दसरा हा हिंदूंच्या महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे, कारण या दिवशी भगवान श्रीराम यांनी रावणाचा वध करून विजयोत्सव साजरा केला होता. समाजातील रावणासारख्या दुष्प्रवृत्तीचे दहन व्हावे म्हणून दरवर्षी या दिवशी रावण दहन करून आपण हा सण साजरा करतो. तसेच आपट्याचे पान देऊन आपापसातील मतभेद विसरून विचारांचे सोने लुटतो. नवरात्रीचा हा दहावा दिवस परवावर येऊन ठेपला आहे. यंदा ५ ऑक्टोबर रोजी दसरा आहे. हा दिवस तर शुभ आहेच, परंतु या दिवशी जुळून येणाऱ्या आणखी तीन शुभ मुहूर्तांमुळे या दिवसाचे महत्त्व अधिक वाढले आहे.
यंदाचा दसरा :
या वर्षी दसरा बुधवार, ५ ऑक्टोबर २०२१ रोजी साजरा केला जाईल. यंदा नवरात्रीत कोणत्याही तिथी एकाच वेळेस न आल्याने नऊ दिवस उत्साहाचे वातावरण कायम होते. आणि आता दसऱ्याची उत्सुकताही वाढली आहे. या दिवशी जुळून येणारे विशेष मुहूर्त पाहू.
दसऱ्याचा शुभमुहूर्त :
मंगळवार ४ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी २ वाजून २१ मिनिटांपासून अश्विन शुद्ध दशमी दशमी सुरू होत आहे आणि गुरुवार ५ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी १२ नंतर ही तिथी संपेल. परंतु दशमीची तिथी ५ तारखेचा सूर्योदय पाहत असल्यामुळे विजय दशमीचा सण गुरुवारी ५ ऑक्टोबर २०२२ रोजी साजरा केला जाईल.
शस्त्र पूजनाची वेळ :
दसऱ्याच्या दिवशी आपण वाहनांची, शस्त्राची आणि शैक्षणिक साहित्याची पूजा करतो. पाटीवर, वहीवर अंकांची सरस्वती रेखाटून त्याची पूजा केली जाते. त्याचे शुभ मुहूर्त जाणून घेऊ.
विजय मुहूर्त : ५ ऑक्टोबर बुधवार २ वाजून १३ मिनिटांपासून दुपारी २. ५४ पर्यंतअमृत काल - ५ ऑक्टोबर, बुधवार सकाळी ११. ३३ ते दुपारी १.०२पर्यंतदुर्मुहूर्त - ५ ऑक्टोबर, बुधवारी सकाळी ११. ५१ मिनिटांपासून ते १२.३८ पर्यंत
ही पूजा कशी करावी -
दसऱ्याच्या दिवशी पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचे कापड अंथरून घ्या. त्यावर गणपतीची आणि देवीची किंवा रामाची प्रतिमा ठेवा. त्याला हळद, कुंकू, फुले अर्पण करा. तसेच नवग्रहांची स्थापना करा आणि आपल्या इष्ट देवतेची पूजा करा. स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवा. यानंतर, आपल्या इच्छेनुसार गरजूंना दान आणि दक्षिणा द्य. मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घ्या. देवाला आपट्याचे पण ठेवा आणि नंतर इतरांना ते सोने अर्पण करा.
हा सण आपल्याला अनैतिकता, अंधश्रद्धा, अनाचार याविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतो. ही प्रेरणा घेऊन आपणही आपल्यातला राम आणि जगदंबा जागृत करून अन्यायाशी दोन हात करण्यासाठी कंबर कसली पाहिजे.