शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

Datta Jayanti 2023: दत्त नवरात्र सुरू होतेय, या काळात कशी करावी दत्त उपासना? सविस्तर जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 10:01 AM

Datta Jayanti 2023: मार्गशीर्षात वेध लागतात दत्त जयंतीचे, ही नवरात्र कशी साजरी करायची याबद्दल संतांचे मार्गदर्शन घेऊया. 

मार्गशीर्ष अष्टमीपासून दत्त नवरात्र सुरु होत आहे आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंतीला नवरात्र समाप्ती. यंदा तारखेनुसार २० ते २६ डिसेंबर २०२३ या दरम्यान दत्त नवरात्र साजरी केली जाईल. श्री गुरुचरित्र पारायण सप्ताहाला प्रारंभ होईल. श्री गुरुचरित्राचे पठण करणे, हे एक व्रत आहे. व्रत म्हटले की आचार-विचारांची शुद्धता आली. पावित्र्य जपण्याची जबाबदारी आली. अनेकांना या कारणांसाठी गुरुभक्ती करताना काही उणिवा राहून जातील, अशी भीती वाटते. मात्र ही भीती वाटण्याचे कारणच नाही. कारण ती गुरुमाऊली आहे. जी आपले अनंत अपराध पोटात घेते आणि आपल्याला सन्मार्गाची वाट दाखवते. तिथे फक्त अनन्यभावे शरण जाणे अपेक्षित असते. जसे तुकाराम महाराज दत्त गुरूंना शरण गेले. 

तीन शिरे सहा हात। तया माझा दंडवत ॥काखे झोळी पुढे श्वान। नित्य जान्हवीचे स्नान ॥माथा शोभे जटाभार। अंगी विभूती सुंदर ॥शंखचक्रगदा हाती। पायी खडावा गर्जती ॥तुका म्हणे दिगंबर। तया माझा नमस्कार ॥

संत तुकोबारायांनी केलेले श्री दत्ताचे हे सार्थ वर्णन ऐकून तत्क्षणी डोळ्यासमोर उभी राहते, ती श्रीदत्ताची सुंदर मूर्ती. संघर्षमय मानवी जीवनात आश्वासक असा आधार देतात ते श्रीदत्त. भक्तांनी हाक देताच हजर होणारे म्हणून हे दत्त. श्री दत्त हे अत्रीऋषींचे पुत्र म्हणून आत्रेय. ज्या मातेला कुणाविषयीच राग.. व्देष.. असूया नाही ती 'अनसूया' अशा मातेचे हे पुत्र. कुणाविषयी असूया नसणे हा सुखी राहण्याचा मंत्र. मग याच अनसूयेच्या पोटी जगाला सुखाचा मार्ग दाखविणारा आनंद जन्मतो.  

श्री गुरुसारखा असता  पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी !!" याच विश्वासाने जगतांना हा प्रचंड आत्मविश्वास देणाऱ्या श्री गुरुदेव दत्तांच्या चरणाशी भक्त गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणास बसले आहेत. दत्त भक्तांसाठी गुरुचरित्र हा पंचम वेदच. परमेश्वर अवतारानंतर गुरु म्हणून पहिला अवतार म्हणजे श्री दत्तगुरु. रज, सत्व, तम या तिन्ही गुणांचा संगम म्हणजे श्री दत्तगुरु. अशा दत्त गुरूंच्या सेवेत श्री गुरुचरित्राचे पठण जरी करता आले नाही, तरी दोन हस्तक आणि तिसरे मस्तक जोडून मागणे मागायचे,

दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो,दत्ता दिगंबरा याहो सावळ्या मला भेट द्या हो,दत्ता दिगंबरा या हो दयाळा मला भेट द्या हो।

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३