शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
6
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
7
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
8
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
9
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
10
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
11
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
12
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
13
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
14
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
15
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
16
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
17
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
18
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
19
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
20
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 

Dahi Handi 2024: दही हंडी हा केवळ सण नाही, तर त्यात आहे सामाजिक बांधिलकीचा संदेश!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 10:03 AM

Dahi Handi 2024: सद्यस्थितीत उत्सवाचे स्वरूप बीभत्सतेकडे झुकत असल्याने त्याचे मूळ स्वरूप समजावून घेणे ही आपली सांस्कृतिक जबाबदारी आहे!

आज दही हंडी (Dahi Handi 2024). बाळकृष्णाने सुरु केलेला हा उत्सव अगदी कलियुगातही आनंदाने  साजरा  केला जातो. पण उत्सवाचा मूळ उद्देश विसरून चालणार नाही. मग ती दही हंडी असो नाहीतर गणेशोत्सव. आपल्याला उत्सव साजरा करायचा आहे, उन्माद नाही. पुढच्या पिढीसमोर चांगला आदर्श ठेवायचा असेल आणि संस्कृतीचे योग्य प्रकारे हस्तांतरण करायचे असेल तर मूळ गाभा आपणही समजून घेऊया.  

दही हंडी हा उत्सव एकतेचा संदेश देणारा सण आहे. अलीकडच्या काळात या उत्सवाचे स्वरूप व्यापक बनले आहे. दही हंडीमध्ये सहभागी होणारे बालगोपाल आणि त्यांना प्रोत्साहन द्यायला जमलेली गर्दी उत्सवमय झालेली असते. ही बाब एकार्थी आनंदाची आहेच, पण उत्सवादरम्यान बॉलिवूडच्या उत्तेजक गाण्यांवर नाच, मद्यपान केलेल्या मंडळींची झिंग आणि लाखो रुपयांच्या किमतीचे बक्षीस मिळण्यावरून गोविंदा पथकांमध्ये होणारी हमरी तुमरी, उंचच उंच थर लावण्याच्या नादात झालेले अपघात, मृत्यू यामुळे उत्सवाच्या मूळ हेतूला गालबोट लागते. बीभत्स स्वरूप प्राप्त होते. कर्णकर्कश स्पीकर मुळे कधी एकदा तो दही काला उत्सव संपतो याची स्थानिक वाट बघत बसतात आणि अशी परिस्थिती निर्माण होणे हे दुर्दैवी आहे. 

श्रीकृष्णने सर्व स्तरातल्या, सर्व वयोगटातल्या सवंगड्यांना सोबत घेऊन दह्या दुधाची चोरी केली आणि कंसाच्या दुष्ट वागणुकीला आळा घातला. त्याच्या घरात दह्या दुधाचे डेरे होते. त्याला कसलीही कमतरता नव्हती. तरीसुद्धा श्रीमंत घरात वाढलेला कृष्ण सवंगड्यांच्या हक्कासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि गोकुळ वासियांमध्ये कंसाची दहशत कमी करण्यासाठी मानवी मनोरे रचतो. संघटन केल्याशिवाय अशा कामांना यश मिळत नाही हे दाखवून देतो आणि आनंदाचे नवनीत स्वतः खातो आणि मित्रांना खिलवतो. ही निरागसता आणि सच्चा भाव आजच्या उत्सवातही अभिप्रेत आहे. जेणेकरून संस्कृतीचे मांगल्य टिकून राहील. 

हा 'पण' आपल्याला पूर्ण करायचा आहे तोही संस्कृती रक्षक बनून. त्यामुळे उत्सवाचा आनंद द्विगुणित होईल आणि ढाक्कू माकुम्म करायला आबाल वृद्धही आनंदाने पुढे सरसावतील! समानता ही केवळ हक्काची बाब नाही तर ती समाजातल्या प्रत्येक दुर्बल घटकाला मिळवून देणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. हे लक्षात घेऊया आणि उत्सवाचा आनंद द्विगुणित करूया. 

Dahi Handi 2024: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात का धुवायचे नाहीत? जाणून घ्या कारण!

टॅग्स :Dahi HandiदहीहंडीShravan Specialश्रावण स्पेशलPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३