शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांच्या दौऱ्यातही सत्ताधारी मित्र पक्षांमध्ये रुसवेफुगवे, शिंदेंची नाराजी दूर करण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न
2
Mumbai Megablock: प्रवाशांनो लक्ष द्या... आज मध्य, हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक
3
जगातील सर्वांत मोठी बँक नोट भारतात दाखल, बुरुंडी देशाने जारी केलेली १० हजार फ्रँक मूल्याची नोट
4
'ईव्हीएम हॅक करून निकाल बदलता येतो', तुलसी गबार्ड यांच्या विधानाने राजकारण तापले
5
UPI down: यूपीआयला झाले काय? १८ दिवसांत तिसऱ्यांदा ठप्प; व्यवहार थांबले
6
टॅरिफमुळे जगाला फटका, भारताला फायदा; अमेरिका, चीन बाजारांतील निर्यात भारताकडे येणार
7
विधेयकांबाबत तीन महिन्यांत निर्णयाचे राष्ट्रपतींनाही बंधन; सर्वोच्च न्यायालयाची प्रथमच कालमर्यादा
8
IPL 2025 ...अन् विक्रमी विजयासह 'सूर्योदय' झाला! पंजाबवर ट्रॅविस हेड-अभिषेक जोडी पडली भारी!
9
नागपूरच्या एमएमपी इंडस्ट्रीज कंपनीत स्फोट; ५ ठार, ६ जखमी
10
‘अजंठा कॅटमरॉन’चा परवाना निलंबित; सागरी मंडळाची त्रिसदस्य समिती करणार चौकशी
11
ज्येष्ठांचे संरक्षण हे जिल्हाधिकाऱ्यांचे कर्तव्य, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
12
वरिष्ठ सनदी अधिकारी प्रवीण परदेशी मुख्यमंत्री कार्यालयात मुख्य आर्थिक सल्लागार
13
रायगडावर एकनाथ शिंदेंनी भाषण केले, पण तुमचे नाही झाले, डावलले गेले का? अजित पवार म्हणाले...
14
Abhishek Sharma Record : वादळी शतकी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला KL राहुलचा विक्रम
15
"धिस वन इज फॉर ऑरेंज आर्मी"... नो बॉलवर फ्री हिट मिळते; अभिषेक शर्माला सेंच्युरी मिळाली!
16
तहव्वूर राणाने वकिलाबाबत ठेवली एक मोठी अट; न्यायालयानेही केली मान्य, न्यायाधीश म्हणाले...
17
प्रियांश-प्रभसिमरनसह अय्यरची फटकेबाजी! स्टॉयनिसनं ३०० प्लस स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
18
इम्पॅक्ट टाकण्यासाठी अय्यरनं यशवर डाव खेळला! अभिषेक शर्मा फसलाही, पण नो बॉल पडला अन्...
19
सिंहगडावर आलेल्या परदेशी पर्यटकाला शिवीगाळ करायला लावली; तरुणांच्या टोळक्याच संतापजनक कृत्य
20
एकाच दुचाकीवर चौघांची सवारी, यात्रेहून परतताना भिंतीला धडकली; दोघांचा जागीच मृत्यू

घरात वैभवलक्ष्मी नांदावी यासाठी वास्तू शास्त्रात दिल्यानुसार मिठाचा वापर अवश्य करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 12:41 IST

मीठ समुद्रातून मिळते त्यामुळे त्याला लक्ष्मीचा भाऊ म्हटले जाते. त्याचा वापर केल्याने घरात वैभवलक्ष्मी नांदते असे म्हणतात. त्यासाठी उपाय कोणते, हे जाणून घेऊया.

मीठ हा आपल्या जेवणाचा आणि जिवनाचा अविभाज्य भाग आहे. मीठ जास्त असेल, तर पदार्थ खारट आणि नसेल तर पदार्थ अळणी होतो. म्हणून त्याचे प्रमाण संतुलित असावे लागते. जिवनातही प्रत्येक गोष्टीचा वापर मीठासारखा संतुलित प्रमाणात करावा लागतो. मिठाला केवळ अन्नशास्त्रात नाही, तर वास्तुशास्त्रातही आगळे वेगळे स्थान आहे. मीठाचे साधे सोपे उपाय करून वास्तुदोष दूर करता येतात, असे वास्तुशास्त्रज्ञ सांगतात. मीठ समुद्रातून मिळते त्यामुळे त्याला लक्ष्मीचा भाऊ म्हटले जाते. त्याचा वापर केल्याने घरात वैभवलक्ष्मी नांदते असे म्हणतात. त्यासाठी उपाय कोणते, हे जाणून घेऊया.

मीठाने दूर होते नकारात्मक ऊर्जा:आपल्या अवती भोवती ऊर्जेचे वलय असते. ते वलय सकारात्मक असेल, तर कामाला गती मिळते आणि नकारात्मक असेल, तर कामे खोळंबतात. घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश झाला, तर सतत वाद विवाद, कलह होत राहतात. यासाठी मीठाचा वापर सुचवला आहे. आपल्या घराच्या बाथरूममध्ये छोट्या वाटीत खडे मीठ ठेवावे. घरातील नकारात्मक ऊर्जा मीठ शोषून घेते. तसेच घरातील सर्वांचे आरोग्य चांगले राहते. घरातील दोष दूर होत नाहीत, तोवर हा प्रयोग दर काही काळाने करत राहावा.

मीठ आणि लवंग :मीठ आणि लवंग यांचा एकत्रित वापर वास्तूसाठी अतिशय परिणामकारक ठरतो. एका छोट्या वाटीत नैसर्गिक मीठ आणि चार ते पाच लवंगा एकत्र करून ती वाटी घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात ठेवून द्यावी. या प्रयोगाने घरातील केवळ नकारात्मक ऊर्जा नष्ट होत नाही, तर आर्थिक अडचणीदेखील कमी होऊ लागतात. मीठ आणि लवंग यांच्या मिश्रणाचे पाणी घरात फवारले असता हलका सुगंध दरवळत राहतो.

मीठाच्या पाण्याने आंघोळ :आपल्याला जेव्हा खूपच थकवा येतो, तेव्हा आपण गरम पाण्यात मीठ घालून पाय बुडवून ठेवतो. तसे केल्याने शरीरातील थकवा चुटकीसरशी दूर होतो. हाच प्रयोग आपण आंघोळीच्या वेळेस केला, तर त्याचाही निश्चितच फायदा होऊ शकेल. आठवड्यातून एक दिवस आंघोळीच्या गरम पाण्यात थोडेसे मीठ घालून आंघोळ करून पाहा. शरीराला आलेली मरगळ, मनावर चढलेला आळस दूर होऊन मन आणि शरीर प्रसन्न होईल.

मीठाचे पाणी :घरात विविध कोपऱ्यात मीठ मिसळलेले पाणी ठेवावे. त्यामुळे वास्तुदोष दूर होतात. परंतु, हे पाणी कुठेही सांडणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. तसेच दर आठवड्याला ते पाणी बाथरूममध्ये ओतून नव्याने पाणी ठेवावे.

मीठाने स्वच्छता :मीठ हा स्वच्छता करणारा नैसर्गिक घटक आहे. घरात शोभेसाठी ठेवलेल्या मूर्ती वरचेवर काळवंडत असतील, तर त्या मीठाने धुवून पहा, लख्ख होतील. मूर्तींकडे पाहून आपसुखच सकारात्मक ऊर्जा जाणवेल.

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र