शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

Datta Jayanti 2021 : आजपासून दत्त नवरात्रीचा प्रारंभ झाल्यामुळे आपणही दत्त गुरुंचा धावा करूया, जसा तुकाराम महाराजांनी केला!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 2:11 PM

Datta Jayanti 2021 :संत तुकोबारायांनी केलेले श्री दत्ताचे हे सार्थ वर्णन ऐकून तत्क्षणी डोळ्यासमोर उभी राहते, ती श्रीदत्ताची सुंदर मूर्ती.

आजपासून श्री गुरुचरित्र पारायण सप्ताहाला प्रारंभ होईल. श्री गुरुचरित्राचे पठण करणे, हे एक व्रत आहे. व्रत म्हटले की आचार-विचारांची शुद्धता आली. पावित्र्य जपण्याची जबाबदारी आली. अनेकांना या कारणांसाठी गुरुभक्ती करताना काही उणिवा राहून जातील, अशी भीती वाटते. मात्र ही भीती वाटण्याचे कारणच नाही. कारण ती गुरुमाऊली आहे. जी आपले अनंत अपराध पोटात घेते आणि आपल्याला सन्मार्गाची वाट दाखवते. तिथे फक्त अनन्यभावे शरण जाणे अपेक्षित असते. जसे तुकाराम महाराज दत्त गुरूंना शरण गेले. 

तीन शिरे सहा हात। तया माझा दंडवत ॥काखे झोळी पुढे श्वान। नित्य जान्हवीचे स्नान ॥माथा शोभे जटाभार। अंगी विभूती सुंदर ॥शंखचक्रगदा हाती। पायी खडावा गर्जती ॥तुका म्हणे दिगंबर। तया माझा नमस्कार ॥

संत तुकोबारायांनी केलेले श्री दत्ताचे हे सार्थ वर्णन ऐकून तत्क्षणी डोळ्यासमोर उभी राहते, ती श्रीदत्ताची सुंदर मूर्ती. संघर्षमय मानवी जीवनात आश्वासक असा आधार देतात ते श्रीदत्त. भक्तांनी हाक देताच हजर होणारे म्हणून हे दत्त. श्री दत्त हे अत्रीऋषींचे पुत्र म्हणून आत्रेय. ज्या मातेला कुणाविषयीच राग.. व्देष.. असूया नाही ती 'अनसूया' अशा मातेचे हे पुत्र. कुणाविषयी असूया नसणे हा सुखी राहण्याचा मंत्र. मग याच अनसूयेच्या पोटी जगाला सुखाचा मार्ग दाखविणारा आनंद जन्मतो.  

श्री गुरुसारखा असता  पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी !!" याच विश्वासाने जगतांना हा प्रचंड आत्मविश्वास देणाऱ्या श्री गुरुदेव दत्तांच्या चरणाशी भक्त गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणास बसले आहेत. दत्त भक्तांसाठी गुरुचरित्र हा पंचम वेदच. परमेश्वर अवतारानंतर गुरु म्हणून पहिला अवतार म्हणजे श्री दत्तगुरु. रज, सत्व, तम या तिन्ही गुणांचा संगम म्हणजे श्री दत्तगुरु. अशा दत्त गुरूंच्या सेवेत श्री गुरुचरित्राचे पठण जरी करता आले नाही, तरी दोन हस्तक आणि तिसरे मस्तक जोडून मागणे मागायचे,

दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो,दत्ता दिगंबरा याहो सावळ्या मला भेट द्या हो,दत्ता दिगंबरा या हो दयाळा मला भेट द्या हो।