शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

Dasbodh Jayanti 2022: समर्थ रामदास स्वामींनी ३०० वर्षांपूर्वी रचलेल्या दासबोधाची आजही अवीट गोडी; पाहा, जन्मकथा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 2:50 PM

Dasbodh Jayanti 2022: समर्थ रामदास स्वामींनी १७ व्या शतकात रचलेल्या दासबोधाची आजही अनेक ठिकाणी पारायणे केली जातात.

जे जे आपणासि ठावे। ते ते इतरांसि शिकवावे। शहाणे करून सोडावे सकळ जन।।, अशी शिकवण देणाऱ्या समर्थ रामदास स्वामी (Samartha Ramdas Swami) यांनी अनेकविध श्लोक, स्तोत्रे, ग्रंथ यांच्या माध्यमातून परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांची शिकवण पक्की करणाऱ्या ज्ञानाचा प्रसार करत महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. रामाची आणि हनुमंताची उपासना करणाऱ्या रामदास स्वामी यांनी सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचे सामर्थ्य लोकांना पटवून दिले. राजकारण आणि धर्मकारणावर प्रखर भाष्य करणारे समर्थ रामदास हे एकमेव संत होते. समर्थ रामदासांच्या रचनांमधील सर्वांत महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे दासबोध. समर्थ रामदास स्वामी यांनी माघ शुद्ध नवमी या दिवशी दासबोध ग्रंथाची रचना केल्याचे सांगितले जाते. यंदा, १० फेब्रुवारी २०२२ रोजी दासबोध जयंती आहे. (Dasbodh Jayanti 2022)

रामदास स्वामी आणि संत तुकाराम समकालीन होते. समर्थ रामदास स्वामी यांनी १७ व्या शतकात रचलेला दासबोध कालातीत असून, आजच्या काळातही तेवढाच परिपूर्ण वाटतो. लग्नाच्या बोहल्यावर सावधान झालेल्या रामदासांनी संसार कसा करावा, संसार कसा असावा, याचे नेमके ज्ञान दिले. दासबोधाच्या माध्यमातून रामदास स्वामींनी नेटका उपदेश समाजाला केला आहे. सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगत आरोग्याचा गुरुमंत्र देत मनावर ताबा मिळवल्यास अनेक गोष्टी सुलभ होतात, याचे ब्रह्मज्ञान रामदासांनी समाजाला दिले. समर्थ रामदासांनी आपल्या कार्याने महाराष्ट्रधर्म वाढविला. सर्वसामान्य जनतेत भक्तिमार्गातून शक्तीच्या उपासनेचा, संघटित होण्याचा मूलमंत्र दिला. मारुतीच्या उपासनेतून त्या काळातील समाजाला शरीरस्वास्थ्याचा मार्गही दाखविला.

समर्थांनी दासबोध ग्रंथ कुठे रचला?

माघ शुद्ध नवमीला रायगड जिल्ह्यातील तत्कालीन निबीड अरण्यात शिवथरघळ येथे दासबोध ग्रंधाची निर्मिती करण्यात आली, असे सांगितले जाते. रामदास स्वामी यांनी आपले पट्टशिष्य कल्याण स्वामी यांच्याकरवी दासबोध ग्रंथाची निर्मिती केली. दासबोधाला ग्रंथराजाची उपमा दिली जाते. समर्थ रामदास स्वामींचा 'दासबोध' हा ग्रंथ म्हणजे विविध विषयांवरील तत्त्वचिंतनांचे मराठी भाषेतील साहित्याचे अमोल लेणे आहे. 

ग्रंथराज दासबोधाची रचना कशी आहे?

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेला ग्रंथराज दासबोध एकूण २० दशकांमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक दशकात १० समास आहेत. समर्थांनी दोन वेळा दासबोधाची निर्मिती केली, असे सांगितले जाते. पहिला दासबोध ग्रंथ २१ समासाचा होता आणि नंतरचा दासबोध २०० समासी असल्याचे म्हटले जाते. जुन्या आणि नंतरच्या दासबोधाचे एकत्रिकरण केले गेले. त्यावर संपादकीय संस्कार करून अनेक प्रकाशकांनी दासबोधांच्या आवृत्त्या प्रकाशित केल्या. दासबोध ग्रंथाची अनेक ठिकाणी आजही पारायणे केली जातात. 

दासबोध ग्रंथाची वैशिष्ट्ये

रामदास स्वामींनी संसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, विरक्तांना, सर्वसामान्यांना, बालकांना, प्रौढांना, सर्व जाती-पंथ धर्माच्या स्त्री-पुरुषांना आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे. गुरु-शिष्य संवाद असे दासबोध ग्रंधाचे स्वरुप असून, हा ग्रंथ कोणता, त्याचे नाव काय, या ग्रंथात प्रामुख्याने काय सांगितलेले आहे, या ग्रंथामुळे काय मिळेल, अशी माहिती देणाऱ्या ओव्या दासबोध ग्रंथाच्या प्रारंभी येतात. मूर्खांची लक्षणे, नवविधा भक्ती म्हणजे काय, खरे ज्ञान कोणते, वैराग्य म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, या नानाविध गोष्टींचा उहापोह दासबोधात करण्यात आलेला आहे. दासबोधातून रामदासांनी निश्चयात्मक आणि विवेकपूर्ण लिखाण केले आहे. केवळ दशकांच्या नावावरून समर्थांनी मानवी जीवनाचा आणि मानवी मनाचा किती सखोल अभ्यास केला आहे, याची प्रचिती येते. मनाचे श्लोक रचणाऱ्या समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधाचा उल्लेख केवळ ग्रंथराज असाच करता येईल. 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक