहे. दक्षिण भारतातल्या घरोघरी ही गोष्ट आढळून येते पण भारताच्या इतर भागांमध्ये ती नाहीये. तर प्रत्येकाने या गोष्टीची सुरुवात आपल्या घरात करायला हवी.

२. जिवा लेजियम आणि आंबाकाही पारंपारिक गोष्टी आहेत, जसं जिवा लेजियम किंवा चवनप्राश, ज्या रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. तुमच्या घरी साठ वर्षाच्या वरचे वयस्कर लोक असतील तर त्यांना चवनप्राश देणं उपयुक्त ठरेल. या दिवसात कच्च्या कैर्‍या देखील मिळतात. त्या पिकायची वाट बघू नका, कच्या कैर्‍या खा. त्याने कोरोना बाधणार नाही असं नाही पण तुमची प्रतिकारशक्ती थोडीफार नक्कीच वाढेल.

३. मध आणि मिर्‍यासोबात आवळाआवळा आणि थोडे काळ्या किंवा हिरव्या मिर्‍याचे तुकडे रात्री मधात भिजवून ठेवा. हे मिश्रण दिवसातून तीन वेळ तीन-तीन चमचे घ्या. तुम्ही रिकाम्या पोटी असण्याच्या स्थितित असताना इतर काही खाण्या आधी जर हे मिश्रण खाल्लं तर त्याने खूप फायदा होईल. तुम्ही हे नियमित करू लागलात तर चार ते आठ आठवड्यांमद्धे तुमची रोग प्रतिकारशक्ती बर्‍याच मोठ्या प्रमाणात सुधारेल.

४. बेलाची (महाविल्व) पानंभारतातल्या पश्चिम घाटात बेलाची पानं मिळतात. तुम्ही रोज सकाळी तीन ते पाच पानं खाल्ली तर त्यानेसुद्धा तुमची रोग प्रतिकारशक्ती बर्‍याच मोठ्या प्रमाणात सुधारेल.

५. पुरेसा शारीरिक व्यायामआता लोक घरी आहेत. ते जर नुसते बसून राहात असतील आणि सतत काही न काही खात असतील किंवा दारू घेत असतील तर ते स्वत:ला विषाणू प्रती जास्त संवेदनशील बनवत आहेत. एक साधी गोष्ट तुम्ही करायला हवी, ती म्हणजे शारीरिक दृष्ट्या सक्रिय राहणं. पुढच्या काही आठवड्यात रिकाम्या वेळेचा शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त होण्यासाठी वापर करून घेता येऊ शकतो. तुम्हाला कुठलेच व्यायाम माहीत नसतील तर कमीतकमी जागच्याजागीच रोज जॉगिंग करा – एका वेळी १५ मिनिट असं दिवसातून पाच ते सात वेळा तुम्ही करू शकता. त्यामुळे तुमचं शरीर बर्‍याच गोष्टी चांगल्या प्रकारे हाताळू शकेल.

६. उष्णा निर्माण करण्यासाठी मंत्रोच्चार

“योग योग योगेश्वराय” मंत्र शरीरामद्धे समत्-प्राण किंवा उष्णा निर्माण करण्यासाठी आहे. उष्ण आणि शीत हे दोन शब्द आपल्याकडे आहेत ज्यांचं इंग्लिशमध्ये हीट (heat) आणि कोल्ड (cold) असं भाषांतर केलं जातं, पण प्रत्याक्षात ते तसं नाहीये. ते शब्द अपेक्षित अर्थाच्या रोखानं निर्देश करतात पण ते नेमका अर्थ दर्शवत नाहीत. तुम्ही तुमच्या शरीरात पुरेसा समत्-प्राण निर्माण केला आणि त्यातून उष्मा निर्माण केलीत तर तुमची रोग प्रतिकारशक्ती कितीतरी चांगल्या प्रकारे काम करू लागेल. हा मंत्रोचार तुमच्या रोग प्रतिकारशक्तीमध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण करेल कारण मंत्रोच्चार तुमच्या शरीरात उष्मा निर्माण करतो.

हे पक्क लक्षात असू द्या की हा कोरोना विषाणू वरचा इलाज नाहीये आणि त्याला रोखण्याचा उपाय पण नाहीये. “मी मंत्र जप केलाय आता मी बाहेर जाऊन बेजबाबदारपणे वागू शकतो!” असं वागून मुळीच चालणार नाही. तुमची शरीरसंस्था बळकट होण्यासाठी य गोष्टी तुम्ही काही काळासाठी करत राहायच्या आहेत जेणेकरून जेव्हा कुठला नवीन विषाणू येईल तेव्हा त्याचा सामना करण्यासाठी आपण सक्षम असू.

७. स्वत:ला आनंदी ठेवा 

मानसिक दू:ख आणि ताण-तणाव यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ति निश्चितच खालावते. स्वत:ला आनंदी, उत्साही, आणि जोशानी सळसळत ठेवणं हा सुद्धा रोगप्रतिकार शक्ति आणि तुमचं एकंदर शरीर अधिक सुदृढ ठेवण्याचा एक निश्चित मार्ग आहे.

आनंदी, उत्साही आणि विवेकशील लोक प्रत्येक गोष्टीबाबत अत्यंत गंभीर असणार्‍या लोकांपेक्षा कुठल्याही परिस्थितीचा अधिक चांगल्या प्रकारे सामना करू शकतात. महत्वाच म्हणजे, जर तुम्ही घाबरून गेलात तर तुम्ही पंगु होऊन जाता. तुमचे सर्व अंग-प्रत्यंग व्यवस्थित असणं फार महत्वाच आहे जेणेकरून तुमचं शरीर आणि तुमचा मेंदू गरज असेल त्यानुसार कार्य करत रहातील.

८. ईशा क्रिया करा‘मी’ म्हणजे काय आणि ‘माझं’ म्हणजे काय या दोन गोष्टींमधला फरक आपण ओळखू शकत नाही, ही एक मूलभूत चूक आपण केली आहे. ज्या गोष्टी आपण गोळा केल्यात त्या आपल्याच आहेत, त्याबादल आपण कुठला वाद करत नाहीये, पण त्या गोष्टी म्हणजे ‘मी’ असू शकत नाही. इतकंच! हे कपडे म्हणजे मीच आहे आहे मी म्हणू लागलो तर त्याचा अर्थ मला वेड लागलंय. त्याचप्रकारे मी असं म्हणालो की हे शरीर आणि या मनात गोळा झालेल्या गोष्टी – ज्या मला माहीत आहेत आणि ज्या माहीत नाहीत – त्या म्हणजेच मी आहे तर ही एक समस्या आहे. तुमच्या आयुष्यात त्यामुळे रोजचं प्रचंड गोंधळ उडत आहे, पण अशा संकटाच्या वेळी ही गोष्ट अधिक ठळकपणे दिसून येऊ शकते. यावर आमच्याकडे एक सोपा उपाय आहे: ईशा क्रिया – तुम्ही काय आहात आणि काय नाही आहात या दोन गोष्टींमद्धे अंतर निर्माण करण्यासाठी एक सोपी क्रिया. प्रत्येकाला वापरता यावी म्हणून ही क्रिया मोफत देऊ केली आहे. तुम्ही काय आहात आणि काय नाही आहात हे समजण्या येवढी सजगता तुम्ही तुमच्या आयुष्यात आणली तर अश्या संकटकाळातून बाहेर पडणं अगदी सोपं असेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या