शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

Dhanteras 2024: धनत्रयोदशीला का दाखवला जातो धणे आणि गुळाचा नैवेद्य? जाणून घ्या कारण... 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 12:02 PM

Dhanteras 2024: आज धनत्रयोदशी; भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची पूजा करताना फराळ आणि मिठाईबरोबर धणे-गूळ महत्त्वाचे का ते पाहू!

२८ ऑक्टोबर रोजी वसुबारसेने यंदाची दिवाळी(Diwali 2024) सुरु झाली आणि आज दिवाळीचा दुसरा दिवस अर्थात धनत्रयोदशीचा(Dhanteras 2024)! आजचा दिवस भगवान धन्वंतरी यांची जयंती म्हणूनही साजरा केला जातो. धन्वंतरी हे देवांचे वैद्य! आपण सगळे जण पैसे कमावण्याच्या नादात आरोग्य गमावून बसतो. म्हणून दिवाळीत लक्ष्मी पूजे आधी धनत्रयोदशीची आखणी केली असावी. कारण 'हेल्थ इज वेल्थ' आपण नुसते म्हणतो, पण तना-मनाची श्रीमंती सोडून धनाची श्रीमति कमावण्यात आयुष्य घालवतो. भगवान धन्वंतरीच्या कृपेने धनाची श्रीमंती उपभोगण्यासाठी तना-मनाचे आरोग्य उत्तम मिळावे, यासाठी लक्ष्मीबरोबरच त्यांचीही पूजा केली जाते. 

हा सण केवळ धन पूजेचा नाही तर आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. म्हणून नैवेद्याला आपण फराळाचे पदार्थ ठेवतो त्याबरोबरच धणे गूळ हेही नैवेद्यात (Dhanteras Naivedyam 2024)ठेवतो. हिवाळ्यात (Winter food) तेलकट पदार्थ खाल्ले तरी ते बाधत नाहीत. म्हणून फराळ करताना संकोचू नका, पण त्याला जोड द्या धणे आणि गुळाची! त्याचे फायदे जाणून घेऊ!

१. पोषणतज्ज्ञ हिवाळ्यात गुळ खाण्याचे अनेक फायदे सांगतात. हे सुपरफूड केवळ चयापचय आणि प्रजनन क्षमता सुधारत नाही, तर हाडे मजबूत देखील करते. साखरेमुळे लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचते, त्यामुळे गूळ साखरेला उत्तम पर्याय ठरू शकतो. यामध्ये व्हिटॅमिन-बी, कॅल्शियम, जस्त, तांबे आणि फॉस्फरस यांसारखी अनेक मिनसल्स आढळतात. त्यामुळे गुळ शरीरासाठी हितकारक ठरतो. 

२. धण्यासोबत गुळ खाल्ल्याने मासिक पाळीवेळी होणारा रक्तस्त्राव कमी होतो आणि वेदनांमध्ये आराम मिळतो. याशिवाय गुळ आणि धने यांचे मिश्रण मासिक पाळी सुरू करण्यासाठी उपयुक्त आहे. पीसीओडीमध्ये महिलांसाठी देखील हे मिश्रण चांगले मानले जाते.

Diwali 2024: अकाली मृत्यू निवारणासाठी धनत्रयोदशीला 'असे' करा 'यमदीपदान'? विधी आणि मुहूर्त! 

३. धनत्रयोदशीला धणे आणि खडीसाखरेचाही नैवैद्य अनेक ठिकाणी दाखवला जातो. पत्री खडीसाखर, शरीराला थंडावा देणे, पचनाचे विकार ते मूत्रविकार यासाठी उपयुक्त असते. त्यासोबत उष्णतेचा त्रास होणे, तोंड कोरडे पडणे यासाठी खडीसाखरही महत्त्वाची. धण्याचे औषधी गुण आणि खडीसारखरेचा गोडवा जगण्यात रहावा, आरोग्य लाभावे ही त्यामागची भावना असते. 

४. अॅसिडीटी, अपचन यांसाठी धणे अतिशय चांगले असतात. पचनसंस्थेच्या तक्रारी दूर होण्यासाठी आयुर्वेदात धणे खाण्याचा सल्ला दिला जातो. आमविकार, जुलाब यांसारख्या तक्रारींवरही धणे आणि खडीसाखर अतिशय उपयुक्त ठरते. वयामुळे किंवा सततच्या ताणामुळे, अतिरिक्त कष्ट झाल्याने थकवा आला असेल तर धणे आणि गूळ हा उत्तम उपाय सांगितला आहे. 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2024Diwali Ritualsदिवाळीतील पूजा विधीfoodअन्नWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजी