आठवड्याच्या प्रत्येक दिवसावर एका ग्रहाचे राज्य असते आणि हे संबंधित ग्रह त्या दिवशी जन्मलेल्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर त्यांच्या स्वभावाची खोल छाप सोडतात. आठवड्यातील सर्व दिवसांचा जीवनावर खोलवर परिणाम होतो. ज्या दिवशी व्यक्ती जन्मली त्या दिवसाच्या प्रभावामुळे त्या व्यक्तीचे वर्तन आणि त्याचे चारित्र्यही प्रभावित होते. चला त्याबद्दल अधिक जाणून घेऊया.
ज्यांची जन्मवेळ सकाळची असते : सकाळच्या वेळी जन्मलेली व्यक्ती धार्मिक असते. सामाजिक कार्यात भाग घेते. त्यांच्या जीवनात सर्व प्रकारच्या भौतिक सुखसोयी मिळाव्यात अशी त्याची इच्छा असते. असे लोक मित्रांमध्ये खूप लोकप्रिय असतात. त्यांची मानसिक आणि बौद्धिक क्षमता उच्च दर्जाची असते आणि दिसायला आकर्षक असतात.
रात्री जन्मलेले लोक : रात्री जन्मलेली व्यक्ती अबोल असतात मात्र रोमँटिक स्वभावाचे असतात. त्यांचा विरुद्ध लिंगाकडे अधिक कल असतो. ते हुशार आणि स्वतःचे मत पटवून देण्यात पटाईत आहेत. शारीरिक त्रासामुळे त्यांना विनाकारण त्रस्त राहावे लागते.त्यांच्याकडे अनेक प्रकारची गोपनीय माहिती सुरक्षित राहते.
सोमवारी जन्मलेले लोक बोलण्यात गोड असतात : सोमवारी जन्मलेली व्यक्ती चंद्राच्या प्रभावामुळे बुद्धिमान आणि शांत असते. हे लोक आपल्या गोड बोलण्याने इतर लोकांना सहज मोहित करतात. असे लोक स्थिर स्वभावाचे असतात आणि सुख-दु:खात समान वागतात.
मंगळवारी जन्मलेले लोक कुटुंबाचे नाव गाजवतात : मंगळवारी जन्मलेले लोक मंगळाच्या प्रभावामुळे तापट स्वभावाचे असतात, मात्र ते शूर, पराक्रमी असतात, आपला शब्द पाळतात आणि आपल्या कुटुंबाचे नाव उज्वल करतात.
बुधवारी जन्मलेल्या लोकांना अभ्यासात रस असतो : बुध ग्रहाच्या प्रभावामुळे बुधवारी जन्मलेले लोक अभ्यासू वृत्तीचे असतात. ज्ञान संपादन करण्यात रस, अनेक विषयांचे जाणकार, लेखकअसतात. विद्वत्तेच्या जोरावर श्रीमंत होतात. ते इतर लोकांवर सहज विश्वास ठेवत नाहीत.
गुरुवारी जन्मलेल्या लोकांना सन्मान मिळतो : या दिवशी जन्मलेली व्यक्ती बृहस्पतिच्या प्रभावामुळे विद्येत कुशल, धनवान, ज्ञानी, विवेकी आणि उत्तम सल्लागार असते. हे लोक इतरांना उपदेश करण्यात नेहमीच पुढे असतात. त्याचबरोबर त्यांना लोकांकडून मान-सन्मान आणि प्रसिद्धी मिळण्याची तीव्र इच्छा असते.
शुक्रवारी जन्मलेले लोक स्वभावाने चंचल असतात : शुक्रवारी जन्मलेले लोक चंचल स्वभावाचे असतात, भौतिक सुखांमध्ये मग्न असतात, वाद घालण्यात बुद्धिमान, धनवान आणि शुक्राच्या प्रभावामुळे तीक्ष्ण बुद्धीचे असतात. या लोकांचा देवावर विश्वास कमी असतो.
शनिवारी जन्मलेले लोक गंभीर स्वभावाचे असतात : शनिवारी जन्मलेले लोक कठोर स्वभावाचे, पराक्रमी, कष्टाळू, दुःख सहन करण्याची अद्भुत शक्ती असलेले, शनीच्या प्रभावामुळे स्वभावाने न्यायी आणि गंभीर असतात. सेवेमुळे या लोकांना प्रसिद्धीही मिळते.
रविवारी जन्माला आलेले सद्गुणी असतात : रविवारी जन्मलेली व्यक्ती तेजस्वी, हुशार, सदाचारी, उत्साही, दानशूर, परंतु सूर्याच्या प्रभावामुळे थोडी गर्विष्ठ आणि पित्त स्वभावाची असते. रविवारी जन्मलेल्या लोकांना खूप राग येतो.
एकूणच वार काय किंवा वेळ काय, ईश्वराने काही ना काही वैशिष्ट्य देऊन आपल्याला जन्माला पाठवले आहे, त्या वैशिष्ट्यांची ओळख करून घेत आपण आपले व्यक्तिमत्त्व खुलवणे हे सर्वार्थाने आपल्या हातात आहे.