शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Datta Jayanti 2024:निर्मळ मनाने साद घातली असता दत्त गुरु भेटीला येतात; ऐका 'हे' सुंदर भजन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 11:01 IST

Datta Jayanti 2024: परमेश्वराला आर्त साद घातली तर तो कोणत्याही क्षणी प्रगट होतो, भेट घेतो, याची ग्वाही देणारे सुंदर दत्त भजन!

संत महंतांनंतर या महाराष्ट्राला दत्त भजनाची गोडी लावली, ती आर. एन. पराडकर यांच्या गोड आवाजानी. त्यांच्या असंख्य प्रचलित भजनांपैकी एक भजन म्हणजे, दत्त गुरूंची प्रदक्षिणा-

धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची,  झाली त्वरा सूरवरा विमान उतरायाची।।  गुरुभजनाचा महिमा न कळे आगमा निगमासी, अनुभवी ते जाणती जे गुरूपदीचे रहिवासी ।। पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशि, सर्वही तीर्थे घडली आम्हा आदि करुनी काशी ।। मृदुंग टाळ घोळ भक्त भावार्थे गाती,  नाम संकीर्तने नित्यानंदे नाचती ।।   कोटी ब्रम्हहत्या हरिती करिता दंडवत,  लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात।।   प्रदक्षिणा करुनी देह भावे वाहिला,  श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला ||

दत्तजयंतीला आमचे मंदिरात दरवर्षी एक भक्त खड्या आवाजात दत्त जन्म,  आरती, कीर्तन, पुष्पांजली झाली की ही “प्रदक्षिणा” म्हणत असे. लहानपणापासून  ऐकल्यामुळे ती गोडीच लागली. आणि आजही ती कायम आहे. तो जो प्रसंग असेल तो डोळ्यासमोर उभा राहतो. आणि “भक्त आनंदाचे डोही आनंद तरंग” होतो. खरेच हा सोहळा पाहायला सूरवरांची विमाने घिरट्या घालत असतील परंतु येथील प्रचंड गर्दीत त्यांना धावपट्टीच मिळत नसेल (लॅंडींग करायला) उतरायला. 

आजपर्यंत अनेक आले आणि गेले. पण त्यांना गुरु उमगले नाहीत. म्हणून तर “नेती नेती शब्द, न ये अनुमाना” “ चारी (ऋग्वेद,यजुर्वेद, सामवेद,अथर्ववेद) श्रमले परंतु न बोलवे काही, साही (षटशास्त्रे) विवाद करिता पडले प्रवाही” “अभाग्यासी कैसी न कळे ही मात” “पराही परतली कैसा हा हेत” वाणीचे चारही प्रकार (परा, पश्यन्ति,  मध्यमा,  वैखरी) गुरूंचे वर्णन करतांना थकले तेथे आपले अस्तित्व ते काय? ज्यांना उमगले ते मात्र “गुरुपदीचे रहिवासी” झाले. ते सांगायला जागेवर आहेत कोठे? “दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन” दत्तस्वरूप झाले आहेत. 

प्रदक्षिणा हा षोडशोपचारातील एक संस्कार आहे. स्वत:भोवती किंवा जमल्यास देवळाभोवती, मूर्तीभोवती, गाभाऱ्याभोवती उजवीकडून डावीकडे स्वतः जाऊन जशी देवालाच प्रदक्षिणा घालत आहोत असा विचार करणे व कृती करणे. ईश्वर सगळीकडे भरला आहे, मग त्याला दाही दिशांनाही नको का पाहायला, “डोळ्यान पाहीन रूप तुझे” साठवून ठेवीन माझ्या हृदयात कायमचा. ओझरते का होईना दर्शन व्हायलाच हवे. कारण आजकाल सगळीकडे गर्दिच गर्दी, त्यात ते लाइन लावणे, वशिला, ओळख पाळख, पैसे देऊन, देणगी देऊन, लाइन तोडून दर्शन घ्यायचे किती दुष्कर, आणि शेवटाला मूर्तीच्या जवळ आलो की तेथील व्यवस्थापक आपले डोके आपटणार आणि “उभा क्षणभरी” काय दर्शन घेणार. म्हणून प्रदक्षिणा. 

ज्याअर्थी आपण त्याला सगळीकडे व सर्व बाजूने बघत आहोत, म्हणजे तो सुद्धा आपल्या भक्तांना बघत असेलच ना!! “माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश” 

नामदेवांचे मधुर कीर्तन ऐकतांना विठ्ठलाला राहवले नाही, त्याला मंदिरात कीर्तन करायला बंदी केल्यावर, साक्षात मंदिरानेच प्रदक्षिणा घातली आणि विठ्ठलाला नामदेवांचे म्हणजे आपल्या भक्ताचे दर्शन घडले. 

आता कळले का प्रदक्षिणेचे महत्व? कोणी भेटले नाही की आपण म्हणतो ना तोपर्यंत जवळच एक राऊंड मारून येतो, ना तसे. तो एक क्षण पकडायचा असतो विलक्षण. चला तर १४ डिसेंबर रोजी दत्त जयंतीच्या (Datta Jayanti 2024) मुहूर्तावर दत्त गुरूंना साद घालूया आणि त्यांची भेट घेऊया! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 

 

टॅग्स :datta jayantiदत्त जयंतीshree datta guruदत्तगुरुmusicसंगीत