शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंचा कोल्हापुरात काँग्रेसला मोठा धक्का! विद्यमान आमदार जयश्री जाधव शिवसेनेत
2
वळसे पाटलांच्या पराभवासाठी काय करायला हवं?; निकमांच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांचा कानमंत्र
3
पुढील मुख्यमंत्री भाजपाचा, राज ठाकरेंच्या विधानावर CM एकनाथ शिंदे काय म्हणाले..?
4
प्रकाश आंबेडकर छातीत दुखू लागल्याने पहाटेच हॉस्पिटलमध्ये दाखल; अँजिओग्राफी होणार
5
कशी ठरते तुमची CTC; बेसिक सॅलरी, ग्रॉस सॅलरी आणि नेट सॅलरीत फरक काय? जाणून घ्या
6
“मनसे साथीने भाजपाचा CM होणार”; राज ठाकरेंच्या विधानावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
7
DC ला आली पहिल्या प्रेमाची आठवण? हेच असू शकतं पंतच्या 'ब्रेकअप' मागचं कारण 
8
'फॅन्ड्री'मधील जब्या आणि शालूने केलं लग्न ? मंडपातील फोटो व्हायरल
9
महाराष्ट्राचा सर्वात श्रीमंत उमेदवार; २०१९ ला ५०० कोटी होती, २०२४ ला ५७५ टक्क्यांनी वाढली संपत्ती
10
...म्हणून श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापलं, दीपक केसरकर यांनी नेमकं कारण सांगितलं
11
गुजरातमध्ये राष्ट्रीय एकता दिनी झळकला दुर्ग रायगड; पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिली प्रतिक्रिया
12
अजित पवारांची जयंत पाटलांविरोधात खेळी, इस्लामपुरात महायुतीची रणनीती काय?
13
हिजबुल्लाहला नेतन्याहू घाबरले? मुलाचे लग्न स्थगित केले! दहशतवादी संघटनेच्या नव्या प्रमुखानं सांगितली इच्छा 
14
Sukesh Chandrasekhar : "मी माझी सीता जॅकलिनसाठी वनवासातून परतत आहे"; जेलमधून सुकेशचं जॅकलिनला 'लव्ह लेटर'
15
कुठेही जाण्याची गरज नाही, घरबसल्या उघडू शकता PPF खातं; काय करावं लागेल, किती मिळतंय व्याज?
16
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का; महापालिकेतील बड्या नेत्याने ४४ वर्षांची साथ सोडली, रवी राजा यांचा राजीनामा
17
दिग्दर्शक परेश मोकाशींना पितृशोक! मधुगंधाची सासऱ्यांसाठी भावुक पोस्ट, म्हणाली - "झोपल्या झोपल्या..."
18
Maharashtra Election 2024: 'सांगोला'वरून मविआमध्ये पेच! ठाकरे शेकापला कोणत्या जागा देण्यास तयार?
19
कायमच दिवाळी: ८ राशींवर लक्ष्मी-कुबेराची सदैव कृपा, लाभच लाभ; पैसाच पैसा, घरात अपार सुख!
20
Prakash Ambedkar: मोहोळमध्ये वंचितच्या उमेदवाराचा अर्ज अजब कारणामुळे ठरला अवैध!

Diwali 2024: स्वामींनी सांगितलेला 'हा' कानमंत्र लक्षात ठेवा; रोजच साजरी कराल दिवाळी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 11:18 AM

Diwali 2024: दिवाळी म्हणजे काय? तर दिव्याच्या प्रकाशाने अंधारावर केलेली मात, असाच आपल्या मनातला, बुद्धीतला अंध:कार दूर व्हावा म्हणून स्वामींनी सांगितलेला मंत्र म्हणा!

आज गुरुवार आणि दिवाळीचे (Diwali 2024) मंगलस्नान, अर्थात नरक चतुर्दशीचा (Narak Chaturdashi 2024) दिवस आणि उद्या १ नोव्हेंबर रोजी आश्विन अमावस्या अर्थात लक्ष्मीपूजनाचा दिवस! एकूणच दिवाळीचा सण हा केवळ दिव्यांनी रोषणाई करण्याचा नाही, तर आपल्या मनाचा, अज्ञानाचा, अहंकाराचा, अविश्वासाचा अंध:कार दूर करण्याचा आहे! दिवाळीचे आपण स्वागत केले, रोषणाई केली, आतषबाजी केली, फराळ केला, आता थोडा मनाचा उत्सव करूया. तिथे ज्ञानाचा, विश्वासाचा, शिक्षणाचा, एकात्मतेचा दीप लावूया. ती ज्योत कायम तेवत राहिली तर रोजचीच दिवाळी साजरी करू शकाल! त्यासाठी स्वामी समर्थांनी शिकवलेला कानमंत्र लक्षात ठेवा आणि अंमलात आणा!

आपण स्वामींची पूजा करतो, उपासना करतो, ते सदैव सोबत राहावेत अशी त्यांच्याकडे प्रार्थना करतो. स्वामींची कृपादृष्टी मिळावी म्हणून आपण त्यांच्या आवडत्या गोष्टी अर्पण करतो. मात्र खुद्द स्वामींना आवडणारी गोष्ट कोणती ते जाणून घेऊ. 

घराघरातल्या भिंतींवर सुविचार, तसबिरी, प्रेरक विचार लावलेले असतात. का? तर ते सतत आपल्या डोळ्यांसमोर राहावेत म्हणून! परंतु, आपले त्याच्याकडे लक्ष जात नाही आणि त्या केवळ शोभेच्या वस्तू होऊन राहतात. मात्र, कधी कधी जाणीवपूर्वक त्यांच्याकडे पाहावे, त्यातून खूप मोठा अर्थबोध होतो, जगण्याची प्रेरणा मिळते आणि निर्जीव भिंतीसुद्धा आपल्याशी बोलत असल्याचा भास होतो. पैकी घराघरात नजरेस पडणारा स्वामी समर्थांचा एक मौलिक विचार म्हणजे-

कोणतेही कारण असो, रागावू नका, चिडू नका,मोठ्याने बोलू नका,मन शांत ठेवा, विचार करा,नंतर अंमलबजावणी करा,त्रास फक्त तुम्हालाच, मन:शांती सुद्धा तुम्हालाच!विचार ही एक विलक्षणशक्ती असून, तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, नशिब बदलेल.

हे विचार नित्य आचरणात आणले, तर आपले आयुष्यच बदलून जाईल. आजच्या काळात क्षणाक्षणाला लोकांचा राग उफाळून येतो. भांडण-तंटे होतात. अपशब्द काढले जातात. वैरभाव निर्माण होतो. रागारागात आपले आणि दुसऱ्याचे मन:स्वाथ्य बिघडते आणि वरचेवर रागावण्याच्या, मनस्ताप करून घेण्याच्या सवयीमुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार इ. आजारांना शरीरात स्थान मिळते. आमरण गोळ्यांचा ससेमिरा सुरु होतो. अकाली आजार, शस्त्रक्रिया, मृत्यू ओढावतो. हे प्रकरण तिथे थांबत नाही, तर पुढची पिढी तो वैरभाव सुरू ठेवते आणि दुष्टचक्र सुरू राहते.

यासाठीच वरील सुविचारात म्हटले आहे, कोणतेही कारण असो, छोटे किंवा मोठे, रागावू नका. राग येण्याची क्रिया स्वाभाविक असते, परंतु क्षणभर त्या भावनेवर मात केली, तर राग आणि पुढील संभाव्य परिस्थिती नियंत्रणात आणता येते. सरावाने राग नियंत्रणात आणता येतो. त्यासाठी फक्त तो एक क्षण सावरता आला पाहिजे. 

रागाच्या भरात आपण मोठ्याने बोलतो, अपशब्द काढतो, जे ध्यानी-मनीही नसते, तेही बोलून जातो. याचा परिणाम म्हणजे, तो क्षण निसटून जातो, पण शब्द मागे राहतात. यासाठी त्या क्षणी मन शांत ठेवा. विचार करा. विचार कसला? तर खरेच रागावण्याची गरज आहे का? माझ्या रागवण्याने बदल घडणार आहे का? रागाच्या भरात समोरच्याचा अपमान होणार आहे का? आणि त्या रागाचा मला त्रास होणार आहे का? या गोष्टींचा विचार केला, तर तेवढ्या वेळात रागाचे जे कारण आहे, त्याची तीव्रता कमी होईल. मन शांत होईल. एखादवेळेस तुम्हाला हे जमले, की कायमस्वरूपी तुम्ही स्वत:च्या विचारांवर नियंत्रण मिळवू शकाल. त्याचा त्रास तुम्हालाही होणार नाही आणि इतरांनाही होणार नाही. 

या सुविचारातले शेवटचे वाक्य अत्यंत प्रभावी आहे, ते म्हणजे ` विचार ही एक विलक्षणशक्ती असून, तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, नशिब बदलेल.' आपले विचार आपला आचार घडवतात. अविचाराने केलेली कोणतीही कृती पश्चात्तापाला कारणीभूत ठरते. म्हणून प्रत्येक काम हे विचारपूर्वकच केले पाहिजे. आपले विचार नकारात्मकतेकडे झुकत असतील, तर त्यांना आळा घालून सकारात्मक विचारांचे पारडे जड केले पाहिजे. आपण जी कृती करतो, त्याला आपले विचार कारणीभूत असतात. म्हणून, आपली परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य आपल्या विचारांमध्ये आहे. त्या विचारांवर शांतपणे आपण विचार केला पाहिजे. आपोआप आपल्या स्वभावात, कामात आणि आयुष्यात बदल घडू लागेल आणि या बदलांबरोबरच नशीबही बदलू लागेल. तसेच आपली स्वामी भक्ती स्वामींपर्यंत नक्की पोहोचेल!

स्वामींची ही शिकवणी आपणही लक्षात ठेवूया आणि जास्तीत जास्त ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2024Mental Health Tipsमानसिक आरोग्य