शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
3
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
4
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
5
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
6
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
7
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
8
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
9
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
10
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
11
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
12
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
13
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
14
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
15
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
16
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
17
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
18
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
19
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
20
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली

Datta Jayanti 2022: दत्तजयंती: ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणा अन् दत्त महाराजांचे शुभाशिर्वाद मिळवा; पुण्य कमवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2022 3:22 PM

Datta Jayanti 2022: दत्तजयंतीला म्हणायला सुलभ आणि सोपे असलेल्या श्रीदत्त अथर्वशीर्ष स्तोत्राचे पठण करणे शुभ मानले जाते.

Datta Jayanti 2022: मराठी वर्षातील महत्त्वाचा आणि शुभ मानला जाणारा महिना म्हणजे मार्गशीर्ष. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्तजयंती साजरी केली जाते. मार्गशीर्ष पौर्णिमेला मृगशीर्ष नक्षत्रावर प्रदोषकाळी दत्तात्रेयाचा जन्म झाल्याची मान्यता आहे. देशभरातील अनेक ठिकाणी दत्तजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. काही ठिकाणी दत्त नवरात्र साजरे केले जाते. तर विशेष करून दत्तजयंतीनिमित्ताने गुरुचरित्राचे पारायणही केले जाते. सन २०२२ मध्ये ७ डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे.

अत्रि-अनसूया या दांपत्याचा पुत्र मानल्या गेलेल्या दत्तात्रेयाचा जन्म ब्रह्मा-विष्णू-महेश यांचा अंश एकत्रित होऊन झाल्याची कथा सुपरिचित आहे. या तिघांचा अंश म्हणून दत्तात्रेयाची त्रिमुखी आणि सहा हातांची सगुणमूर्ती सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आहे. मात्र, मुळात पुराणात एकमुखी आणि द्विभुज अथवा चतुर्भुज अशा दत्ताचे वर्णन आढळते. विशेष म्हणजे दत्तोपासनेत ध्यानासाठी त्रिमुखी दत्ताचे सगुणरूप आणि पूजाविधीसाठी पादुकांना महत्त्व दिले गेलेले असते. नरसोबाची वाडी, औदुंबर, गाणगापूर या सर्व प्रसिद्ध दत्तक्षेत्री अशा पादुकांचीच स्थापना केलेली आढळते. दत्त महाराजांचे अनेक अवतार झाल्याचे सांगितले जाते. दत्त महाराजांच्या उपासनेत अनेकविध स्तोत्रे, आरत्या, श्लोक, मंत्रपठण केले जाते. यात ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ला विशेष मान्यता आहे. 

‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’

ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय अवधूताय दिगम्बरायविधिहरिहराय आदितत्त्वाय आदिशक्तये ॥ १॥त्वं चराचरात्मकः सर्वव्यापी सर्वसाक्षी त्वं दिक्कालातीतः त्वं द्वन्द्वातीतः ॥ २॥त्वं विश्वात्मकः त्वं विश्वाधारः विश्वेशः विश्वनाथः त्वं विश्वनाटकसूत्रधारः त्वमेव केवलं कर्तासि त्वं अकर्तासि च नित्यम् ॥ ३॥त्वं आनन्दमयः ध्यानगम्यः त्वं आत्मानन्दः त्वं परमानन्दः त्वं सच्चिदानन्दःत्वमेव चैतन्यः चैतन्यदत्तात्रेयः ॐ चैतन्यदत्तात्रेयाय नमः ॥ ४॥त्वं भक्तवत्सलः भक्ततारकः भक्तरक्षकः दयाघनः भजनप्रियः त्वं पतितपावनः करुणाकरः भवभयहरः ॥ ५॥त्वं भक्तकारणसम्भूतः अत्रिसुतः अनसूयात्मजः त्वं श्रीपादश्रीवल्लभः त्वं गाणगग्रामनिवासी श्रीमन्नृसिंहसरस्वती त्वं श्रीनृसिंहभानः अक्कलकोटनिवासी श्रीस्वामीसमर्थः त्वं करवीरनिवासी परमसद्गुरु श्रीकृष्णसरस्वती त्वं श्रीसद्गुरु माधवसरस्वती ॥ ६॥त्वं स्मर्तृगामी श्रीगुरूदत्तः शरणागतोऽस्मि त्वाम् । दीने आर्ते मयि दयां कुरु तव एकमात्रदृष्टिक्षेपः दुरितक्षयकारकः ।हे भगवन्, वरददत्तात्रेय, मामुद्धर, मामुद्धर, मामुद्धर इति प्रार्थयामि । ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ७॥॥ ॐ दिगम्बराय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात् ॥

॥ श्री गुरुदेव दत्त ॥

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :spiritualअध्यात्मिक