शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
3
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
4
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
5
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
6
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
7
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
8
उदय सामंतांविरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला; पक्षप्रवेश होताच हाती मिळाला AB फॉर्म
9
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 
10
"मुलीला शिकवलंस तर सुशिक्षित नवरा कुठून आणणार?", लोकांचे टोमणे; मजुराची लेक झाली अधिकारी
11
ग्राहकाचे 50 पैसे ठेवणं डाक विभागाला भोवलं! आता भरपाई पोटी किती रुपये द्यावे लागणार? निकाल जाणून थक्क व्हाल!
12
Maharashtra vidhna Sabha 2024: शिंदेंच्या शिवसेनेचे पावशे निवडणूक लढविण्यावर ठाम
13
मोठी बातमी! "उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला, जो शब्द..."; संभाजी ब्रिगेडनं युती तोडली
14
"उद्धव ठाकरेंनी नातं..."; अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देताच शिवसेना नेत्याने सोडलं मौन
15
"माझ्या मतदारसंघात शरद पवार फॅक्टर चालणार नाही’’, अजित पवार गटातील आमदाराचा दावा
16
'आम्ही युद्धाचे नाही, संवाद अन् मुत्सद्देगिरीचे समर्थक', BRICS मधून पीएम मोदींचा जगाला संदेश
17
आमदार विरुद्ध आमदार! कोरेगावात 'तुतारी' वाजणार की 'धनुष्यबाण' सुस्साट? दोन शिंदेंमध्ये लढत
18
जनतेच्या मनातला सामान्य आमदार मिळेल; उमेदवारी घोषित होताच महेश सावंत यांचा टोला
19
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात पोलिसांना आणखी एक आरोपी सापडला; आतापर्यंत ११ जणांना अटक
20
माहिमच्या हायप्रोफाइल लढतीत उद्धव ठाकरेंनी उतरवला शिवसैनिक, कोण आहेत महेश सावंत?

...म्हणून 'उंदीर मामा की जय' असा जयघोष करू नका!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2020 7:20 AM

बाप्पासाठी नाही, तर निदान आपल्या बळीराजाच्या शत्रूसाठी तरी उंदीरमामाचा जाणीवपूर्वक जयघोष थांबवूया आणि इतरांनाही तसे करण्यापासून परावृत्त करूया. 

गणपती बाप्पा मोरया पाठोपाठ उंदीर मामा की जय, म्हणण्याची टूम सुरू झाली आहे. लहान मुलांसाठी गंमत म्हणून एखाद वेळेस म्हणणे ठीक आहे, परंतु उंदीर हे रूपक असून आपले यश, सुख, समृद्धी कुरतडणाऱ्या गोष्टींचे ते प्रतिक आहे. त्यावर बाप्पाने अंकुश मिळवून ताबा ठेवला आणि आपण मात्र मजे मजेत खलवृत्तीचा जय जयकार करत आहोत. ते थांबायला हवे. त्यासाठी पौराणिक कथा आणि या रुपक कथेमागील तर्कशास्त्र याचा नीट विचार करायला हवा. 

हेही वाचा : उजव्या सोंडेचा गणपती घरात ठेवावा की नाही? शास्त्र काय सांगते?

गणपतीचे वाहन म्हणून उंदिर प्रसिद्ध आहे. खरे म्हणजे उंदराप्रमाणे मोर हेसुद्धा गणपतीचे वाहन आहे. पण गणपतीच्या मूर्तीपाशी जशी उंदराची लहानशी मूर्ती ठेवली जाते किंबहुना ती ठेवणे अत्यावश्यक मानले जाते, तसे उंदराजवळ विंâवा उंदराऐवजी मोर हवाच असा आग्रह कोणी धरत नाही. मोर हे गणेशाचे वाहन आहे, हे लक्षात घेऊन गणपतीला मोरेश्वर, मयुरेश्वर अशी नावे दिलेली आढळतात. तरीही गणपतीचे मूषक वाहन अधिक प्रसिद्ध आहे. आता एवढासा उंदीर त्याच्यावर एवढा मोठा बाप्पा स्वार तरी कसा होणार? आणि स्वार झाला तरी गणपतीला पाठीवर घेऊन उंदीर कसा धावणार? 

उंदीर हा गणपतीचे वाहन का झाला त्याबद्दल विविध प्रकारच्या कथा आहेत. त्यापैकी एक कथा अशी, क्रौंच नावाचा एक गंधर्व इंद्रसभेत उपस्थित असताना चुकून त्याचा पाय वामदेवाला लागला. रागावलेल्या वामदेवाने तू उंदीर होशील, असा शाप दिला. त्या शापाप्रमाणे क्रौंच गंधर्व उंदीर झाला आणि उंदराच्या रूपात थेट पराशरमुनींच्या आश्रमात दाखल झाला. त्याने आश्रमात जेवढे काही खाण्यासारखे होते, ते खाऊन टाकले व खाण्यासारखे नव्हते ते कुरतडून टाकले. त्याचा हा धुडगूस असह्य होऊन परशर ऋषींनी उंदरापासून मुक्तता व्हावी, म्हणून गणरायाची प्रार्थना केली. श्रीगणेश तिथे प्रगट झाले. त्यांनी आपला पाश उंदरावर टाकला. उंदराची सुटका होणे कठीण. तो शरण आला. प्रसन्न झालेल्या बाप्पाने त्याला `वर माग' म्हटले. घाबरलेल्या उंदराला काय मागावे सुचलेच नाही. मात्र अन्न धान्य खाऊन मदमस्त झालेला उंदीर बाप्पाला म्हणाला, `तुमच्याकडून काही नको, माझ्याकडून काही हवे असेल तर मागा.' यावर बाप्पा हुशारीने म्हणाले, `ठीक आहे, आजपासून तु माझे वाहन हो.' उंदराचा गर्व उतरला, पण आता त्याला सेवा देण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याला बाप्पाचे ओझे उचलावे लागले. 

ही झाली रुपकात्मक कथा. परंतु त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. उंदीर हा शेतीचा नाश करणारा आहे आणि गणपती हा शेतकऱ्यांचा देव असल्यामुळे त्याने उंदराला अंकित करून घेतले आहे. असेही एक मत किंवा एक तर्क या विषयात सांगतात. गणपती हा शेतकऱ्यांचा देव आहे. याचे स्पष्टीकरण देताना गणपतीचे शूर्पकर्ण म्हणजे सुपासारखे कान ही शेतकऱ्याची दोन सुपे आहेत आणि गणपतीची सोंड ही भाताच्या लोंब्यांसारखी आहेत, असेही सांगितले जाते. गणपती हे सूर्याचेही एक रूप असून तो दिवसाचा सूर्य म्हणून रात्रीवर आरूढ झाला आहे आणि उंदीर हा रात्री सर्वत्र संचार करत असल्यामुळे रात्ररूपी उंदरावर गणेशरूपी सूर्य आरूढ झाला असेही सांगितले जाते. एक गोष्ट मात्र खरी, उंदीर हा थोड्याच वेळात मोठ्या संख्येने वाढू शकतो. उंदराच्या जातीची वाढ फार झपाट्याने हाते. त्याच्यावर नियंत्रण गणेशाने आणले आणि त्याच्या कुरतडण्याच्या, तसेच नासधूस करण्याच्या वृत्तीला कायमस्वरूपी आळा घातला. 

त्यामुळे यापुढे बाप्पासाठी नाही, तर निदान आपल्या बळीराजाच्या शत्रूसाठी तरी उंदीरमामाचा जाणीवपूर्वक जयघोष थांबवूया आणि इतरांनाही तसे करण्यापासून परावृत्त करूया. 

मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया!

हेही वाचा : बाप्पाला कोणत्या प्रकारे केलेली पंचारती आवडते? वाचा

टॅग्स :ganpatiगणपती