शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

Diwali 2022: धनवृद्धीच्या दृष्टीने 'या' तीन देवतांची पूजा करणे लाभदायक ठरते; सविस्तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 4:00 PM

Dhanteras 2022: धन, वैभव देणारी देवता म्हणून काही जण फक्त लक्ष्मी मातेचीच पूजा करतात, मात्र आणखीही दोन देवतांना त्यादिवशी पूजेचा मान दिला जातो. त्यांच्याबद्द जाणून घेऊ. 

कार्तिक महिन्याच्या कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणतात. या वर्षी धनत्रयोदशीचा दिवस २२ ऑक्टोबर रोजी शनिवारी आला आहे. समुद्रमंथनातून धन्वंतरी हातात अमृत कलश घेऊन प्रगट झाले, तो आजचाच अर्थात धनत्रयोदशीचा दिवस. म्हणून अनेक ठिकाणी या दिवसाला धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवता कुबेर, आयुर्वेदाचे स्वामी धन्वंतरी, तसेच सुख-समृद्धीची देवता महालक्ष्मी यांची पूजा केली जाते. या तिन्ही देवता समृद्धी देणाऱ्या आहेत. म्हणून या तिन्ही देवतांची पुढे दिलेल्या पद्धतीनुसार विधिवत पूजा करा. 

धनत्रयोदशीची तिथी :

कार्तिक कृष्ण त्रयोदशीचा प्रारंभ २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी १८. १२ मिनिटांनी होणार आहे. त्यापश्चात धनत्रयोदशीची पूजा केली जाईल. 

पूजा का व कशी करावी?

धनत्रयोदशीच्या दिवशी सायंकाळी धनाची तसेच वरील उल्लेख केलेल्या तीनही देवतांची मनोभावे पूजा करावी. काही जण धनत्रयोदशीला धन धान्याची पूजा करतात तर काही जण लक्ष्मी पूजेला करतात. विशेषतः व्यापारी वर्गाचे लक्ष्मीपूजेच्या दिवशी चोपडा पूजन असते. धंद्यात, व्यवसायात बरकत व्हावी म्हणून हे लक्ष्मीचे उपासक लक्ष्मी पूजेला आपले वैभव देवीच्या चरणी ठेवतात. मात्र जे धनत्रयोदशीला धनाची पूजा करतात, त्यांनी सायंकाळी दिवे लावणीच्या वेळी पूजेचा आरंभ करावा. तसेच धनाची पूजा झाल्यावर सायंकाळी दक्षिणेकडे दिव्याची वात करून एक दिवा यमराजांनादेखील अर्पण करावा आणि अकाली मृत्यू येऊ नये अशी प्रार्थना करावी.

पूजा विधी : 

धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी, कुबेर महाराज किंवा देवी महालक्ष्मी यांची विधीवत पूजा करावी. कुबेर महाराजांची पूजा का? कारण, त्यांना धनसंपत्तीचे प्रमुख मानले जाते. भगवान शंकरांनी त्यांना धनपतीचे वरदान दिले आहे. म्हणून धनप्राप्तीसाठी कुबेर महाराजांची पूजा केली जाते. तसेच धन्वंतरी हे आरोग्याची देवता आहेत. आपल्या घरात केवळ संपत्ती येऊन उपयोग नाही, तर ती उपभोगण्यासाठी चांगले आरोग्यही असायला हवे, म्हणून त्यांचीही पूजा. तसेच आपल्या घरातील धन-संपत्ती वृद्धिंगत व्हावी आणि लक्ष्मी चांगल्या मार्गानेच घरात यावी आणि कायमस्वरूपी स्थीर राहावी, म्हणून महालक्ष्मीची पूजा केली जाते. अक्षता, धूप, दीप, चंदन, उटी, पाने, फुले, श्रीफळ देवाला अर्पण करून पुढील मंत्रांचे उच्चारण करावे. 

कुबेर महाराजांच्या पूजेच्या वेळी म्हणावयाचा मंत्र-

ओम श्री, ओम ऱ्हीम, ओम ऱ्हीम, श्री क्लीं वित्तेश्वराय नम:।

धन्वंतरी पूजा मंत्र- ओम धन्वंतरये नम:।

पूजेच्या वेळी म्हणावयाचे श्लोक : 

ओम नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतराये:अमृतकलश हस्ताय सर्वभय विनाशाय सर्वरोगनिवारणायत्रिलोकपथाय, त्रिलोकनाथाय श्री महाविष्णूस्वरूप,श्री धन्वंतरी स्वरूप श्री श्री श्री औषधचक्र नारायणाय नम:।

या देवी सर्वभुतेषु, लक्ष्मीरूपेण संस्थिता,नम: स्तस्यै, नम: स्तस्यै, नम: स्तस्यै नमो नम:।

टॅग्स :Diwaliदिवाळी 2022