भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे लग्न, पूजा आणि सण हे सर्व वेगवेगळ्या धार्मिक नियम आणि परंपरांशी संबंधित आहेत. हिंदू धर्मातील प्रमुख सणांमध्ये रक्षाबंधन हा विशेष सण मानला जातो. रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. यावर्षी रक्षाबंधन 11 ऑगस्ट 2022 रोजी आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी/रक्षासूत्र बांधतात.
परंतु, भारतात फक्त श्रावण पौर्णिमेच्या दिवशीच रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात नाही, तर देशातील विविध राज्यांमध्ये या दिवशी वेगवेगळ्या नावाने सण साजरे केले (Rakshabandhan) जातात. रक्षाबंधनाला काही प्रांतात नारळी पौर्णिमा म्हणतात, तर काही ठिकाणी अबित्तम म्हणून ओळखले जाते.
नारळी पौर्णिमा -रक्षाबंधन हे भारताच्या पश्चिम भागात नारळी पौर्णिमा म्हणून ओळखले जाते. या दिवशी सागरी भागात राहणारे मच्छीमार इंद्रदेव आणि वरुण देवाची पूजा करतात. पूजेत नारळ समुद्राला अर्पण केला जातो.
काजरी पौर्णिमा -उत्तर भारतात या श्रावण पौर्णिमेचा दिवस काजरी पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. या दिवशी शेतकरी चांगले पीक येण्यासाठी दुर्गा देवीची प्रार्थना करतात आणि शेतात धान्य पेरले जाते.
पवित्रोपन्नागुजरातमध्ये रक्षाबंधनाला पवित्रोपन्ना म्हणतात. या सणाला लोक पंचगव्यात कापूस बुडवून शिवलिंगाभोवती बांधतात.
अबित्तम -दक्षिण भारतात श्रावण पौर्णिमेच्या दिवशी नवीन जानवं/जनेऊ घालण्याची परंपरा आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी ब्राह्मण जुन्या जानव्याचा त्याग करून नवीन धागा धारण करतात. असे मानले जाते की यामुळे देव आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि वाईट कर्मांपासून मुक्ती मिळते.
रक्षाबंधनभारतातील इतर प्रांतांमध्ये रक्षाबंधनाला जरी वेगवेगळ्या परंपरेने पूजा केली जाते. परंतु, श्रावण पौर्णिमेच्या दिवशी देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो.