आपण सगळेच जण रोज देवाची पूजा करतो. अगदी साग्रसंगीत नाही, पण किमान देवाचिये द्वारी उभा क्षणभरी अशी देवाची रोजची भेट होतेच. जेव्हा केव्हा फुरसत मिळते, तेव्हा मात्र अगदी मन भरेपर्यंत आपण स्वच्छता, पूजा अर्चा, धूप दीप, नैवेद्य दाखवून पूजा करतो आणि शेवटी 'आज देवालाही प्रसन्न वाटत असेल' असे मनोमन म्हणतो व सुखावतो. वास्तविक अशा देवपुजेने प्रसन्नता देवाला मिळते की आपल्याला? यावर कविवर्य मंगेश पाडगावकरांनी खूप छान कविता लिहिली आहे. त्या कवितेने आजच्या दिवसाची सकारात्मक सुरुवात करूया.
"सा रं का ही स्व तः सा ठी"
देवधर्म पूजाअर्चासारं असतं स्वतःसाठीदेवाला यातलं काहीनको असतं स्वतःसाठी
फूलं अर्पण करतो देवालाती काय त्याच्याकडे नाहीत म्हणून?सारी पृथ्वीच ज्याचा बगिचात्याला काय करायचंय फुलं घेऊन?
नैवेद्य जो आपण दाखवतोतो काय देव खातो?तो तर स्वतःच प्राणीमात्रांचंभरणपोषण करित असतो
निरांजनाच्या इवल्या ज्योतीनेओवाळतो आपण प्रभूलाचंद्रसूर्य जातीनेहजर ज्याच्या दिमतीला
स्तोत्रं त्याची गातो ती कायहपापलाय म्हणून स्तुतीला?निर्गुण निराकार जोत्याला अवडंबर हवंय कशाला?
सारं काही जे करायचंते स्वतःसाठीच असतं करायचंप्रार्थनेनं देव बदलत नसतोस्वतःच स्वतःला असतं सुधारायचं!