शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस
2
"लातों के भूत बातों से नहीं मानते...!"; CM योगींच्या वक्तव्यावर ममता बॅर्जी जाम भडकल्या, म्हणाल्या...
3
पतीलाही पत्नीकडून पोटगी मिळू शकते? सर्वांना माहितीये की केवळ पत्नीलाच मिळते, कायद्यात तरतूद...
4
"चंद्रकांत खैरे शिवसेनेचे शंकराचार्य...! कडवट शिवसैनिक कसे झालात?"; राऊतांच्या प्रश्नाला खैरेंनी दिलं असं उत्तर!
5
थेट टीम इंडियात नोकरीची सुवर्णसंधी, कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या
6
“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार
7
"गरज पडेल तेव्हा माझा वापर..."; त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने टॉयलेट पेपरवरच दिला राजीनामा
8
उदय सामंत आणि संदिपान भुमरे अचानक मनोज जरांगेंच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
9
दीड हजारांचा जमाव, टेरेसवरुन दगडफेक; नाशिकमध्ये पोलिसांवर हल्ला, २१ कर्मचारी जखमी
10
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम! बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव, ऑटोसह 'या' सेक्टरमध्ये घसरण
11
जयदीप अहलावतला होती रणबीरच्या 'रामायण'मधील 'या' भूमिकेची ऑफर, दिला नकार कारण...
12
बापरे! गळ्यात चप्पलांचा हार, रखरखत्या उन्हात अनवाणी...; विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची धडपड
13
शरद पवारांनी इतिहास लिहून हवी त्यांची माती करावी; गोपीचंद पडळकरांची टीका
14
मम्मी... मम्मी...! नदीमध्ये रील बनवण्याची 'नशा' जिवावर बेतली, पाय घसरून महिला गंगेत बुडाली; Video Viral
15
"अमित शाह आमचे नेते, सांगायला लाज वाटत नाही"; राऊतांना प्रत्युत्तर देताना भडकले संजय शिरसाट
16
'देऊळ बंद २'ची झाली घोषणा; गश्मीर महाजनी म्हणाला, "मी त्यात नाहीए पण..."
17
कौतुकास्पद! देशातील पहिले डिजिटल शिक्षणाचे ऑनलाईन पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू
18
अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धाचा भडका! ट्रम्प चीनवर लादणार २४५% कर, झटक्यात १००% वाढ
19
बॉबी देओलने खरेदी केली शानदार रेंज रोव्हर SUV, किंमत आहे कोटींच्या घरात, जाणून घ्या
20
“मी त्यांना जास्त महत्त्व देत नाही”; राज-एकनाथ शिंदे भेटीवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले

Feng Shui Tips: घरातले भांडण तंटे मिटावेत म्हणून 'या' फेंग शुई टिप्सचा वापर करा; लाभ होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 07:00 IST

Feng Shui Tips: ज्या वास्तुमध्ये अकारण गृहकलह होत असतील त्या वास्तु मध्ये राहणार्‍या लोकांची प्रगती होत नाही आणि मानसिक स्थिति दुर्बल होते, त्यासाठी या टिप्स!

भारतात जसे वास्तु शास्त्राला महत्त्व आहे तसे चीन, जपान या देशात फेंग शुई शास्त्र प्रभावी मानले जाते. त्याचा प्रचार प्रसार एवढा झाला आहे, की आता भारतीय घरांमध्येदेखील फेंग शुई वस्तु दिसू लागल्या आहेत. जसे की कासव, लाफिंग बुढ्ढा, पिरामिड, मनी प्लांट इत्यादी. या वस्तु घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास मदत करतात. याठिकाणी गृह कलह मिटावेत यासाठी उपाय दिले आहेत. 

वास्तुशास्त्राप्रमाणे फेंगशुईमध्येही घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यावर आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यावर भर देण्यात आली आहे.फेंगशुईमध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत. या गोष्टींचे पालन केल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते. कुटुंबातील कलह घरातील सुख-शांती हिरावून घेतात. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळा येतो. अशा परिस्थितीत फेंगशुईच्या वास्तू नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. याने जीवनातील समस्या सोडवता येतात.

फेंग शुईचे महत्त्वाचे नियम

>>फेंगशुईनुसार घराच्या जवळपासच्या परिसरात स्मशान किंवा एखादी पडीक जमीन नसावी. त्यामुळे नकारात्मक लहरी घरात येतात. नाईलाजाने अशा ठिकाणी घर घ्यावे लागेल तर धार्मिक विधी करून मगच गृहप्रवेश करावा. 

>>घराचा मागचा दरवाजा समोरच्या दरवाजासमोर नसावा. असे मानले जाते की, घरामध्ये प्रवेश करताच जीवन ऊर्जा निघून जाते. तुमच्या घराची रचना अशी असेल तर मधल्या जागी पडदा लावून घ्या किंवा शक्य असल्यास दार बसवून घ्या. 

>>घराच्या मुख्य गेटसमोर कचराकुंडी ठेवू नका. घराच्या आवारात एखाद्या कोपऱ्यात ठेवा परंतु प्रवेशद्वारासमोर ठेवू नका. 

>>फेंगशुईमध्ये, स्वयंपाकघर आणि शौचालय समोरासमोर असणे दोषपूर्ण मानले जाते. एक तर स्वयंपाक घराची जागा बदला किंवा घर लहान असेल तर पडद्याचा वापर करा. 

>>तुमचा बंगला असेल तर वरच्या मजल्यावर जाण्यासाठी घराच्या मध्यभागी पायऱ्या बनवू नका. 

>>घरातील खिडक्यांची दारे घरात नाही तर बाहेरच्या दिशेने उघडणारी असावीत! असे केल्याने घरात जीवन उर्जेचा अधिक प्रवाह होतो. तसेच घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र