शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
2
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
3
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
4
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
6
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
7
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
8
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
9
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
10
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
11
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
12
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
13
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
14
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
15
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
16
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
17
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
18
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
19
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
20
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार

निद्रानाशावर उपचार म्हणून नुसती औषधं घेऊ नका, सोबतच रात्रीसूक्त म्हणा; ढाराढूर झोपाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2023 12:11 PM

काहींची झोप पूर्ण होत नाही, तर काहींना झोपच लागत नाही; अशा लोकांनी निद्रा देवीला प्रसन्न करण्यासाठी पुढील स्तोत्र म्हणावं!

पूर्वी अंथरुणावर पडल्याबरोबर माणसांना लगेच झोप लागत असे. कारण नियमितपणा, जीवनस्थिर, शांत व भयरहित होते. आता त्या उलट भयग्रस्तता, अस्थैर्य व अशांतता असून द्रुतगती वाहनाने व दहशतवादाने केव्हा काय होईल याचा नेम नाही. अशा भीतीने व शहरातील वाढत्या उद्योग, यंत्रयुगाने आणि गर्दीमुळे तसेच ध्वनिप्रदूषणाने व मनावरील ताणतणावामुळे अनेकांना लवकर झोप येत नाही. पाच सहा तास गाढ झोप लागली तरी माणसाला तरतरी व उत्साह येतो. झोप येण्याकरता उपाय म्हणून झोपेच्या गोळ्या घेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. काही लोक मादक द्रव्य घेतात. तरीदेखील अनुत्साह, कामात लक्ष न लागणे, आरोग्य बिघडणे अशा गोष्टी घडू लागतात. 

झोप न लागण्याकरता महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत. त्या म्हणजे विचारचक्र थांबणे व लय लागणे. या दोन गोष्टी साधल्या तर अन्य गोष्टींची गरजच लागणार नाही. मानवी जीवनाचा सर्वांगाचा विचार करताना पूर्वसुरीनी विचार करून ठेवला आहे आणि रचना केली आहे रात्रीसुक्ताची! देवीची अनेक रूपे आहेत, त्यापैकी एक रूप आहे निद्रा देवीचे. तिची आराधना करत पुढील रात्रीसूक्त म्हटल्यास निद्रानाशाचा त्रास दूर होतो असा भाविकांना अनुभव आहे. 

रात्रीसूक्त 

ॐ विश्वेश्वरी जगद्धात्री स्थितिसंहारकारिणीम् । निद्रां भगवतीं विष्णोरतुलां तेजसः प्रभुः ॥ १ ॥ 

त्वं स्वाहा त्वं स्वधा त्वं हि वषट्कारः स्वरात्मिका । सुधा त्वमक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता ॥ २ ॥ 

अर्धमात्रास्थिता नित्या यानुच्चार्या विशेषतः । त्वमेव सन्ध्या सावित्री त्वं देवि जननी परा ॥ ३ ॥ 

त्वयैतद्धार्यते विश्वं त्वयैतत्सृज्यते जगत् । त्वयैतत्पाल्यते देवि त्वमत्स्यन्ते च सर्वदा ॥ ४ ॥ 

विसृष्टौ सृष्टिरूपा त्वं स्थितिरूपा च पालने । तथा संहृतिरूपान्ते जगतोऽस्य जगन्मये ॥५ ॥ 

महाविद्या महामाया महामेधा महास्मृतिः । महामोहा च भवती महादेवी महासुरी ॥ ६ ॥ 

प्रकृतिस्त्वं च सर्वस्य गुणत्रयविभाविनी । कालरात्रिर्महारात्रिर्मोहरात्रिश्च दारुणा ।। ७ ॥ 

त्वं श्रीस्त्वमीश्वरी त्वं ह्रीस्त्वं बुद्धिर्बोधलक्षणा । लज्जा पुष्टिस्तथा तुष्टिस्त्वं शान्तिः शान्तिरेव च ॥ ८ ॥ 

खड्गिनी शूलिनी घोरा गदिनी चक्रिणी तथा । शङ्खिनी चापिनी बाणभुशुण्डीपरिघायुधा ॥ ९ ॥ 

सौम्या सौम्यतराशेषसौम्येभ्यस्त्वतिसुन्दरी । परापराणां परमा त्वमेव परमेश्वरी ॥१० ॥ 

यच्च किञ्चित् क्वचिद्वस्तु सदसद्वाखिलात्मिके । तस्य सर्वस्य या शक्तिः सा त्वं किं स्तूयसे तदा ॥११ ॥ 

यया त्वया जगत्स्स्रष्टा जगत्पात्यत्ति यो जगत् । सोऽपि निद्रावशं नीतः कस्त्वां स्तोतुमिहेश्वरः ॥ १२ ॥ 

विष्णुः शरीरग्रहणमहमीशान एव च । कारितास्ते यतोऽतस्त्वां कः स्तोतुं शक्तिमान् भवेत् ॥ १३ ॥ 

सा त्वमित्थं प्रभावैः स्वैरुदारैर्देवि संस्तुता । मोहयैतौ दुराधर्षावसुरौ मधुकैटभौ ॥१४ ॥ 

प्रबोधं च जगत्स्वामी नीयतामच्युतो लघु । बोधश्च क्रियतामस्य हन्तुमेतौ महासुरी ॥१५ ॥