प्रश्न: मधुमेहापासून सुटका करून घेण्यात योग मदत करू शकतो का?
सद्गुरू: जुनाट व्याधी मग त्या कोणत्याही असोत त्यांचं मूळ हे कायम प्राणमय कोषात असतं. तुमचा प्राणमय कोष ज्याप्रकारे काम करतो त्यामागे बरीच करणं असतात. ते कदाचित तुम्ही ज्या वातावरणात राहता त्यामुळे असेल, तुम्ही ज्याप्रकारचे अन्न खाता त्यामुळे असेल, तुम्ही ज्याप्रकारचे नातेसंबंध ठेवता त्यामुळे असेल, तुमच्या भावना, दृष्टिकोन, विचार आणि मतं यामुळे असेल. हे कदाचित बाहेरच्या ऊर्जा ज्या तुमच्या आतील ऊर्जेला अडथळा आणतात त्यामुळे असेल. कोणत्यातरी कारणामुळे तुमचा प्राणमयकोष अशांत बनला आहे त्याचे नैसर्गिकपणे शारीरिक आणि मानसिक पडसाद पडतात. एकदा शरीराचा हा स्तर- प्रणमयकोष- जर अशांत झाला, तर मनोमयकोष आणि अन्नमयकोष अशांत होणारच. खरंतर वैद्यकीय समस्या झाल्यावरच ही डॉक्टरसाठी एक काळजीची घटना होते. तोपर्यंत डॉक्टरांना काळजी नसते कारण शारीरिक पातळीवर ते प्रकट झालेले नसते.
दुर्दैवाने, वैद्यकशास्त्राला फक्त रोग कळतात. आरोग्याचं मूळ त्याला कळत नाही, म्हणजे ते कशातून येतं आणि आरोग्याचा आधार काय आहे. जर तुम्हाला मधुमेह असेल तर साखर हि तुमची समस्या नाही. केवळ तुमच्या पँक्रिया योग्य रीतीने काम करत नाहीयेत. आपत्कालीन उपाय म्हणून तुम्ही साखर कमी खाता कारण एलोपॅथीमध्ये तुमच्या पँक्रिया सक्रिय करण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही, त्यामुळे हाच उपाय त्यांनी तुम्हाला शिकवलाय - “तुम्ही शुगर रोज तपासा आणि थोडं जास्त इन्सुलिन घ्या.” एलोपॅथीमध्ये उपायांमध्ये लक्षणांवर भर असतो; तुमच्या लक्षणांकडे बघून डॉक्टर तुमच्यावर उपचार करतात.कोणत्याही इन्फेकशनसाठी (संक्रमणासाठी) एलोपॅथी अत्यंत उपयुक्त आहे. तुमच्या शरीराबाहेरून येणाऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी एलोपॅथी सर्वोत्कृष्ट आहे. पण मनुष्य त्याच्या आत निर्माण करतो अश्या साध्या रोगांवर - मधुमेह, रक्तदाब, मायग्रेन(अर्धशिशी) एलोपॅथीकडे उत्तर नाही. आधुनिक वैद्यकशास्त्र केवळ रोग ताब्यात ठेवू शकते आणि तुमची रोगापासून सुटका करण्याबद्दल बोलत नाही. रोगाला विशिष्ट मर्यादेत ठेवायला वैद्यकशात्राच्या अनेक शाखा आणि स्पेशालिस्ट आहेत. खूप वेळ आणि पैसा हा रोग केवळ ताब्यात ठेवण्यासाठी घालवला जातो. हे म्हणजे लोक तणावाच्या व्यवस्थापनाबद्दल बोलतात तसं आहे. लोकांना त्यांच्या ताणाचं व्यवस्थापन करायचं असतं, लोकांना त्यांच्या मधुमेहाचं व्यवस्थापन करायचं असतं, लोकांना त्यांच्या रक्तदाबाचं व्यवस्थापन करायचं असतं. हे हास्यास्पद आहे. हा असा मूर्खपणा आला आहे, कारण त्यांना ही साधी गोष्टं कळत नाही की त्यांची जीवन ऊर्जा कशी काम करते.
योगामध्ये मधुमेहाकडे खूप मूलभूत अशांती म्हणून बघितले जाते. मधुमेहाला एक फक्त साधा रोग म्हणून बघितले जात नाही. आम्ही त्याकडे असे बघतो की शरीराची मूलभूत रचनाच अशांत झाली आहे. म्हणूनच मधुमेह होतो. आणि तो प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळा असतो. प्रत्येक व्यक्तीत या गोंधळाची पातळी, प्रकार हा प्रत्येक संस्थेत वेगवेगळी असते. म्हणून त्याला व्यक्तिसापेक्ष हाताळावे लागते. पण तरीही, विकार कोणताही असला तरी योग हा प्रणमयकोषाचे संतुलन आणि त्याला ऊर्जित किंवा सक्रिय करणे या हेतूने काम करतो. योग अशी पूर्वमांडणी करतो की जर तुमचा प्रणमयकोष हा पूर्ण प्रवाही असेल आणि योग्यरीत्या संतुलित असेल तर तुमच्या अन्नमयकोषात किंवा मनोमायकोषात जुनाट आजार असणार नाहीत. आम्ही रोगावर इलाज करत नाही, आम्ही रोगांकडे प्रणमयकोषातल्या गोंधळाचे प्रकटीकरण म्हणून बघतो.
जर लोक आपला प्रणमयकोष संतुलित करण्यासाठी आणि सक्रिय करण्यासाठी काही प्रमाणात साधना करण्यासाठी तयार असतील तर ते निश्चितपणे सर्व आजारांपासून मुक्त होऊ शकतात.