शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार
2
राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?
3
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
4
Virat सह अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ बनवून होतेय फसवणूक; बनावट गेमिंग अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची लूट
5
संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड
6
'तुम्ही मनी लॉड्रिंग, मानवी तस्करीत...", वैज्ञानिकाला एक व्हिडीओ कॉल अन् गमावले ७१ लाख
7
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
8
IND vs NZ सामन्यात 'चिटिंग'? आर. अश्विननंही केली 'चॅटिंग', पण...
9
अमेठीत घडलं 'बदलापूर', आरोपी गंभीर जखमी! पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावताना घडली घटना
10
संपादकीय: अभिजात मराठी!
11
"दिवट्या आमदार..."; सुनील टिंगरेंवर शरद पवारांची टीका; अजितदादा म्हणाले, "बदनामीचा प्रयत्न..."
12
"शस्त्र सोडून गांधीवादी विचारानं काम करतोय..."; फुटिरतावादी यासीन मलिकचा कोर्टात दावा
13
शेवटच्या दिवशी अरबाजची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री; धावत येऊन निक्कीला उचललं, बेडरुममध्ये घेऊन गेला अन्...; सदस्यही पाहतच राहिले
14
Pan Cardबद्दल तुम्हाला किती माहितीये? पॅन क्रमांकाचा अर्थ काय? एकात असतं तुमचं आडनाव
15
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
16
Taro Card: देवीची कृपा मिळवून देणारा चैतन्यमयी आठवडा; वाचा तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
अजित पवारांच्या भायखळा NCP तालुकाध्यक्षाची हत्या; मुंबईत रात्री घडला थरार 
18
दररोज घसतोय Ola Electricचा शेअर; ₹१०० च्या खाली आला भाव; काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
19
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
20
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला

Diwali 2023 : द्रौपदी मानलेली बहीण असूनही कृष्णाची लाडकी का? वाचा ही छानशी गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 7:00 AM

Diwali 2023: 'तुझं माझं पटेना, तुझ्यावाचून करमेना' असं गोडं नातं असतं भाऊ बहिणीचं; त्याच नात्याचा हा उत्सव!

भाऊ बहिणीचे नाते, स्वार्थापलीकडचे असते. या नात्यात रुसवे, फुगवे कितीही असले, तरी परस्पर प्रेम आणि ओढ शेवट्पर्यंत कमी होत नाही. हे नाते रक्ताचे असो, नाहीतर मानलेले, या नात्यात आपसुक खडीसाखरेचा गोडवा उतरतो. अशाच सुमधुर नात्याची एक सुमधुर गोष्ट!

महर्षी नारदांनी एकदा भगवान श्रीकृष्णाला विचारले, 'भगवंत, सुभद्रा तुमची धाकटी बहीण, तरी तिच्यापेक्षा द्रौपदी तुमची लाडकी, असे का?'

श्रीकृष्ण म्हणाले, 'सांगतो. त्याआधी तू जाऊन दोघींना आळीपाळीने सांग, कृष्णाचे बोट कापले गेले आहे, रक्ताची धार लागली आहे, पण वेळेला छोटीशी चिंधीसुद्धा मिळत नाहीये. एवढे कर, तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळेल.'

महर्षी आधी सुभद्रेकडे गेले. तिला निरोप दिला. ती हळहळली. परंतु, आपल्या सगळ्या जरी काठाच्या, नक्षीदार साड्या पाहता, चिंधी कुठून आणायची, असा तिलाही प्रश्न पडला. ती सगळीकडे चिंधीचा शोध घेऊ लागली. तिचा शोध होईस्तोवर महर्षी द्रौपदीकडे पोहोचले आणि तिलाही तोच निरोप दिला. वृत्त ऐकून द्रौपदीच्या काळजात चर्रर्र झाले. मागचा, पुढचा विचार न करता, तिने लगेच आपलया भरजरी साडीचा तुकडा फाडून महर्षींना दिला आणि म्हणाली, 'आधी जाऊन माझ्या भावाचे रक्षण करा.' 

चिंधीचा तुकडा घेऊन श्रीकृष्णाकडे परत येत असता महर्षी मनात म्हणतात, 'मी तुझ्या भावाचा रक्षण करणारा कोण, तोच साऱ्या विश्वाचे रक्षण करतो.' असे म्हणत महर्षींनी द्रौपदीने दिलेली चिंधी कृष्णाच्या हाती सोपवली. ती चिंधी हातात घेत श्रीकृष्णांनी जे उत्तर दिले, त्या प्रसंगाचे कथन प्रा. आचार्य अत्रे यांनी श्यामची आई चित्रपटातील गाण्यात केले आहे. 

प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण, जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण,रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम, पटली पाहिजे अंतरीची खूण,धन्य तोचि भाऊ, धन्य ती बहीण, प्रीती जी करिती लाभाविणद्रौपदीसी बंधू शोभे, नारायण...! 

याच निर्व्याज प्रेमाची, छोट्याच्या चिंधीची परतफेड श्रीकृष्णांनी द्रौपदीच्या लज्जारक्षणाच्या वेळी केली आहे. तिला एवढ्या साड्या पुरवल्या, की त्या फेडता फेडता दु:शासन दमला. दरबार वरमला. उपस्थित प्रत्येक जण द्रौपदीची कृष्णभक्ती पाहून खजील झाला. 

अलीकडच्या काळात बहीण भावाचे नाते व्यवहारी झाले आहे. संसार व्यापात बालपणीचे जीवाला जीव देणारे छोटेसे बहीण भाऊ हरवले आहेत. नाती रक्ताची नसली, तरी चालेल, परंतु जोडलेले नाते प्राणापलीकडे जाऊन जपता यायला हवे. हा आदर्श कृष्ण-द्रौपदीच्या नात्याने घालून दिला आहे. कृष्णावर आलेला बांका प्रसंग, द्रौपदीला सहन झाला नाही आणि कृष्णाने आपल्या बहिणीच्या सन्मानाला धक्का लागू दिला नाही. हे आदर्श नाते, प्रत्येक बहीण भावाने मनापासून जपले, तर द्रौपदी वस्त्रहरणासारखा मानहानीचा प्रसंग पुन्हा उद्भवणार नाही आणि उदभवलाच, तर कृष्णासारखा प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीच्या मदतीला धावून जाईल. 

भाऊबीजेच्या निमित्ताने या गोड नात्याचे बंध पुनश्च घट्ट व्हावेत, अशी कृष्णचरणी प्रार्थना करूया. 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2023