शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे एकनाथ शिंदेंना दोष देता येणार नाही; अमित ठाकरे राजकीय उलथापालथीवर रोखठोक बोलले!
2
NCP: अजित पवारांकडून आदेशाचे उल्लंघन, शरद पवार गटाने दिले पुरावे; सुप्रीम कोर्टाने दिला इशारा
3
Vidhan Sabha Election 2024: लोकसभेला बसला फटका; आता 'तुतारी'चा वेगळ्या पद्धतीने प्रचार
4
महायुतीच्या बंडखोरांवर अमित शाहांचे लक्ष; शिंदे-फडणवीस-पवारांना दिल्या विशेष सूचना...
5
शरद पवारांचा शब्द उद्धव ठाकरे पाळणार?; सांगोला मतदारसंघावरून हायव्होल्टेज ड्रामा
6
भयंकर! ३ महिने लेकाने घरातच ठेवला आईचा मृतदेह, शेजाऱ्यांना संशय आला अन् झाली पोलखोल
7
ज्या माणसानं 'घड्याळ' बनवलं त्यानं सेल काढून टाकलेत; रोहित पाटील विरोधकांवर कडाडले
8
माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?
10
पुण्याच्या मैदानात Washington Sundar चा जलवा! न्यूझीलंडचा पहिला डाव २५९ धावांत आटोपला
11
बिग बॉसमधून कधी बाहेर यायचं हे आधीच ठरलं होतं? गुणरत्न सदावर्तेंचा मोठा गौप्यस्फोट
12
उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना भुजबळांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, हाती घेतला भाजपचा झेंडा; म्हणाले...
13
यशस्वी डाव! वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; चेंडू कसा वळला ते रचिनसह टॉमलाही नाही कळलं (VIDEO)
14
सीएम ओमर अब्दुल्लांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
15
एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई
16
अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
17
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक, १४४२ रुपयांनी स्वस्त झाली चांदी; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
18
इथे ठाकरे गटाशी युती तोडली, तिथे संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज जरांगेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
19
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
20
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा

सहज बोलणे हित उपदेश…!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 5:58 PM

संत जे बोलतात त्यामध्ये कुणाचेही अहित नसते तर लोकहितासाठीच त्यांच्या कर्म वाणीचा संकल्प असतो. 

संतांचे सहज बोलणे हे हितोपदेश करण्यासारखे असते. संतांची वाणी ही नेहमीच लोक कल्याणा करीता झिजलेली आहे. संत जे बोलतात त्यामध्ये कुणाचेही अहित नसते तर लोकहितासाठीच त्यांच्या कर्म वाणीचा संकल्प असतो.  संतांनी लोकांना त्यांच्या जीवनजगण्यामध्ये  कोणकोणत्या जीवनमूल्यांचा  अंगीकार  केला तर मानवी जीवन अधिक सुखमय व निरामय होवू शकते असा संदेश त्यांनी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून  व किर्तनाच्या माध्यमांद्वारे  समाजाला दिला. त्यांनी समाजाचे प्रबोधन कर करता समाजाला एक डोळस दृष्टी देण्याचे काम  केले. समाजातील सर्व जातीधर्माचे संत या लोकोद्धाराच्या कार्यामध्ये सहभागी झाले होते. प्रत्येक प्राणीमात्राविषयी  भूतदया, मानवता व लोककल्याणाचा दृष्टीकोन त्याच्याकडे होता.

 लोकोध्दाराच्या या कार्यमंदीर उभारणीमध्ये संत ज्ञानेश्वरांनीज्ञानेश्वरीची रचना व हरिपाठाचे अभंग रचून या मंदीराचा पाया रचण्याचे महत्वाचे कार्य केले. तर नामदेवांनी त्या मंदीराच्या भींती बांधण्याचे  कार्य  म्हणचजे या कार्याचा महाराष्ट्रा बाहेरही विस्तार केला. त्यानंतर एकनाथांनी त्यावर घुमट चढविण्याचे कार्य   एकनाथी भागवत रचून व आपल्या वागणूकीतून केले.   तुकारामांनी लोकशिक्षणाच्या या मंदीराचा कळस चढविण्याचे महत्वाचे कार्य अभंगवाणीच्या व किर्तनाच्या निमित्ताने कार्य केले. 

 संत बहिणाबाई यांनी या  लोकशिक्षणाच्या कार्याचे वर्णन खालील अभंगात केले आहे-

“संतकृपा झाली । इमारत फळा आली

ज्ञानदेवे रचिला पाया । उभारिले देवालया

 

नामा तयाचा किंकर । जेणे केला हा विस्तार

नाथ दिला भागवत । तोचि मुख्य आधार

तुका झालासे कळस । भजन करा सावकाश”1

 

संतांचे बीजशब्

 लोकशिक्षण, लोककल्याण मानवता, भूतदया, ईश्वरभक्ती, विचारशैली, कर्मकांड, मुठमाती .

संतांचे लोकोध्दाराचे व लोकशिक्षणाचे  कार्य अलौकिक आहे. संतांनी सर्व समाजाला समतेची शिकवण दिली, त्यांनी प्रत्येक व्यक्तीमध्ये भगवंत पाहण्याचे काम केले. तो कोणत्या समाजाचा आहे. शिक्षणाने फक्त शिक्षित होऊन चंगळवाद, भोगवादाकडे आकृष्ट होणारी फार मोठी जनसंख्या आज प्रत्ययास येत आहे. शिक्षण वाढले पण संस्कार नासले. नुसत्या शिक्षणाने  माणुस फक्त शिक्षित होतो. सु- शिक्षित होत नाही. मूल्याधिष्ठीत शिक्षणाची आज गरज आहे. संतश्रेष्ठांनी आपल्या जीवनात जीवनमूल्यांना स्थान दिले. अनुभूतीतून विचार निवदन  केला. संस्कृती संपन्न अभंगरचना हे महाराष्ट्रदेशीचे संतवैभव आहे. तुकोबांनी एक वेगळी दृष्टी जीवनजगण्याची व्यक्त केली. व्यक्तिगत आत्मविष्कार निवेदन करणारा हा आगऴावेगऴा संतकवी मानवी मनाची उत्तुंगता सदैव प्रगट करतो. “ चांगले पेरले तर चांगलेच उगवते ही त्यांची मोलाची शिकवण होती. महाराष्ट्र ही संताची आणि वीरांची भूमी आहे. ज्याप्रमाणे या भूमीत वीरांनी आपल्या तेजोपताका फडकवून महाराष्ट्राची आण, बाण आणि शान कायम राखली. त्याचप्रमाणे  येथील संतांनी दया, क्षमा, शांतीचा संदेश देऊन समाजात मानवता रूजविण्याचे कार्य केले. संतांनी अद्वैताचा अंगिकार करून प्राणिमात्रात देव शोधण्याचा प्रयत्न केला. शिवाय ‘जे जे भेटे भूत ।ते ते मानिजे भगवंत’ असा दृढ संकल्प धरून त्याप्रमाणे आचरण केले. महाराष्ट्ररात वारकरी संप्रदायाचे  धर्ममंदिर उभारण्यात ज्ञानदेवापासून तर तुकारामांपर्यंत सर्वच संतांचे कर्तृत्व महत्त्वाचे ठरले  आहे. संत तुकारामाशिष्या बहिणाबाई हिचा ‘ संतकृपा झाली’ भागवत मंदिराविषयीचा अभंग प्रसिद्ध आहे. एका अर्थाने संत बहिणाबाईने एकूनच भागवत संप्रदायातील संताचे कार्य आणि कर्तृत्व यांचा आलेखच आपल्या अभंगातून  साकार केला आहे. भागवत मंदीराचा पाया रचण्याचे काम ज्ञानदेवांनी केले तर या मंदीराचा कळस होण्याचे भाग्य तुकारामांना लाभले; आणि त्यावरील फडकती ध्वजा होण्याचा बहूमान बहिणाईला प्राप्त झाला असे स्पष्ट रचून तिने त्यातून भागवत परंपरेचा सर्व तपशील प्रभावीपणे मांडला आहे”2.

 संताची सामाजिक एकात्मता आजही गरजेची आहे.

संत ज्ञानेश्वरांनी उपासना व ज्ञानसाधनेची कर्मयुक्त प्रेमभक्तीचा, ज्ञानभक्तीचा पुरस्कार करून स्त्री शुद्रांना भक्तीमार्ग दाखविला शिवाय तळागाळापर्यंत ‘गीतार्थ’ पोहचविण्याचे अतुलनीय कार्य केले. विशेष म्हणजे या धर्ममंदीराची पायाभरणी त्यांनी मातृभाषेने केली. ज्ञानेश्वरांच्या पश्चात नामदेवांनी ज्ञानेश्वरांच्या चिद्वविलासाचा आणि भगवद् भक्तीचा विस्तार करून भागवतधर्माची पताका पंजाबपर्यंत नेली. तर संत एकनाथांनी गुरू जनार्दनस्वामींकडून दत्तपरंपरा आणि ज्ञानेश्वरांपासून वारकरी परंपरा यांचा सुरेख मेळ साधून भागवत मंदीराला आधार दिला. त्यामुळेच समाजाच्या अठरापगड जातीतील संतांना त्यात आपली भावपुष्पे समर्पित करता येऊ शकली. अशा समृद्ध मंदीरावर तुकारामांनी सुवर्णकळस चढविला, तोही आपल्या सौंदर्यपूर्ण आणि आशयघन असणा-या अभंगगाथेने. ज्ञानेश्वरांनी मांडलेला तत्वविचार आणि केलेला भक्तिमार्गाचा पुरस्कार असा एखाद्या रजत प्रपाताप्रमाणे संत तुकारामांपर्यंत येऊन ठेपला आणि भागवत मंदीराचे कार्य पूर्णत्वास गेले. 

 संताचा भक्तीसंदेश समजून घेणे गरजेचे 

संत तुकारामांनी आपल्या वाङमयाचा ‘अभंग’ कळस भागवतधर्माच्या  इमारतीप्रमाणे दिला. तो कळस शतकनुशतके उन्हापावसाला आणि वादळवा-याला पुरून डौलाने, ठामपणे आजही उभा आहे. तुकारामांनी बहूजनाला प्रेमभक्तीत एकवटलेले तत्वज्ञान दिले. नामस्मरणाची उपासना शिकविली आणि प्रपंच करतांनाच परमार्थ कसा साधावा याची साक्ष पटवून दिली. त्यामुळे भागवत मंदिराचा कळस अधिकच दृढमूल झाला. संत तुकाराम जसे भक्तिसागरात तरून निघाले त्याचप्रमाणे त्यांनी इतरांना तरण्याचे कार्य केले. केवळ मानवांविषयीच नव्हे तर  समस्त प्राणीमात्रांविषयी त्यांच्या ठिकाणी करूणा होती. त्यामुळेच सन्मार्ग सोडून कुमार्गात लागणा-या, आपले हित न जाणणा-या अज्ञ जनांना ते मोठ्या कळवळ्याने उपदेश करतात. 

“नका धरू कोणी । राग वचनाचा मनी।।

येथे बहूतांचे हित । शुद्ध करोनि राखा चित्त ।।

नाही केली निंदा । आम्ही दूषिलेंसे भेदा।।

तुका म्हणे मज । येणे विण काय काज”3

यात त्यांचा स्वतःचा कोणताच स्वार्थ नाही. त्यांचे स्वतःचे कोणतेच कार्य त्यांना साधायचे नाही तर समस्त जगाला नीतीची शिकवण द्यावी याची तळमळ तुकारामांना लागलेली आहे. परंतु हा उपदेश करतांना ज्याचा जसा अधिकार आहे. त्याप्रमाणेच तो करायला पाहिजे याचाही ते कटाक्ष पाळतात. उपदेशच काय कुठलीही गोष्ट अधिकारानुरूपच प्राप्त होत असते. भारतीय तत्वचिंतकाच्या, तसेच सर्व संतांच्या विचारसरणीचा हा विशेष आहे.  

अधिकार तैसा करू उपदेश । साहे ओझे त्यास तेची द्यावे ।

मुंगीवर भार गजाचे पालाण । घालितां ते कोण कार्यसिद्धि ।

तुका म्हणे फांसे वाघुरा कु-हाडी । प्रसंगी तों काढी पारधी तो ।

 अधिकार न  पाहता केलेला उपदेश निरर्थक ठरणारा असतो. त्यामुळे त्याचे उत्थान होण्याऐवजी सर्वनाशच संभवतो. यामुळे उपदेश करणारा व उपदेश  घेणारा यादोघांचेही श्रम वाया जातात.

संत तुकारामांनी आपल्या जन्मघेण्यामागील काय उद्देश होता हे जसे सागीतले तसेच त्यांनी आपले कर्तव्य देखिल कथन केले आहे. 

“ आम्ही वैकुंठवासी । आलो याच कारणासी ।

बोलिले जे ऋषी । भावे साच वर्ताया ।।

ऋषीमुनींनी जो धर्म सांगीतला, जी नीती सांगीतली आणि जो आचार सांगीतला त्यातील यथार्थ भाव जाणून त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी आम्ही या मृत्यूलोकात आलो आहोत. याची जाणीव ते करून देतात. ईतकी स्पष्ट भूमिका ते घेतात. ज्याप्रमाणे संत तुकाराम आपल्या आचरणाचा आदर्श समाजापुढे ठेवतात त्याचप्रमाणे ते वाणीने मार्गदर्शन करतात. अशा उक्ती आणि कृतीचा संगम त्यांच्या व्यक्तित्वात आढऴतो. त्यांनी संसारसागरात बुडणा-या लोकांना, मोठ्या कळवळ्याने सावध करून उद्धराचा सुलभ भक्तिमार्ग दाखविला. प्रसंगी कठोर वाणीने लोकांना कुमार्गापासून दूर केले, दूर्जनांना अपमानित केले  परंतु हे सर्व त्यांच्यावरील प्रेमापोटी केले. त्यांचे हित साधणे हाच यामागे तुकारामांचा हेतू होता. त्यासाठी भक्तीचा डांगोरा पिटून लहान, थोर, नारी-नर यासर्वांनाच आवाहन केले. ‘  फुकाचे ते लुटा सार । व्हावे अमर सदैव ।। असे सांगून भवसागरात बुडणा-यांसाठी नामाचे तारू सज्ज केले. त्यामुळेच आज चारशे वर्षानंतरही त्यांच्या कवितेचे अभंगत्व टिकून आहे. इतकेच  नव्हे तर तुकारामांची कवीता मराठी माणसाच्या अंतःकरणात घर करून बसली आहे हे त्यांच्या अभंगवाणीचे सर्वात मोठे  सामर्थ्य आहे.

संत तुकारामांनी जी अभंगरचना केली ती जाणीवपूर्वक केली नाही. तर तो त्यांच्या भक्तीचा अविष्कार होता. परमेश्वराविषयी असणा-या दृढनिष्ठेतून त्यांची प्रतिभा फुलत गेली. त्या प्रतिभेच्या बळावर त्यांची बहूविध स्वरूपाची अभंगरचना आकारास आली. साधकावस्थेपासून सिद्धावस्थेपर्यंत पोहोचलेल्या संत तुकारामांसारख्या प्रतिभावंत कवीच्या श्रद्धांचा आणि व्यक्तिमत्वाचा सांगोपांग अभ्यास करणे हे जसे मराठी वाङमयसमीक्षेच्या दृष्टीने तसेच वाङमयेतिहासाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्या विचार संताचे संवेदनशीलतामूल्य-

“संतांना समाजातील लोकांविषयी कळवळा होता. समाजातील दुःखी लोक पाहून त्यांचे अंतःकरण दुःखाने भरून जात असे. आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून ते भोळ्याभाबड्या लोकांना दुःखाचे कारण आसक्ती आहे, असे सांगत असत. दुःखाची निवृत्ती व परमसुखाची प्राप्ती करण्यासाठी सदाचार आवश्यक आहे, अशी शिकवण ते समाजाला देत असत. लोकांना सन्मार्ग दाखविणे हेच आपल्या जीवनाचे परम कर्तव्य आहे, असे ते सांगत. आपल्या जन्माचे ध्येय काय, या जगामध्ये येण्याचे कारण काय, याबद्दल ते सांगतात लोककल्याण व लोकांना सन्मार्ग दाखविणे हेच जीवनाचे ध्येय आहे. या संसारातील जीव कसे अज्ञानाच्या, अंधकाराच्या दुःखात बुडून गेलेले आहेत, ते पाहून सहृदयी तुकारामांचे मन हेलावून जाते”5. लोकांना मोलाचा संदेश देताना ते सांगतात - 

“उपकारासाटी बोलो हे उपाय । येणेंविण काय आम्हां चाड ॥१॥

बुडती हे जन न देखवे डोळा । म्हणवुनी कळवळा येतसे॥२॥

तुका म्हणे माझे देखतिल डोळे । भोग देते वेळे येईल कळो”१॥३॥

समारोप-

ज्या मानव समाजामध्ये आपण जन्मलो, त्या समाजाचे आपल्यावर ऋण आहे. त्या समाजाचे आपल्याला काही देणे लागते. त्यामुळेच आपण आपल्या सभोवतालच्या मानवी समाजाविषयी संवेदनशील असले पाहिजे; ते प्रत्येकाचे सामाजिक कर्तव्य आहे. अखंड प्रेमाचा झरा अंतःकरणामध्ये असल्याशिवाय ती संवेदनशीलता प्रकट होऊ शकत नाही. संतांची समाजाविषयी असलेली आंतरिक तळमळ त्यांच्या प्रत्येक उक्ती-कृतीतून दिसून येते. माणुसकीची नवीन परिभाषा त्यांनी समाजाला असंख्य अभंगांच्या माध्यमातून  शिकविली. 

सर्व व्यक्ती माझीच रूपे असल्याने मी त्यांच्यापासून भिन्न नाही, त्यांची सर्व दुःखे माझी आहेत. सभोवतालच्या लोकांमध्येच ईश्वर वास करीत असतो, अशी भावना ठेवून, मानवसेवा हीच ईश्वरसेवा त्यांनी मानली. ‘सेवा’ या नवीन जीवनमूल्याचा परिचय त्यांनी खऱ्या अर्थाने समाजाला करून दिला. कर्मकांडाच्या, भोंदूगिरीच्या, भविष्यकाराच्या, अंधश्रद्धेच्या नादी न लागता खरे संत ओळखून सत्य भक्ती करावी, अशी शिकवण त्यांनी समाजाला दिली. माणुसकी हाच खरा धर्म आहे. त्यामुळे धर्ममार्तंडांनी सांगितलेल्या धर्माच्या व्याख्या, त्यांची व्रतेवैकल्ये, तीर्थाटने, नवस, अंगारे- धुपारे, भगवी वस्त्रे, केश वाढविणे या सर्व बाह्य बाबींना अंतःकरण शुद्ध असल्याशिवाय काहीही अर्थ उरत नाही. अनुभवावीन सर्व काही व्यर्थ आह. आत्मज्ञान हेच सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. त्यामुळे आत्मखूण असल्याशिवाय ईश्वर भेटत नाही, हे तत्त्वज्ञान त्यांनी जगासमोर मांडले. संत साहित्यानेअध्यात्मासोबतच विज्ञानवादी दृष्टिकोन समाजाला पटवून दिला. अवघ्या जगाचे कल्याण व्हावे, हाच विशुद्ध हेतु संताच्या अंतःकरणात आहे. 

 -  डॉ. हरिदास आखरे, श्रीमती कोकीलाबाई गावंडे  महिला महाविद्यालय,दर्यापूर

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक