शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

Diwali 2024: मनी प्लांट खरेदी करणार असाल तर दिवाळीच्या 'या' दिवसांत करा; होईल दुप्पट धनलाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 10:20 AM

Diwali 2024: मनी प्लांट अर्थात पैसे देणारे झाड अशी फेंगशुई वास्तुशास्त्राची संकल्पना आपल्याकडेही रुजू झाली आहे; त्याला जोड देऊ आपल्याकडील शुभ मुहूर्ताची!

२८ ऑक्टोबरपासून वसुबारसेने (Vasu Baras 2024) दिवाळी (Diwali 2024) सुरू होत आहे, त्यांनंतर धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज हे सण ओघाने आलेच. विशेषत: मंगळवार २९ ऑक्टोबर धनत्रयोदशी (Dhan Teras 2024) किंवा शुक्रवार १ नोव्हेंबर लक्ष्मी पूजन (Laxmi Pujan 2024) या दिवसात धनपूजा आपण करणार आहोतच. हे लक्ष्मीचे आवडते वार असल्याने आणि त्यादिवशी धनपुजा होणर असल्याने त्या दिवशी मनी प्लांटची केलेली खरेदी अधिक लाभदायी ठरेल. पण त्याबरोबरच जाणून घ्या महत्त्वाचे नियम! 

वास्तुशास्त्रानुसार (Vastu Shastra)घरामध्ये झाडे लावणे खूप चांगले मानले जाते. घरामध्ये हिरवी रोपे ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढतो, ज्यामुळे सुख-समृद्धी वाढते. अशा अनेक वनस्पती सांगितल्या आहेत, ज्या लावल्याने सौभाग्य वाढते आणि आनंद मिळतो. यापैकी एक म्हणजे मनी प्लांट! मनी प्लांटचा वापर बहुतेक घरांमध्ये दिसतो. पण मनी प्लांट लावताना वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन होणेही गरजेचे आहे. कारण या रोपट्याचा संबंध थेट आर्थिक बाबीशी आहे.त्याची नीट निगा राखली गेली नाही तर मनी प्लांट पैसा कमाईचे साधन बनण्याऐवजी पैसा गमवण्याचे साधन बनेल. यासाठी पुढे दिलेले नियम कायम लक्षात ठेवा.

मनी प्लांट ठेवण्यासाठी उत्तम जागा (Best Place to keep Money plant at home): 

मनी प्लांट हे इन डूअर प्लांट अर्थात घराच्या आत लावण्याचे झाड आहे. पण ते कुठेही ठेवून चालणार नाही तर आग्नेय कोनात (पूर्व-दक्षिण) ठेवावे. यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. यासोबतच आर्थिक स्थिती भक्कम होते.

वास्तूनुसार आग्नेय कोनात मनी प्लांट ठेवल्याने ग्रहस्थितीही सुधारते. मुख्यतः शुक्र ग्रह बलवान होतो. कारण या दिशेचा स्वामी श्रीगणेश आहे. जो सर्व प्रकारच्या संकटांचा नाश करतो. शुक्र ग्रह आपल्या जीवनात रसिकता आणून जीवन आनंदमयी बनवतो. 

मनी प्लांट कोणत्या दिशेने ठेवू नये?

मनी प्लांट कधीही उत्तर-पूर्व (ईशान्य) दिशेला लावू नये. या दोन्ही दिशा वृक्षारोपणासाठी निषिद्ध पूर्वेला प्रकाशाचा थेट स्रोत असल्याने वृक्ष, झाडं, रोपटी यांच्यामुळे ऊर्जेचा प्रवाह थांबू नये, हा त्यामागचा उद्देश असतो. अशा स्थितीत मनी प्लांट या दिशेला लावल्यास अशुभ फळ मिळेल. पैशांचा ऱ्हास होईल. 

याच दिवशी मनी प्लांट लावा : 

वास्तुशास्त्रात रोप लावण्यासाठीही विशेष तिथी सांगण्यात आली आहे. यानुसार शुक्ल पक्षातील अष्टमीपासून कृष्ण पक्षातील सप्तमी तिथीपर्यंत मनी प्लांट  लावल्यास शुभ फळ मिळते.

याची काळजी घ्या :

>> मनी प्लांटचे रोप वेलीसारखे वाढते. त्यामुळे त्याची वेल नेहमी वरच्या दिशेने वाढली पाहिजे हे नेहमी लक्षात ठेवा. जमिनीला स्पर्श करत असल्यास, ते वरच्या दिशेने आधार देऊन वाढवा किंवा कापून टाका. मनी प्लांटची वर वाढणारी वेल समृद्धी वाढवणारी मानली जाते.

>> मनी प्लांटचे कोणतेही पान सुकले किंवा पिवळे पडले असेल तर ते ताबडतोब काढून टाकावे. असे मानले जाते की अशी पाने सुख आणि समृद्धीमध्ये अडथळा बनतात.

>> एवढी काळजी घेतली तरच मनी प्लांट लावण्यामागचा हेतू सफल होईल. तुम्ही निसर्गाची काळजी घ्या, निसर्ग तुमची काळजी घेईल. 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2024Vastu shastraवास्तुशास्त्र