- सद्गुरू जग्गी वासुदेवतुमचे बहुतांश व्यक्तिमत्त्व हे तुम्ही अजाणतेपणीच तयार केलेले असते. त्यामधला अगदी छोटासा भाग कदाचित जाणीवपूर्वक तयार केला असू शकतो. जेव्हा तुम्ही तुमचे व्यक्तिमत्त्व निर्माण करता, तेव्हा एकादृष्टीने त्याचा अर्थाने असा होतो की, सृष्टीकर्त्याने तुमची योग्यप्रकारे घडवणूक केली नाहीय. तुम्हाला जर यात सुधारणा करण्याची आवश्यकता वाटत असेल, तर निश्चितपणे तुमच्यानुसार, सृष्टीकर्त्याने तुमची योग्यरीत्या घडवणूक केली नाहीय, तर ही खरोखर भव्य अद्भुत सृष्टी परिपूर्ण नाही असे तुम्हाला का वाटते? हे आपल्या उपजत स्व-संरक्षणाच्या सहज प्रवृत्तीमुळे असे घडते. ही अगदी प्राथमिक, आधारभूत प्रक्रिया प्रत्येक पेशीत उपजत प्रस्थापित आहे. प्रत्येक कृमी-कीटकात, प्रत्येक प्राण्यात ही प्रक्रिया अभिप्रेत आहे. मानवातही आहे; पण अडचण केवळ एवढीच आहे की, स्व-संरक्षणाची ही प्रक्रिया कुठंवर थांबवायची. या प्रक्रियेने स्वत:ला तुमच्या आयुष्याच्या एकूणएक सर्वच क्षेत्रात पसरविले आहे. म्हणून तुम्ही स्वत:चे एक छोटेसे व्यक्तिमत्त्व निर्माण केले आहे, जे सतत तुमचा बचाव करत असते. जपण्याजोगी एकमात्र गोष्ट म्हणजे तुमचे शरीर. तुमच्या व्यक्तिमत्त्वाला स्व-संरक्षणाची गरज नाही. जरी आम्ही त्याला रोज मारबडव केलीत, तरी त्याला कोणतीच इजा होणार नाही; पण व्यक्तिमत्त्वाशिवाय तुम्ही इथे जगू शकत नाही. इथे जगण्यासाठी एक व्यक्तिमत्त्व जोपासणे गरजेचे आहे. बाह्यजगातील व्यवहार करण्यासाठी दैनंदिन कार्ये, आयुष्यातील परिस्थिती, गोष्टी हाताळण्यासाठी वगैरे. जर ते लवचिकता असेल, तर वेगवेगळ््या ठिकाणी, परिस्थितीनुसार तुम्ही योग्य ते व्यक्तिमत्त्व धारण करू शकता, असे असेल तर काहीच हरकत नाही; पण सध्या ते जणू दगडासारखे आहे. जे तुमच्या डोक्यावर एका भल्या मोठ्या ओझ्याप्रमाणे सतत बसलेलं असतं. त्याच्या आवडी-निवडींच्या कक्षेत न बसणाऱ्या सर्व गोष्टींचा तुम्हाला सतत जाच सहन करावा लागतो.
लवचिक व्यक्तिमत्त्व
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 4:41 AM