Devghar Vastu Tips: भारतीय संस्कृती व परंपरा यांमध्ये अनेक गोष्टींना अनन्य साधारण महत्त्व आहे. पैकी आपले राहते घर आणि घरातील देवघर हे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय आहेत. देवघराबाबत अनेक मान्यता असल्याचे सांगितले जाते. वास्तुशास्त्रानुसार घरातील देवघराला विशेष महत्त्व असून, या संदर्भात काही गोष्टी आवर्जून पाळल्या गेल्या पाहिजेत, असे शास्त्र सांगते.
घरातील देवघरात कुळाचार, कुळधर्माप्रमाणे कुलदेवी, देवता, आराध्य देव विराजमान असतात. त्यांचे पूजन, नामस्मरण न चुकता, नित्यनेमाने केले जातात. दररोज कुलदेवी, देवता यांचे पूजन करणे शुभ तसेच अतिशय पुण्याचे मानले गेले आहे. घरातील देवघर पवित्र स्थान मानले जाते. देवघराशेजारी किंवा आजूबाजूला काही गोष्टी ठेवणे शुभ मानले गेलेले नाही. तसेच देवघरात काही देवतांच्या मूर्ती न ठेवणे हितकारक मानले गेले आहे. नेमके काय असू नये? जाणून घेऊया...
घरातील देवघरात ‘ही’ मूर्ती कधीही ठेवू नये! पण का?
- जर देवघर योग्य दिशेला नसेल तर लाभ प्राप्त होत नाही.
- देवघरात दोन शंख एकत्र कधीच ठेवू नयेत.
- घरात कधीच दोन शिवलिंगाची पूजा करू नये.
- घरामध्ये दोन शालिग्रामांची पूजा देखील करू नये.
- घरात गणपतीच्या तीन मूर्ती चुकूनही ठेवू नयेत.
- देवघरात कधीही तडा गेलेल्या मूर्तीची स्थापना करू नये. कारण ते अशुभ मानले जाते. तडा गेलेल्या मूर्तीचे पूजन केल्याने देवता नाराज होतात असे म्हटले जाते.
- भगवान शिवाची नृत्य करणारी मूर्ती म्हणजेच त्यांच्या नटराज मुद्रेची मूर्ती घरात ठेवू नये. असे मानले जाते की, शंकर क्रोधीत होता, तेव्हाच तांडव करतात. त्यामुळे भगवान महादेव तांडव नृत्य करतानाची तसबीर किंवा मूर्ती शुभ मानले जात नाही.
- देवघर कधीच स्टोअररुम, बेडरुम आणि बेसमेंटमध्ये नसावे. देवघर नेहमी खुल्या जागेत असावे.
- लक्ष्मी देवीची उभ्या स्वरुपातील तसबीर किंवा मूर्ती ठेवू नये. घराच्या पूजेच्या ठिकाणी देवी लक्ष्मी उभ्या स्थितीत असतील, तर मान्यतेनुसार धनाच्या बाबतीत हे शुभ लक्षण मानले गेलेले नाही.
- देवघरात एकाच देवतेच्या एकापेक्षा अधिक मूर्ती किंवा फोटो नसावेत.
- महाकाली हे आदिशक्ती पार्वतीचे रूप आहे. राक्षसांचा नाश करण्यासाठी हे रूप धारण केले. घरामध्ये महाकाली किंवा कोणत्याही देवतेची उग्र स्वरुपातील मूर्ती ठेवू नये. देवी कालीचे सौम्य, शांत मुद्रेतील तसबीर किंवा मूर्ती ठेवली तरी चालेल.
- देवघरात भगवान हनुमानाची जास्त मोठी मूर्ती ठेवू नये. भगवान हनुमानाची नेहमी छोटीशी मूर्ती असावी.
- देवघराजवळ कधीच शौचालय बनवू नका.
- देवघरात देवी-देवतांच्या नेहमी हास्यभाव असणाऱ्या प्रतिमा ठेवाव्यात. क्रोधीत रुपातील फोटो किंवा मूर्ती ठेवू नये ते अशुभ मानले जाते.