शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
2
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
3
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
4
रतन टाटांचा दशकांचा असा एक मित्र, ज्याच्याशी मैत्री तुटली ती शेवटपर्यंत तुटलेलीच राहिली...
5
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती
6
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
7
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
8
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
9
रतन टाटा... महालातला ऋषी, देशाचा महानायक अन् उद्योजक संत; थक्क करणारे अद्भूत व्यक्तिमत्त्व
10
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
11
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
12
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
13
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
14
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
15
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
16
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
17
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
18
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
19
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
20
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते

Deep Amavasya 2022: दीप अमावस्येच्या कथेत माता लक्ष्मी जशी गौरीवर प्रसन्न झाली तशी तुमच्यावरही होवो; वाचा व्रतकथा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 6:30 AM

Deep Amavasya 2022: १७ जुलै रोजी दीप अमावस्येला ही व्रतकथा अवश्य वाचा; माता लक्ष्मीचा मिळेल कृपाशिर्वाद!

आषाढ अमावस्येला 'दिव्याची आवस' म्हणतात. सोमवारी १७जुलै रोजी दिव्यांची आवस आहे. या दिवशी स्त्रिया घरात असलेले सगळे दिवे घासूनपुसून लख्ख करतात. नंतर ते एकाच ठिकाणी ठेवून त्यांच्याभोवती रांगोळी काढात. रात्री ते सर्व दिवे तेल वाती घालून प्रज्वलित करतात. त्यांची मनोभावे पूजा केली जाते. गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. 'सूर्यरूपा आणि अग्निरूपा दिव्या, तू स्वत: तेज आहेस, प्रकाश आहेस. तू आमच्या पूजेचा स्वीकार कर, आमच्या सर्व इच्छा पूर्ण कर' अशी त्याची प्रार्थना करतात. त्यानंतर उपलब्ध असलेली जी दिव्याची कहाणी सांगितली जाते तिचे भक्तीपूर्वक श्रवण करतात. दिव्याच्या अवसेची कथा ऐकल्याने उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, अपार धनसंपदा लाभते अशी श्रद्धा आहे. 

ती कथा पुढीलप्रमाणे - 

तामीळ प्रांतात पशुपती शेट्टी नावाच्या गृहस्थाला विनीत आणि गौरी नावाची दोन मुले होती. त्या दोघांनी स्वत:च्या विवाहापूर्वीच भविष्यात होणाऱ्या आपापल्या मुलांचे विवाह परस्परांच्या मुलांशी लावून द्यायचे असे ठरवले. 

पुढे विवाहानंतर यथाकाल गौरीला तीन मुली झाल्या. त्यापैकी धाकट्या मुलीचे नाव 'सगुणा' होते. विनीतला तीन मुलगे झाले. पुढील काळात गौरी श्रीमंती उपभोगत होती. परंतु विनीतला दुर्दैवामुळे अचानक दारिद्रय आले. त्यामुळे लहानपणी भावाला दिलेले वचन न पाळता गौरीने आपल्या दोन मुलींचे विवाह दुसऱ्या श्रीमंत मुलांशी करून दिले. धाकट्या सगुणाला आईचे वागणे आवडले नाही. तिने आईचा विरोध मोडून विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न केले. गरिबीतही ती आनंदाने संसार करू लागली आईवडिलांनी रागाने तिच्याशी संबंध तोडून टाकले.

Deep Amavasya 2023: दीप अमावस्येला घरातील लहान मुलांना का ओवाळतात? जाणून घ्या शास्त्रार्थ!

पुढे एकदा त्या राज्याचा राजा एके ठिकाणी स्नानासाठी गेला. स्नानाच्यावेळी त्याने आपली बहुमुल्य अंगठी काढून जवळच्या कट्ट्यावर ठेवली होती. ती अंगठी खाण्याची वस्तू समजून एका घारीने पळवली. मात्र ती खाण्याच्या लायकीची नाही हे कळताच तिने ती अंगठी नेमकी सगुणाच्या घराच्या छपरावर टाकली. ती सगुणेला मिळाली. सगुणाने चौकशी करता तिला ती अंगठी राजाची असल्याचे कळले. तिने प्रामाणिकपने ती राजाला नेऊन दिली. राजाने खूष होऊन तिला मोठ्या रकमेचे बक्षीस दिले. शिवाय तिला आणखीन काही हवे असल्यास मागण्यास सांगितले.

तेव्हा तिने `येत्या शुक्रवारी अमावस्येला फक्त माझ्या घरी दिवे लावलेले असतील. बाकी पूर्ण राज्यात कोणीच दिवे लावू नयेत' अशी इच्छा प्रदर्शित केली. राजाने तशी दवंडी पिटण्याची व्यवस्था केली. त्याप्रमाणे आषाढ अमावस्येला सगुणाच्या घराव्यतिरिक्त संपूर्ण राज्य अंधारात बुडून गेले. इकडे सगुणाने घरात सर्वत्र दिवे लावले. नंतर तिने आपल्या दोन्ही दिरांना घराच्या पुढच्या आणि पाठच्या दारात उभे केले. तिने घराच्या पुढच्या दारात उभ्या असलेल्या दिराला सांगून ठेवले, क जी जी सवाष्णबाई घरातघरात प्रवेश करू बघेल, तिच्याकडून `मी पुन्हा कधीही या घरी येणार नाही' असे वचन घ्या. मगच तिला बाहेर जाऊ द्या. 

तिन्ही सांजेच्यावेळी माता लक्ष्मीदेवी त्या राज्यात आली. तिला सर्वत्र अंधार दिसला. मात्र सगुणाचे घर दिव्यांच्या प्रकाशाने उजळले होते. तिथे जाऊन लक्ष्मी माता सगुणाच्या घरात प्रवेश करू लागली. तेव्हा तिथे उभ्या असलेल्या दिराने सगुणाने सांगितल्याप्रमाणे आधी शपथ घ्यायला लावून मगच तिला घरी येऊ दिले. लक्ष्मी घरात येताच आधीपासून घरात असलेली दारीद्र्याची देवी अक्काबाई तातडीने मागच्या दारातून बाहेर पडू लागली. तिथे उभ्या असलेल्या दिराने तिला पुन्हा कधीही परत न येण्याचे वचन घेतले मगच बाहेर जाऊ दिले. त्या दिवसापासून सगुणाचे घर अखंड सुख समृद्धीने भरून गेले. राज्यातील ससर्वजण सगुणालाच लक्ष्मी मानू लागले.

Deep Amavasya 2023: दीप अमावस्येला कणकेचा एक दिवा दक्षिण दिशेला पितरांसाठी ठेवा, कारण... 

अशी ही दिव्याच्या अवसेची कथा तुम्हालाही फळो, ही शुभेच्छा!