शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

शनी अमावस्या कधी आहे आणि त्यादिवशी कोणती मोठी खगोलीय घटना घडणार आहे  जाणून घ्या! 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 12:38 PM

शनी देवाची कृपादृष्टी प्राप्त व्हावी म्हणून सगळेच जण त्यांची पूजा करतात. या दृष्टीने शनी अमावस्या कधी आहे ते जाणून घेऊ. 

शनिवार, ४ डिसेंबर २०२१, शनिदेवाच्या उपासनेसाठी खूप चांगला दिवस आहे. या अमावास्येच्या तिथीला शनि अमावस्या किंवा शनिश्चरी अमावस्या असेही म्हणतात. या अमावस्येला एक मोठी खगोलीय घटनाही घडणार आहे, ते म्हणजे खग्रास सूर्यग्रहण!

खग्रास सूर्यग्रहण २०२१४ डिसेंबर २०२१, शनिवारी सूर्यग्रहण देखील होणार आहे. जे २०२१ सालातील शेवटचे सूर्यग्रहण आहे. हे सूर्यग्रहण महत्त्वाचे मानले जाते. असे मानले जाते की जेव्हा ग्रहण होते तेव्हा त्याचा परिणाम मेष ते मीन राशीच्या लोकांवर होतो. शनि अमावस्येची तिथी शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी सूर्यग्रहणही आहे. शास्त्रानुसार सूर्य आणि शनिमध्ये पिता आणि पुत्राचे नाते आहे. शनीची दृष्टी आणि दशा शुभ मानली जात नाही. जर कुंडलीत शनि अशुभ असेल तर शनि दशेत त्रास देतो. शनीची साडेसाती या कारणास्तव वेदनादायक असल्याचे सांगितले जाते. सध्या मिथुन, तूळ, धनु, मकर आणि कुंभ राशीवर शनीची विशेष दृष्टी आहे. मिथुन आणि तुला राशीत शनीचा प्रभाव आहे आणि धनु, मकर आणि कुंभ राशीत शनीची साडेसाती चालू आहे.

शनिपूजेचे फळ ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला न्यायाची देवता देखील म्हटले आहे. यासोबतच त्यांचे वर्णन कर्म दाता आणि दंडाधिकारी म्हणूनही करण्यात आले आहे. यासोबतच शनिदेवालाही मेहनतीचा कारक मानण्यात आला आहे. ज्योतिषीय गणनेनुसार शनि एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो, शनीची हालचाल अतिशय मंद असल्याचे सांगितले जाते.यामुळेच शनिदेवाला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागतात. शनिदेवाची अवकृपा टाळण्यासाठी शनिवारी शनिदेवाशी संबंधित वस्तूंचे दान करावे. शनि मंदिरात पूजा करून मोहरीचे तेल अर्पण करावे. यासोबतच शनि चालिसाचे पठण करावे.

शनी अमावस्या शुभ मुहूर्तपंचांगानुसार ३ डिसेंबरला दुपारी ४.५६ वाजता अमावस्या सुरू होईल. व ४ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १.१३ मिनिटांनी अमावस्या संपेल. परंतु अमावस्या ही तिथी ४ तारखेचा सूर्योदय पाहणार असल्याने ४ तारखेला अमावस्या गृहीत धरली जाईल. 

शनि अमावस्या आणि सूर्य ग्रहण या दोन्ही गोष्टी एकत्र आल्याने या दिवसाचे औचित्य साधून शक्य तेवढा दानधर्म करून पुण्य पदरात पाडून घेणे श्रेयस्कर ठरेल. शनि अमावस्येला शनि चालीसा आणि शनि मंत्रासोबत शनि आरतीचे पठण करणे शुभ मानले जाते.

टॅग्स :solar eclipseसूर्यग्रहण