कार्तिक महिन्याच्या अमावस्येला दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो. यंदा दिवाळीचा सण २४ ऑक्टोबर म्हणजेच सोमवारी साजरा केला जात आहे. दीपावली पुजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी ५ वाजून ४३ मिनिटांपासून रात्री ८ वाजून १६ मिनिटांपर्यंत आहे. तर वृषभ काळ संध्याकाळी ६ वाजून ५३ मिनिटांपासून रात्री ८ वाजून ४८ मिनिटांपर्यंत आहे. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सर्वजण देवीच्या आवडीच्या पदार्थांचा नैवेद्य तयार करतील आणि विधीनुसार पुजा देखील केली जाते.
माता लक्ष्मीची पुजा केल्यामुळे संपूर्ण वर्षभर धन आणि समृद्धी प्राप्त होते. पण लक्ष्मी मातेच्या पुजेनंतर तुम्ही जर तिजोरीत एक खास वस्तू ठेवली तर तुमची तिजोरी नेहमी धनानं संपन्न राहते असं म्हटलं जातं. ती नेमकी कोणती गोष्ट आहे ते जाणून घेऊयात.
ज्योतिषविद्येनुसार दिवाळीत लक्ष्मी पुजनानंतर पिवळ्या रंगाची कवडी तिजोरीत ठेवल्यामुळे तिजोरी नेहमी नोटांनी भरलेली राहते. धनत्रयोदशी किंवा लक्ष्मी पूजनानंतर पिवळ्या रंगाची कवडी लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावी. यासोबतत दिवाळीच्या पाचही दिवशी म्हणजेच धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, दिवाळी, गोवर्धन पूजा आणि भाऊबीज या पाचही दिवशी त्याच पिवळ्या कवडीची पूजा केली तर त्याचं उत्तम फळ प्राप्त होतं असं म्हणतात.
या गोष्टी देखील ठेऊ शकताज्योतिषाचार्यांच्या माहितीनुसार जर पिवळ्या रंगाची कवडी हळकुंड, सुपारी, तांदूळ एकत्ररित्या लाल कपड्यात ठेवता येईल. या व्यतिरिक्त जर पुजेत जे पैसे ठेवले जातात तेच कवडी सोबत ठेवले गेले तरी उत्तम मानलं जातं. पुजेत वापरली जाणारी चांदीची नाणी, कमळ देखील सोबत ठेवता येईल.