कार्तिक कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी आपण साजरी करतो. यावर्षी धनत्रयोदशी (Dhanteras 2024) २९ ऑक्टोबरला आहे. या दिवशी भगवान धन्वंतरी, मृत्यूचे स्वामी यमराज आणि कुबेर यांची पूजा करण्याची परंपरा आहे. ही तिथी धन्वतरी जयंती म्हणूनही साजरी केली जाते. धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला आणि समुद्र मंथनातून ते सोन्याचा कलश घेऊन प्रगट झाले आणि त्यांना आरोग्य, धन संपदेचे वरदान मिळाले, म्हणून या तिथीला अनेक जण खरेदी करतात. संपत्तीत वाढ व्हावी हा त्यामागचा हेतू असतो.
मात्र यंदा धनत्रयोदशी दरम्यान राहूकाळ सुरु होणार आहे, जो खरेदीच्या दृष्टीने अशुभ मानला जातो. त्यामुळे शास्त्रानुसार या काळात केलेल्या खरेदीचा लाभ होणार नाही. मात्र धनत्रयोदशीला सोने, चांदी, भांडी इत्यादी खरेदी करण्याचा बेत असेल तर शुभ-अशुभाचा मेळ कसा बसवायचा ते जाणून घेऊ.
त्रयोदशी तिथीची सुरुवात: २९ ऑक्टोबर, सकाळी १०:३२ पासून
त्रयोदशीची समाप्ती तारीख: ३० ऑक्टोबर, दुपारी १:१६ पर्यंत
राहू काळ : २९ ऑक्टोबर रोजी दुपारी २. ५२ मिनिटांपासून संध्याकाळी ४.२२ मिनिटांपर्यंत असेल.
राहू काळात मौल्यवान वस्तूंची खरेदी टाळा, मग खरेदीसाठी शुभ मुहूर्त कोणता, तेही जाणून घ्या!
धनत्रयोदशीला खरेदीसाठी शुभ मुहूर्त
पहिला मुहूर्त : धनत्रयोदशीच्या दिवशी त्रिपुष्कर योग तयार होत आहे, या योगात खरेदी करणे शुभ मानले जाते. हा योग सकाळी ६:३२ पासून सुरू होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी १०:३० वाजेपर्यंत चालू राहील. या योगात खरेदी केल्यावरत्याचे महत्त्व तिप्पट वाढते.
दुसरा मुहूर्त : धनत्रयोदशीच्या दिवशी अभिजात शुभ मुहूर्त जुळून येत आहे आणि या काळात खरेदी केल्याने संपत्ती आणि समृद्धी मिळते. तसेच माता लक्ष्मी प्रसन्न राहते. हा मुहूर्त २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:४२ ते दुपारी १२:२७ पर्यंत असेल, ज्या दरम्यान तुम्ही खरेदी करू शकता.
तिसरा मुहूर्त : हा शुभ काळ संध्याकाळी ०६:३६ ते सकाळी ०८:३२ पर्यंत असेल जो प्रदोष काळा धरला जाईल.. यापैकी हा मुहूर्त सर्वोत्तम आणि शुभ मानला जातो.
त्रयोदशी तिथीची सुरुवात: २९ ऑक्टोबर, सकाळी १०:३२ पासून
त्रयोदशीची समाप्ती तारीख: ३० ऑक्टोबर, दुपारी १:१६
उदय तिथीनुसार, धनत्रयोदशीचा सण मंगळवार २९ ऑक्टोबर २०२४ रोजी साजरा केला जाईल.