शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
3
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
4
'गद्दारांना तुरुंगात टाकू'; सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
5
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
6
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
7
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
8
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
9
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
10
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
11
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
12
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
13
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
14
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
15
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
16
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
17
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
18
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
19
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद

कडू-गोड अनुभवांचे घोट पचवणारे लोक अशी ख्याती असते डिसेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांची!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 1:04 PM

December Birthday Astrology: डिसेंबरच्या पहिल्या १५ दिवसांत जन्मलेले आळशी, हट्टी, गर्विष्ठ तर शेवटच्या १५ दिवसांत जन्मलेले अतिशय सृजनशील, कलाकार आणि हौशी असतात. 

डिसेंबरमध्ये जन्माला आलेल्या व्यक्तींना वेगळ्याच प्रकारचा आत्मविश्वास असतो. मात्र हा आत्मविश्वास स्वयंप्रेरणेने आलेला नसून तो दुसऱ्यांच्या भरवशावर त्यांनी मिळवलेला असतो. याचे कारण, हे लोक फार आळशी असतात. स्वत: काही करो न करो, मात्र दुसऱ्यांकडून यांच्या ढीगभर अपेक्षा असतात. त्या अपेक्षा कधीच पूर्ण होत नाहीत आणि अपेक्षाभंगाचे दु:खं त्यांना झेलावे लागते. कुटुंबावर भरपूर प्रेम असूनही कुटुंबियांकडून यांना नेहमी तक्रारीचा सूर ऐकावा लागतो. त्याला कारणीभूत त्यांचा आळस असतो.

डिसेंबरच्या पहिल्या १५ दिवसांत जन्मलेले आळशी, हट्टी आणि गर्विष्ठ असतात, तर शेवटच्या १५ दिवसांत जन्मलेले अतिशय सृजनशील, कलाकार आणि हौशी असतात. 

या लोकांना कल्पनाविश्वात रमणे आवडते. वास्तव जगापासून ते कोसो दूर असतात. अशा दिवा स्वप्नांमुळे ते अनेक संधी गमावून बसतात. दुसऱ्याला कमी समजणे ही आणखी एक मेख त्यांच्या ठायी असते. या कारणामुळे ते आप्तस्वकीयांपासून दुरावतात.

आकर्षणाच्या बाबतीत म्हणाल, तर त्यांचे व्यक्तिमत्त्व समोरच्यावर छाप पाडणारे असते. त्यामुळे कर्तृत्त्वाची जोड असो वा नसो त्यांच्यावर अनेक जण पटकन भाळतात. त्यांच्यावर अनेकांचे प्रेम जडते तसेच हे अनेकांच्या प्रेमात पडतात, परंतु नाते स्वीकारले की ते एकनिष्ठपणे निभावतात. या लोकांमध्ये तरुणपणात पाय घसरण्याची दाट शक्यता असते. परंतु संस्कारांचा पगडा असेल, तर ते आयुष्य मार्गी लावू शकतात.

या महिन्यात जन्मलेल्या मुली मात्र अत्यंत चालाख असतात.  गोड बोलून समोरच्याकडून आपले काम कसे काढून घ्यायचे ही कला त्यांना चांगली अवगत असते. स्वभाव काहीसा अबोल असतो. त्यामुळे त्यांच्या मनात काय सुरू आहे याची समोरच्याला कल्पना येत नाही. 

ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तींनी स्वभावात थोडा बदल केला, दैनंदिन सवयींमध्ये सुधारणा केली, तर ते लोकप्रिय व्यक्तीदेखील बनू शकतात. त्यांनी समोरच्याला मान दिला तर आपोआप त्यांनाही मान मिळू शकेल. त्यांना जशी स्वस्तुती आवडते, तशी त्यांनी इतरांचीही मुक्तकंठाने स्तुती केली पाहिजे. पैशांचे व्यवहार जपून केले पाहिजे. कुटुंबाबद्दल केवळ प्रेम बाळगून उपयोग नाही, ते योग्य प्रकारे व्यक्त केले, तरच त्यांनाही कुटुंबात तेवढाच मान आणि भरपूर प्रेम मिळू शकेल.

या लोकांनी आपल्या भीतीवर मात करून आत्मविश्वासाने आपल्या करिअरमध्ये पाऊल टाकले तर त्यांना कोणीही अडवू शकणार नाही. एकदा का यश मिळाले, तर ते त्यांच्या स्वभावानुसार दुसऱ्यांकडून सहज कामे करवून घेऊ शकतील. त्यांच्याकडे नेतृत्वाचे गुण असतात. फक्त त्यासाठी संवादकौशल्य विकसित केले पाहिजे. या लोकांना नोकरीपेक्षा व्यवसायात चांगले यश मिळू शकते. अर्थात त्यासाठी जाणकारांचा सल्ला घेऊन मगच कोणत्याही व्यवसायात पदार्पण करा. 

या महिन्यात जन्मलेल्या आणि प्रसिद्ध झालेल्या लोकांचाही आदर्श तुम्हाला ठेवता येईल. जसे की रतन टाटा, अटल बिहारी वाजपेयी, धिरूभाई अंबानी, शरद पवार, धमेंद्र, मोहम्मद रफी, सोनिया गांधी, युवराज सिंग, उदित नारायण, अरुण जेटली इ.   

टॅग्स :Astrologyफलज्योतिषAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीSonia Gandhiसोनिया गांधीRatan Tataरतन टाटाSharad Pawarशरद पवार