प्रश्नकर्ता : सदगुरु, मी यापूर्वी दोन योगाचे कार्यक्रम केले होते, पण समस्या अशी आहे की मी दररोज त्याचे काटेकोरपणे अनुसरण करू शकत नाही. असा एक काळ होता जेव्हा मी सकाळी ६:०० ते ९:३० - १०:०० पर्यंत चार किंवा पाच तास योगसराव करत होतो. त्यानंतर ते सगळं पूर्णपणे बारगळलं. मी आजकाल दररोजचा सराव देखील नियमितपणे करत नाही. माझ्याकडून हे असं चालू-बंद का होत आहे ? मी स्वतःला कसं बदलू ?
सद्गुरु : तुम्ही योगाभ्यास कधीही काटेकोरपणे करण्याच्या मागे पडू नये - ते तसं काम करणार नाही. आणि योगाभ्यास हा आयुष्यभरासाठी कधीही करू नका. फक्त आज करा, बस्स. “मी हे माझ्या आयुष्यभर करणार आहे”, असल्या फालतू विचारांचं स्वतःवर ओझं घेऊ नका. आज तुम्ही ते करा. पुष्कळ आहे, ठिके ? जीवन खूप सोपे आहे. तुम्ही ते एवढे क्लिष्ट का बनवता ? “ मी माझ्या जीवनाच्या प्रत्येक दिवशी योगाभ्यास करणार आहे ! -. कृपया तुमच्या जीवनाचा प्रत्येक दिवशी ते करू नका; केवळ आज करा. हे कुठलेतरी कठोर धार्मिक व्रत पाळल्याप्रमाणे करण्याची आवश्यकता नाही. “ आज मी ते करणार आहे,” एवढंच. हे सोपं आहे. तुम्ही हे एक दिवस करू शकता, बरोबर ? पुरेसं आहे.