शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

आज गोपाष्टमीच्या निमित्ताने गोमातेची सेवा करायला आणि गाय-वासराला चारा घालायला विसरू नका!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 2:03 PM

भगवान श्रीकृष्णाने गायीला जवळ केले, तिच्यासाठी वेणुवादन केले, गायींना चरण्यासाठी नेले, त्यांचे रक्षण केले, तसे आपणही गोमातेच्या ऋणात राहूया आणि गोसेवेस सुरुवात करूया. 

भारतीय संस्कृतीप्रमाणे गायीला फार महत्त्व आहे. तिला माताही म्हणतात. ती सात्त्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्त्विक गुणांचा स्वीकार करावयाचा आहे. आज गोपाष्टमी आहे. यानिमित्ताने वसुबारसेला आपण जशी गाय वासराची पूजा केली, तशीच पूजा किंवा त्यांची सेवा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे अभिप्रेत आहे. 

सत्त्वगुणी, म्हणजेच आपल्या सहवासाने दुसर्‍याला पावन करणार्‍या, आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणार्‍या, आपले अंग-प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणार्‍या, शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणार्‍या, शेतीला उपयुक्‍त अशा बैलांना जन्म देणार्‍या, श्रीकृष्णाला प्रिय असलेल्या व सर्व देवांनी तिच्यात वास्तव्य करावे, अशी योग्यता असलेल्या गोमातेचे या दिवशी पूजन करतात. ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण-संवर्धन होऊन तिला पूज्यभाव देऊन तिचे पूजन होते, त्या ठिकाणी ती व्यक्‍ती, तो समाज, ते राष्ट्र भरभराटीस आल्याशिवाय रहात नाही. अशा गौमाता तसेच गौपालक, गौसेवक, गौरक्षक यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच गोपाष्टमी होय!

गोपाष्टमी दिवशी:

>>गोशाळेत जा. गाय वासरांना चारा खाऊ घाला त्यांची सेवा करा. 

>>गोमातेचे पूजन करा तसेच गोसेवकांचा मान सन्मान करून त्यांच्या गोपालन उपक्रमाबद्दल आभार माना. 

>>गायीच्या पावलांचे प्रतीक म्हणून दारात किंवा देवघरासमोर गोपद्म काढून त्यांवर हळद कुंकू फुले वाहून पूजा करा. 

>>अधिक मासात ३० + ३ गोपद्म काढतात तसेच गोपाष्टमीला देखील ३३ गोपद्म काढून त्यांची पूजा करतात. 

>>गायीला भिजवलेली डाळ गूळ, तिळ गूळ, पोळी, हिरवा चारा किंवा भाजीपाला द्या, मात्र भात देऊ नका कारण त्यांना भात पचवण्यास त्रास होतो. 

>>यथाशक्ती गोशाळेला दान करा. गाय दत्तक घेता आली नाही तरी निदान आठवड्यातून, महिन्यातून, पंधरा दिवसांनी शक्य होईल तेव्हा गोशाळेत जाऊन सेवा द्या. ही केवळ भूतदया नाही तर गोमातेची सेवा आहे, हे लक्षात घ्या.  

भगवान श्रीकृष्णाने गायीला जवळ केले, तिच्यासाठी वेणुवादन केले, गायींना चरण्यासाठी नेले, त्यांचे रक्षण केले, तसे आपणही गोमातेच्या ऋणात राहूया आणि गोसेवेस सुरुवात करूया.