शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
2
तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला
3
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ
4
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
6
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
7
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
8
GST सह सोन्याचा दर पोहचला १,००,००० प्रति तोळा; ग्राहकांना २० टक्के परतावा
9
रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा
10
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
11
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे
12
२१ वर्ष पूर्ण झालेल्या नव्याने पात्र ठरणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’ना केव्हा मिळणार लाभ?
13
विमानतळावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना नाहक त्रास नको; हायकोर्टाने कंपन्यांना फटकारले
14
कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू
15
प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग
16
क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला
17
चॅटजीपीटीचा वापर करून २ बहिणींनी केली कमाल; वाचवले तब्बल १० हजार डॉलर्स
18
‘पॉवर’ दाखवा, पृथ्वीला मूठभर अब्जाधीशांच्या आर्थिक दादागिरीतून सोडवा!
19
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
20
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत

दत्त जयंती: इच्छा आहे, पण गुरुचरित्र पारायण शक्य नाही? ‘हे’ स्तोत्र म्हणा, पूर्ण पुण्य मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 14:42 IST

Bavan Shloki Gurucharitra On Datta Jayanti 2024: मनापासून इच्छा असूनही अनेक गोष्टींमुळे गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही. अशावेळी केवळ १० मिनिटांत होणारे अत्यंत प्रभावी स्तोत्र आवर्जून म्हणावे, असे सांगितले जाते. जाणून घ्या...

Bavan Shloki Gurucharitra On Datta Jayanti 2024: मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. १४ डिसेंबर २०२४ रोजी दत्त जयंती आहे. मार्गशीर्ष पौर्णिमा सायंकाळी ०४ वाजून ५९ मिनिटांनी सुरू होत असून, १५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ०२ वाजून ३१ मिनिटांनी समाप्त होत आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. दत्तात्रेय, दत्त किंवा दत्तगुरु‌ हे ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन देवतांचा अवतार आणि एकत्रित रूप मानले जाते. दत्त जयंतीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी गुरुचरित्राचे पारायण केले जाते. श्रीगुरुचरित्र या ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७,४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकाण्ड, कर्मकाण्ड, भक्तिकाण्ड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे, याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने  आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे. 

दत्त संप्रदायात गुरुचरित्रण पारायणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात. अपार पुण्य लाभते. दत्तगुरुंची विशेष कृपा होते, अशी मान्यता आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात कितीही इच्छा असली, तरी सर्व नियम पाळून गुरुचरित्र पारायण करणे, त्यासाठी तेवढा वेळ देणे, शक्य होतेच असे नाही. गुरुचरित्राचे पारायण करावे, अशी मनापासून इच्छा असते, परंतु, अनेक गोष्टींमुळे, व्यवधानांमुळे शक्य होत नाही. पण निराश होण्याची आवश्यकता नाही. यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे बावनश्लोकी गुरुचरित्र. हे अतिशय प्रभावी स्तोत्र असून, अवघ्या १० ते १५ मिनिटांत म्हणून पूर्ण होऊ शकते. एकदा सवय झाली की, यापेक्षाही कमी वेळ लागू शकतो. 

बावनश्लोकी गुरुचरित्र फलश्रुती

श्रीदत्त साहित्यात बावनश्लोकी गुरुचरित्रास फार महत्त्व आहे. संपूर्ण गुरुचरित्राचे महत्त्वाचे सार यात दिलेले आहे. बावन श्लोकांत संपूर्ण गुरुचरित्र सांगितलेले आहे. हे गुरुचरित्र सार श्लोकात्मक आहे. परम दत्तभक्तांनी याचे नित्यपठण करावे. किमान गुरुवार किंवा पौर्णिमेला एकदा पठण करावे. बावनश्लोकी गुरुचरित्राच्या पठणाने जीवनात उद्भवणाऱ्या समस्या सोसण्याचे बळ मिळून त्या समस्यांची तीव्रता कमी झाल्याचे जाणवेल. कल्याण होईल, असे आशिर्वचन देण्यात आले आहे. 

बावनश्लोकी गुरुचरित्र

श्रीगणेशाय नमः । श्रीदत्तात्रैयगुरुवे नमः ॥

अथ ध्यानम्

दिगंबरं भस्मसुगंधलेपनं चक्रं त्रिशूलं डमरुं गदांच ।पद्मासन्स्थं रविसोमनेत्रं दत्तात्रयं ध्यानमभिष्ट सिद्धिदम् ॥ १ ॥

काषायवस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखम् ।चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ २ ॥

कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनंदनः ।द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादश्रीवल्लभः ॥ ३ ॥

ॐ नमोजी विघ्नहरा । गजानना गिरिजाकुमरा । जयजयाजी लंबोदरा । शकदंता शूर्पकर्णा ॥ १ ॥ त्रिमूर्तिराजा गुरु तूंचि माझा । कृष्णातिरी वास करुनी ओजा ॥सद्भक्त तेथे करिती आनंदा । त्या देव स्वर्गी बघती विनोदा ॥ २ ॥ जयजयाजी सिद्धमुनी । तूं तारक भवार्णंवातुनी ।संदेह होता माझे मनीं । आजि तुवां कुडें केलें ॥३॥

ऐशी शिष्याची विनंती । ऐकूनि सिद्ध काय बोलती ।साधु साधु तुझी भक्ति । प्रीती पावो श्रीगुरुचरणीं ॥४॥

भक्तजन रक्षणार्थ । अवतरला श्रीगुरुनाथ ।सगरपुत्रा कारणें भगीरथें । गंगा आणिली भूमंडळीं ॥५॥

तीर्थें असती अपार परी । समस्त सांडूनि प्रीति करी ।कैसा पावला श्रीदत्तात्री । श्रीपादश्रीवल्लभ ॥६॥

ज्यावरीं असे श्रीगुरुची प्रीति । तीर्थमहिमा ऐकावया चित्तीं ।वांछा होतसे त्या ज्ञानज्योती । कृपामूर्ति गुरुराया ॥७॥

गोकर्णक्षेत्रीं श्रीपादयती । राहिले तीन वर्षें गुप्ती ।तेथूनि गुरु गिरिपुरा येती । लोकानुग्रहाकारणें ॥८॥

श्रीपाद कुरवपुरीं असता । पुढें वर्तली कैसी कथा ।विस्तारुनि सांग आतां । कृपामूर्ति दातारा ॥९॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । श्रीगुरुमहिमा काय पुससी ।अनंतरुपें परियेसी । विश्वव्यापक परमात्मा ॥१०॥

सिद्ध म्हणे ऐक वत्सा । अवतार झाला श्रीपाद हर्षा ।पूर्व वृत्तांत ऐकिला ऐसा । कथा सांगितली विप्रस्त्रियेची ॥११॥

श्रीगुरु म्हणती जननीसी । आम्हां ऐसा निरोप देसी ।अनित्य शरीर तूं जाणसी । काय भंरवसा जीवित्वाचा ॥१२॥

श्रीगुरुचरित्र कथामृत । सेवितां वांछा अधिक होत ।शमन करणार समर्थ । तूंचि एक कृपासिंधु ॥१३॥

ऐकूनि शिष्याचें वचन । संतोष करी सिद्ध आपण ।श्रीगुरुचरित्र कामधेनु जाण । सांगता झाला विस्तारें ॥१४॥

ऐक शिष्या शिरोमणी । धन्य धन्य तुझी वाणी ।तुझी भक्ति श्रीगुरुचरणीं । लीन झाली परियेसी ॥१५॥

विनवी शिष्य नामांकित । सिद्ध योगियातें पुसत ।सांग स्वामी वृत्तांत । श्रीगुरुचरित्र विस्तारें ॥१६॥

ऐक शिष्या नामकरनी । श्रीगुरुभक्त शिखामणी ।तुझी भक्ति श्रीगुरुचरणीं । लीन झाली निर्धारें ॥१७॥

ध्यान लागलें श्रीगुरुचरणीं । तृप्ति नोहे अंतःकरणीं ।कथामृत संजीवनी । आणिक निरोपाची दातारा ॥१८॥

अज्ञान तिमिर रजनींत । निजलो होतो मदोन्मत्त ।श्री गुरुचरित्र वचनामृत । प्राशन केलें दातारा ॥१९॥

स्वामी निरोपिलें आम्हांसी । श्रीगुरु आले गाणगापुरासी ।गौप्यरुपें अमरपुरासी । औदुंबरीं असती जाण ॥२०॥

सिद्ध म्हणे नामधारका । ब्रह्मचारी कारणिका ।उपदेशी ज्ञान विवेका । तये प्रेंत जननीसी ॥२१॥

तुझा चरणसंपर्क होता । झालें ज्ञान मज आतां ।परमार्थीं मन ऐकतां । झालें तुझें प्रसादें ॥२२॥

लोटांगणें श्रीगुरुसी । जाऊनि राजा भक्तीसीं ।नमस्कारी विनयेसी । एकभावें करुनियां ॥२३॥

शिष्यवचन परिसुनी । सांगता झाला सिद्धमुनी ।ऐक भक्ता नामकरणी । श्रीगुरुचरित्र अभिनव ॥२४॥

सिद्ध म्हणे ऐक बाळा । श्रीगुरुची अगम्य लीला ।सांगतां न सरे बहुकाळा । साधारण मी सांगतसे ॥२५॥

श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । नको भ्रमू रे युक्तीसी ।वेदांत न कळे ब्रह्मायासी । अनंत वेद असती जाण ॥२६॥

चतुर्वेद विस्तारेंसी । श्रीगुरु सांगती विप्रासी ।पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारावी दातारा ॥२७॥

नामधारक म्हणे सिद्धासी । पुढील कथा सांगा आम्हांसी ।उल्हास होतो माझे मानसीं । श्रीगुरुचरित्र अति गोड ॥२८॥

पुढें कथा कवणेपरी । झाली असे गुरुचरित्रीं । निरुपावें विस्तारीं । द्धमुनी कृपासिंधू ॥२९॥

श्रीगुरुचरित्र सुधारस । तुम्हीं पाजिला आम्हांस ।परि तृप्त नव्हे गा मानस । तृषा आणिक होतसे ॥३०॥

सिद्ध म्हणे नामधारका । पुढें अपूर्व झालें ऐका ।योगेश्वर कारणिका । सांगे स्त्रियांचे स्वधर्म ॥३१॥

पतिव्रतेच्या रीती । सांगे देवांसी बृहस्पती ।सहगमनाची फलश्रुती । येणें परी निरुपिली ॥३२॥

श्रीगुरु आले मठासी । पुढें कथा वर्तली कैसी ।विस्तारुनि आम्हांसी । निरुपावें स्वामिया ॥३३॥

श्रीगुरु म्हणती दंपतीसी । ऐका पाराशरऋषि ।तया काश्मीररायासी । रुद्राक्षमहिमा निरुपिला ॥३४॥

पुढें कथा कैसी वर्तली । विस्तारुनि सांगा वहिली ।मति असे माझी वेधिली । श्रीगुरुचरित्र ऐकावया ॥३५॥

गाणगापुरीं असतां श्रीगुरु । महिमा झाला अपरंपारु ।सांगतां न ये विस्तारु । तावन्मात्र सांगतसे ॥३६॥

ऐसा श्रीगुरु दातारु । भक्तजनां कल्पतरु ।सांगतां झाला आचारु । कृपा करुनि विप्रांसी ॥३७॥

आत झालों मी तृषेचा । घोट भरवीं गा अमृताचा ।चरित्रभाग सांगें श्रीगुरुचा । माझें मन निववीं वेगीं ॥३८॥

सिद्ध म्हणे नामधारका । पुढें अपूर्व झालें ऐका ।साठ वर्षें वांझ देखा । पुत्रकन्या प्रसवली ॥३९॥

सिद्ध म्हणे नामधारका । अपूर्व वर्तलें आणिक ऐका ।वृक्ष झाला काष्ट सुका । विचित्र कथा परियेसा ॥४०॥

जयजयाजी सिद्धमुनी । तूं तारक या भवार्णवांतुनी ।नाना धर्म विस्तारुनि । श्रीगुरुचरित्र निरुपिलें ॥४१॥

मागें कथा निरुपिलें । सायंदेव शिष्य भले ।श्रीगुरुंनीं त्यासी निरुपिलें । कलत्रपुत्र आणि म्हणती ॥४२॥

श्रीगुरु म्हणती द्विजांसी । या अनंत व्रतासी ।सांगेन ऐका तुम्हांसी । पूर्वीं बहुतीं आराधिलें ॥४३॥

श्रीगुरु माझा मल्लिकार्जुन । पर्वत म्हणजे श्रीगुरुभवन ।आपण नये आतां येथून । सोडूनि चरण श्रीगुरुचे ॥४४॥

तूं भेटलासी मज तारक । दैन्य गेले सकळहि दुःख ।सर्वाभीष्ट लाधलें सुख । श्रीगुरुचरित्र ऐकतां ॥४५॥

गाणगापुरीं असतां श्रीगुरु । ख्याति झाली अपारु ।लोक येती थोरथोरु । भक्त बहुत झाले असती ॥४६॥

सांगेन ऐका कथा विचित्र । जेणें होय पतित पवित्र ।ऐसें हें श्रीगुरुचरित्र । तत्त्परतेसी परियेसा ॥४७॥

श्रीगुरु नित्य संगमासी । जात होते अनुष्ठानासी ।मार्गांत शूद्र परियेसी । शेतीं आपुल्या उभा असे ॥४८॥

त्रिमूर्तींचा अवतार । वेषधारी झाला नर ।राहिलें प्रीतीं गाणगापुर । कवण क्षेत्र म्हणूनियां ॥४९॥

तेणें मागितला वर । राज्यपद धुरंधर ।प्रसन्न झाला त्यासी गुरुवर । दिधला वर परियेसा ॥५०॥

राजभेटी घेउनी । श्रीपाद आले गाणगाभुवनीं ।योजना करिती आपुले मनीं । गौप्य रहावें म्हणूनियां ॥५१॥

म्हणे सरस्वती गंगाधर । श्रोतयां करी नमस्कार ।कथा ऐका मनोहर । सकळाभीष्ट साधेल ॥५२॥

॥ इति श्रीगुरुचरित्रकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे द्विपंचाशत् श्लोकात्मकं गुरुचरित्रं संपूर्णम् ॥

॥ दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा ॥

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥ 

टॅग्स :datta jayantiदत्त जयंतीshree gurucharitraसंपूर्ण श्री गुरुचरित्र अध्यायshree datta guruदत्तगुरुspiritualअध्यात्मिकPuja Vidhiपूजा विधी