शहरं
Join us  
Trending Stories
1
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
2
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
3
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
4
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
5
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
6
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
7
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
8
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
9
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
10
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
11
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
12
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
13
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
14
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
15
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार
16
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
17
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
18
फेका’फेक’ थांबवण्याचा ‘लोकशाही’ मार्ग
19
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
20
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान

Diwali 2023: लक्ष्मीपूजेबरोबर केरसुणी आणि मिठाचीही पूजा का केली जाते? जाणून घ्या महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 4:04 PM

Diwali 2023: लक्ष्मीपूजेसाठी आजच केरसुणी आणि खडे मिठाची खरेदी करून ठेवा, तत्पूर्वी त्या पूजेचे महत्त्वही जाणून घ्या. 

१२ नोव्हेंबर रोजी लक्ष्मी पूजन आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचे निस्सारण केले जाते. समुद्रमंथनात हलाहल विषानंतर, ज्येष्ठा अलक्ष्मीचा जन्म झाला. कल्किपुराणानुसार अलक्ष्मी कलिराक्षसाची दुसरी पत्नी, अधर्म आणि हिंसेची मुलगी, मृत्यूची, अधर्माची माता आहे. आळस, खादाडपणा, मत्सर, क्रोध, ढोंगीपणा, लोभ आणि वासना, असत्य, अस्वच्छता, अनीती, भ्रष्टाचार व अज्ञान यांची देवता. कलियुगात जुगार, दारू, वेश्याव्यवसाय, कत्तल, लोभ येथे राहणे अलक्ष्मीला आवडते. अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची, अपयशाची देवता मानतात. पद्‌मपुराणात अलक्ष्मीची कथा आहे, तर श्रीसुक्तातही अलक्ष्मी नाश्याम्यहं, म्हणजेच अलक्ष्मीचा नाश व्हावा, असे वर्णन केले आहे. अलक्ष्मीचे वाहन गाढव, तर हातात झाडू हे आयुध होते. ती अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. याच झाडूच्या साहायाने अलक्ष्मीला घरातून पळवून लावले जाते, अशी त्यामागची भावना आहे. 

झाडूची पूजा कशी करावी?

>>लक्ष्मी पूजेच्या दिवशी नवीन झाडू विकत घेण्याची आणि तिला लक्ष्मी मानून पूजा करण्याची प्रथा आहे. >>लक्ष्मीपूजा झाल्यावर स्वच्छ जागी झाडू उभा करून, त्याला हळद, कुंकू लावून  पूजा करतात. >>पूजा झाल्यावर रात्री उशिरा नवीन झाडून घर स्वच्छ करून अलक्ष्मी बाहेर काढतात. 

झाडूचे महत्त्व लक्षात घेऊन पुढील गोष्टी टाळाव्या. 

>>झाडूला पाय लावू नये, चुकून लागला तरी लगेच नमस्कार करावा. >>झाडूने कोणालाही मारू नये, लहान मुलांनाही नाही आणि प्राण्यांनाही नाही. >>कोणी घराबाहेर पडले, की लगेच झाडलोट करू नये, असे शास्त्र सांगते. 

मिठाची पूजा का ?

मीठ हा लक्ष्मीचा भाऊ. तोही सुद्रमंथनात तिच्या पाठोपाठ बाहेर आला. मीठ हे संसाराचे सार आहे. ते नसेल तर आयुष्य अळणी होईल. मीठ ही निसर्गाने दिलेली भेट आहे. तिच्यावर कर आकारायला ब्रिटिशांनी सुरुवात केली, तेव्हा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला होता. त्याच मिठाचे महत्त्व उद्योजक टाटा यांनीही ओळखले आणि देशाचे मीठ म्हणत घरोघरी पोहोचवले. खाल्ल्या मिठाला जागणे, हा आपल्यावर झालेला संस्कार आहे. चुकून जरी हे मीठ जमिनीवर सांडले, तर त्याचे मोल कळावे, म्हणून आई वडील मुलांना धाक दाखवतात, की मीठ सांडू नये, नाहीतर ते पापण्यांनी भरावे लागते. यामागे मिठाचे महत्त्व समजावून सांगणे, एवढाच उद्देश आहे. म्हणून लक्ष्मीपूजेनंतर खडे मीठ किंवा साधे मीठ वाटीत घेऊन त्याला हात जोडून नमस्कार करावा आणि त्याचे आपल्या आयुष्यातील स्थान ओळखून कृतज्ञता व्यक्त करावी. 

पूर्वी आणि आजही गावात दारोदारी खडे मीठ आणि केरसुणी विकणारा विक्रेता लक्ष्मीपूजेच्या दिवशी सकाळी यायचा. लोकही श्रद्धेने मीठ आणि केरसुणीची खरेदी करून त्याला मान देत असत. आपणही आपल्या घरातील अलक्ष्मी दूर होऊन लक्ष्मी नांदावी यासाठी केरसुणी आणि मिठाची पूजा करूया. 

लक्ष्मीपूजेचे महत्त्व-

समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा लक्ष्मीपूजेच्या रात्री केली जाते. श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्मी आणि आदी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या, गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर तो प्रसाद सर्वांना वाटतात़   लक्ष्मीपूजेला चलनी नोटा, नाणी, सोन्याचे अलंकार यांचीही पूजा केली जाते. व्यापारी वर्ग यादिवशी आपल्या व्यवहाराचे दस्तावेज, वह्या, हिशोबाची कागदपत्रे पूजेत ठेवून `चोपडा पूजन' करतात. तसेच फटाके उडवून आनंद साजरा करतात.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2023Diwali Ritualsदिवाळीतील पूजा विधीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३