शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

Diwali 2021 : दिवाळीची आवराआवर सुरू झाली? मग 'हा' महत्त्वाचा कोपरा स्वच्छ करायला अजिबात विसरू नका!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 2:42 PM

Diwali 2021 : आपण वरचेवर घरात आवराआवर करत असतो. उपयोगी गोष्टी ठेवून देतो. कमी महत्त्वाच्या गोष्टी बाजूला ठेवतो आणि निरुपयोगी वस्तू फेकून देतो. तसाच हा कोपरा आवरायचा आहे.

दिवाळीच्या निमित्ताने घरोघरी आवराआवर सुरू झाली असेल. जुन्या वस्तू, अडगळ, धूळ, जळमटं काढून घर लख्ख करण्यासाठी तुम्ही कटिबद्ध झाले असाल. त्याबरोरबरच आपल्याला एक महत्त्वाचा कोपरादेखील आवरायचा आहे. आपल्या रोजच्या वस्तू आपण नीटनेटक्या ठेवतो. त्यांची देखभाल करतो, आवराआवर करतो, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले मन, ते आवरायला नको का? ते कसे आवरायचे, सांगत आहेत, साधू गौर गोपाल दास. 

आपण रोज जेवतो. कोणी दोनदा, कोणी तीनदा, तर कोणी दिवसभर. परंतु, खाल्लेल्या अन्नाचा निचरा झाला नाही, तर काय होईल? मृत्यू.

आपण रोज पाणी पितो. कोणी एक लीटर, कोणी दोन लीटर, कोणी त्याहून जास्त. परंतु, प्यायलेले पाणी शरीरातून बाहेर पडले नाही, तर काय होईल? मृत्यू.

आपण दर क्षणाला श्वास घेतो. किती वेळा घेतो, याची मोजदादही ठेवत नाही. योगाभ्यासात श्वास घेण्याचे विशिष्ट तंत्र शिकवले जाते. मात्र, घेतलेला श्वास सोडलाच नाही, तर काय होईल? मृत्यू. 

त्याचप्रमाणे कोणतीही गोष्ट घेऊन झाल्यावर ती सोडूनही देता आली पाहिजे. साचून राहिलेल्या गोष्टी खराब होतात. त्यांचा क्षय होतो. त्या निकामी होतात. शेवटी नाशवंत होतात.  

या भौतिक उदाहरणातून लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, आपण अनेक गोष्टी मनात साठवून ठेवतो. परंतु, त्या गोष्टींचा वेळेत निचरा झाला नाही, तर काय होईल? मृत्यू...तोही मनाचा. मनात कितीतरी गोष्टी अकारण साठवलेल्या असतात. मनात असंख्य विषयांची दाटी होते. अस्वस्थता निर्माण होते. मन सतत द्विधा मनस्थितीत अडकून राहते. या सगळ्या गोष्टी तुमच्याही बाबतीत घडत असतील, तर वेळीच मनाचा कप्पा आवरायला घ्या. 

आपण वरचेवर घरात आवराआवर करत असतो. उपयोगी गोष्टी ठेवून देतो. कमी महत्त्वाच्या गोष्टी बाजूला ठेवतो आणि निरुपयोगी वस्तू फेकून देतो. फेकायचा वस्तू, ठेवलेल्या वस्तूच्या दशांश असतात. मात्र, काही काळाने कमी महत्त्वाच्या वस्तूदेखील अडगळीत जाऊन त्याचे रुपांतर निरुपयोगी वस्तूंमध्ये होते आणि नव्या वस्तूंसाठी जागा मोकळी होते.

त्याचपद्धतीने आपल्याला रोजच्या रोज मनाचा कप्पा आवारायचा आहे. चांगल्या आठवणी, चांगले लोक, चांगले संवाद, चांगले क्षण मनात साठवायचे. अडगळीच्या गोष्टी काढून टाकायच्या आणि कमी महत्त्वाच्या गोष्टी तपासून घेत हळू हळू कमी करायच्या. हे एकाएक जमणार नाही, परंतु सरावाने निश्चित जमेल.

मनाचा कोपरा आवरण्यासाठी तीन उपाय : 

१. वाईट विचार जाळून टाका : विचार जाळायचे कसे, हा प्रश्न पडला असेल, तर एक प्रयोग करा. तुमच्या मनातले वाईटात वाईट विचार, भीती, द्वेष, मत्सर, राग एका कागदावर लिहून काढा. नीट वाचा. आणखी काही मुद्दे राहिले असतील, तर नोंद करा आणि सगळे काही लिहून झाल्यावर तो कागद शब्दश: जाळून टाका. असे केल्याने खरोखरच विचार जळतात का? नाही. मात्र, विचार काढून टाकण्याच्या प्रयत्नांना सुरुवात नक्कीच होते. या कृतीतून कोणालाही त्रास होणार नाही. उलट, झालाच तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. म्हणून हा उपाय नक्कीच करून बघा.

२. मन मोकळे करा : अनेकांना प्रश्न पडतो, माझे दु:खं, माझ्या चिंता, माझे प्रश्न कोणाला सांगू? माझा कोणावरही विश्वास नाही. मात्र, मनातही साठवून ठेवता येत नाही. कोणालातरी सांगायचे, ही उर्मी स्वस्थ बसू देत नाही. अशा वेळी नि:संशयपणे तुमचे प्रश्न, काळजी, समस्या निसर्गाला सांगा. घरातल्या रोपट्यांशी, पाना-फुलाशी बोला, बागेतल्या झाडाकडे बघून त्याच्याशी संवाद साधा. अशा कृतीने लोक तुम्हाला वेड्यात काढतील, याची भीती बाळगू नका. तुम्हाला होणारा त्रास दूर करायला त्यांच्यापैकी कोणीही येणार नाही. परंतु, कोणीतरी मूकपणे आपले म्हणणे ऐकून घेतले, हा आनंद मनाला समाधान आणि शांतता देईल. 

३. आध्यात्मिक शक्ती वाढवा : तुमच्या वाट्याला सुख आलेले असो, नाहीतर दु:खं, ते शाश्वत नाही. प्रत्येकाची वेळ बदलत असते. वेळेनुसार परिस्थिती बदलत असते. सुखात आनंद आणि संकटात दु:खं पेलण्याची मनाची क्षमता वाढावी, म्हणून सुरुवातीपासून मनाला ध्यानधारणेची, प्राणायामाची, योगसाधनेची सवय लावून घ्या. नाम:स्मरणातूनही आत्मिक आनंद प्राप्त होईल.

लक्षात ठेवा. पाण्याचा पेला किती भरलेला आणि किती रिकामा आहे, यापलीकडे तो पेला तुम्ही किती काळ पकडून ठेवता, यावर तुम्हाला होणारा त्रास अवलंबून आहे. मनाचेही तसेच आहे. कोणतीही गोष्ट मनात दीर्घकाळ ठेवू नका. ते निर्मळ राहू द्या. 

टॅग्स :DiwaliदिवाळीMental Health Tipsमानसिक आरोग्य