शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

दत्तभक्त आणि आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची १७ फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी; अधिक जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 3:05 PM

भारत मातेचे सुपुत्र संसारावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्य लढ्यासाठी सज्ज झाले, तरी देशभक्तीबरोबर देवभक्ती कधीच विसरले नाहीत त्याचेच हे उदाहरण!

समाजकार्य, राष्ट्रकार्य, धर्मकार्य हाती घेत असताना आध्यात्मिक बैठकही तितक्याच ताकदीची असावी लागते, हे ज्यांनी सिद्ध केले, ते आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांची आज जयंती आहे. त्यांना सशस्त्र क्रांतीचे जनकही म्हटले जाते. त्यांच्या घरात ना क्रांतीचे वारे होते, ना देशभक्तीचे बाळकडू. तरीदेखील केवळ आपल्या मातृभूमीची ब्रिटीशांच्या तावडीतून सुटका व्हावी, म्हणून सर्वसामान्य घरातला एक तरुण सोन्यासारखी नोकरी झुगारून स्वातंत्र्ययज्ञात आपल्या प्राणांची आहुती देतो, त्या बलिदानाचे मोल राखणे आपले कर्तव्य आहे.

वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म पनवेल जवळील शिरढोण येथे ४ नोव्हेंबर १८४५ रोजी झाला. कल्याण येथे प्राथमिक शिक्षण संपवून ते इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी मुंबईत आले. गिरगावातील फणसवाडी येथील जगन्नाथाचे चाळीत वास्तव्य करून त्यांनी काही काळ इंग्रजी अभ्यास केला व पुढील शिक्षणासाठी ते  पुण्यास रवाना झाले. शिक्षणानंतर त्यांनी पुण्याच्या सैनिकी लेखानियंत्रक (कंट्रोलर ऑफ मिलिटरी अकाऊंटस) कार्यालयात सेवा केली. 

त्यांना त्यांच्या आजारी आईला भेटण्यास रजा मिळाली नाही. आईचे निधन झाले व शेवटी भेटही घेता आली नाही. या घटनेने आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. त्यांनी आपल्या मातेची आणि भारतमातेची तिच्या लेकरांपासून ताटातूट करणाऱ्या इंग्रज सरकाराचा नायनाट करायचा असा पण केला. त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी त्यांना समर्थांच्या ओव्यांची आठवण करून दिली. 

सकल सुखाचा केला त्याग, करूनी साधिजे तो योग,राज्य साधनेची लगबग, कैसी केली।त्याहुनी करावे विशेष, तरीच म्हणावे पुरुष,या उपरी आता विशेष, काय लिहावे?

हे समर्थ वचन ध्यानी ठेवून वासुदेवाने घरदार सोडले. त्याच वेळी हिंदुस्थानात भीषण दुष्काळ पडला. इंग्रज सरकारच्या हलगर्जी  कारभाराचे मुळे हजारो नागरिक मृत्युमुखी पडले. त्यामुळे इंग्रज राजवटी बाबत प्रचंड संताप त्यांचे मनात उफाळून आला व त्याचा प्रतिशोध घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. भारतमातेला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी त्यांनी सशस्त्र बंड करण्याचे ठरवले. संघटना केल्या. रामोशी, भिल्ल, मांग, कोळी, आगरी, ब्राह्मण अशा सर्व समाजातील देशभक्त संघटित केले आणि त्यांना शस्त्रवापराचे प्रशिक्षण दिले. राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी माल, शस्त्र प्रशिक्षण यांना प्राधान्य दिले. त्यांनी सुरू केलेल्या लाठीवर्गात खुद्द लोकमान्य टिळकांनीदेखील प्रशिक्षण घेतले होते. इंग्रजांशी हातमिळवणी केलेल्या गद्दार धनाढ्यांना लुटून त्यांनी धन-संपत्ती गोळा केली आणि राष्ट्रकार्यार्थ तिचा योग्य विनिमय केला. प्रत्येक क्रांतीकारकाला सैनिकांप्रमाणे रोजगार दिला आणि मजबूत शस्त्रसाठा तयार केला. परिणामी त्यांना शिक्षा होऊन त्यांना एडन येथे धाडले गेले. व तेथेच त्यांना १७ फेब्रुवारी १८८३ ला मृत्यू आला. 

पुण्याच्या फायनान्स ऑफिसात नोकरी करीत असताना त्यांच्या मनातील वैराग्यवृत्ती उसळून वर आली. मंत्रतंत्र, सत्पुरुषांच्या गाठीभेटी यांत त्यांना गोडी वाटे. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांनाही ते भेटले होते. वासुदेव बळवंतांचे आराध्य दैवत श्रीदत्त हेच होते. श्रीपादवल्लभ नामक ध्यानाचे एक चित्र त्यांनी एका चित्रकाराकडून मुद्दाम काढून घेतले होते. त्याची नित्य ते पूजा करीत. रोज ते श्रीगुरुचरित्राच्या पोथीचा अध्याय वाचीत. दत्तांच्या आराधनेचा व उपासनेचा एक ग्रंथ ‘दत्त महात्म्य’ नावाचा प्रसिद्ध करण्याचा त्यांना मानस होता. गंगाधरशास्त्री दातार यांच्याकडून ‘दत्तलहरी’ या स्तोत्राचे भाषांतर करवून वासुदेव बळवंतांनी प्रसिद्ध केले होते. दिवसाच्या सुरुवातीला नित्य दत्त सहस्रनामाचा जप केल्याशिवाय त्यांनी कधी पाण्याचा थेंबही घेतला नाही. दत्तपादुकांची प्रतिकृती छोट्याशा डबीतून ते सदैव आपल्या जवळ बाळगत असत. 

राजद्रोहाखाली यांना हद्दपारीची शिक्षा झाली. एडन येथेच जन्मठेप भोगीत असताना त्यांचे निधन झाले. ‘दधिची ऋषींनी धर्मकार्यासाठी आपल्या अस्थी देवांना दिल्या, तर हिंदवासियांनो, मी आपला प्राण तुमच्यासाठी का देऊ नये?’ अशी त्यांची वृत्ती होती. असे हे थोर क्रांतीकारक भारतमातेच्या लढ्यासाठी दत्तरूप होऊन उभे राहिले मात्र त्यांची किंमत न कळलेल्या आपल्याच बंडखोरांमुळे भारतमातेला स्वातंत्र्यासाठी आणखी अनेक वर्षे झुरावे लागले.