महादेवाला साद घालायची असेल तर सर्वात प्रभावी मंत्र सांगितला जातो, तो म्हणजे 'महामृत्युंजय जप!' या जपाने भोलेनाथ प्रसन्न होऊन सर्व भय, रोग, दोष यापासून मुक्ती देऊन सुख-समृद्धीचे वरदान देतात. भगवान शिवाचा हा प्रिय मंत्र ऋग्वेद आणि यजुर्वेदातही सांगण्यात आला आहे. संस्कृतमध्ये महामृत्युंजय म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणारा असा अर्थ होतो. अकाली मृत्यूचे भय टाळण्यासाठी या मंत्राचा जप केला जातो. या मंत्राद्वारे भगवान शिवाची पूजा केली जाते. शिवपुराणानुसार या मंत्राचा जप केल्यास सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते, तसेच घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. म्हणून रोज या मंत्राचा जप निदान १०८ वेळा तरी करावा. जाणून घेऊ या मंत्राचे लाभ...
महामृत्युंजय मंत्र
ओम त्र्यंबकम यजमाहे सुगंधीम् पुष्टीवर्धनम्।उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥
महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने पुढील फायदे होतील :
अकाली मृत्यूची भीती संपते :
असे मानले जाते की महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने व्यक्तीच्या अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते. या मंत्राचा नियमित जप केल्याने व्यक्तीला निरोगी आणि दीर्घायुष्य मिळते
संपत्तीत वाढ
महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने भगवान शंकर लवकरच प्रसन्न होतात आणि सुख, समृद्धी आणि सौभाग्याचे आशीर्वाद देतात. या मंत्राचा रोज जप केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
यश मिळते
या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीचे समाजात वर्चस्व वाढते. यश मिळते. उत्कर्ष होतो. त्यामुळे या मंत्राचा नियमित जप करावा. पद, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी सर्व काही मिळते. अर्थात त्याला मेहनत, प्रामाणिकपणा आणि निःस्वार्थ भाव असावा लागतो तरच भोलेनाथ प्रसन्न होतात.
संतान प्राप्ती :
संतानप्राप्ती साठी प्रयत्न करत असाल तर महामृत्युंजय मंत्राचा जप सुरू करा. ऋग्वेद आणि यजुर्वेदानेसुद्धा या मंत्राचा महिमा कथन केला आहे. आपली भक्ती आणि भोलेनाथाचा आशीर्वाद फळला तर संतान सौख्य प्राप्त होते असा भाविकांचा अनुभव आहे.