शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
4
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
5
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
6
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
8
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
9
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
10
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
11
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
12
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
13
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
14
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
15
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
16
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
17
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
18
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
19
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
20
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न

गुरूंमुळे जीवनात आनंदाची पौर्णिमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 4:34 PM

गुरूंमुळे आपल्या जीवनात आनंदाची पौर्णिमा साजरी होते.

गुरु पौर्णिमेला प्रपंच व परमार्थ या दोन्ही अंगाने जीवनात फार महत्त्वाचे स्थान आहे. 

चंद्र जसा स्वयं प्रकाशीत नसतो पण सुर्याचा प्रकाश स्वत:च्या अंगावर घेतो व कले कलेने वाढत जाऊन पौर्णिमेला पूर्ण प्रकाशीत होऊन सुर्याचा प्रकाश तो पृथ्वीला देतो.  

अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक माणूस हा आप आपल्या क्षेत्रात गुरूंकडून ज्ञान घेत घेत ते आत्मसात करत करत आपल्या आचरणातून तो इतरांना देत असतो. 

तेंव्हा तो त्या त्या क्षेत्रात परिपूर्ण होतो व ज्ञान रुपाने स्वयंप्रकाशीत होतो आणि गुरुंचे परिपूर्ण ज्ञान पूर्णपणे जसेच्या तसे तो इतरांना देतो तेव्हा होते ती गुरुपौर्णिमा. म्हणजेच गुरूंमुळे आपल्या जीवनात आनंदाची पौर्णिमा साजरी होते.

प्रथम प्रापंचिक अंगाने पाहू.

जन्म व मृत्यू यामधील प्रवास म्हणजे जीवन. हा प्रवास जर आनंदमय, सुखमय, यशस्वी व समृध्द करायचा असेल तर आपल्याला योग्य रस्ता दाखविणारा व त्या मार्गावर चालण्यास शिकविणारा योग्य मार्गदर्शक अर्थात गुरु मिळणे महत्त्वाचे असते.

गुरु दत्तात्रयांनी २४ गुरु केले. सदगुरु श्री वामनराव पै सांगतात की, जगातील प्रत्येक गोष्ट, वृक्ष, पक्षी, प्राणी, व्यक्ती ही आपला गुरु असते कारण ती आपल्याला काहीना काही शिकवितच असते. फक्त ते पहाण्याची व शिकण्याची दृष्टी आपल्याकडे हवी असते. 

आई, बाबा, नवरा, बायको, मुले, घरातली सर्व वडीलधारी मंडळी, आपली भावंडे म्हणजेच आपले कुटूंबिय व नातेवाईक हे संस्कार किंवा शिकवण देत असतात, त्या संस्कारातूनच कळत नकळत आपली जडणघडण होते व ते संस्कार आपल्या आचरणातून इतरांनाही दिसतात. म्हणूनच हे सर्वजण आपले गुरू असतात.

मित्र- मैत्रिणींची संगत व त्याचबरोबरच पुस्तक, टी. व्ही., मोबाईल, इंटरनेट यांचीही लाभलेली संगत आपल्यावर चांगले- वाईट संस्कार करतच असते व त्यातून आपले जीवन घडत व बिघडत असते व हेच संस्कार आपल्या आचरणातून इतरांनाही दिसत असतात म्हणून तेही आपले गुरूच असतात.

शाळा, कॉलेज मधील शिक्षक, नोकरी किंवा व्यवसायात आपले सहकारी, स्पर्धक, अधिकारी, कामगार, ग्राहक इ. आपल्याला काहीतरी शिकवतच असतात म्हणूनच हे सर्वजण खर्‍या अर्थाने आपले गुरूच असतात.

आपल्या कौटुंबिक व व्यावसायिक क्षेत्राबरोबर कला, विद्या, क्रिडा, अभिनय, संगीत, साहित्य, वक्तृत्व, व्यायाम, सामाजिक व राजकीय कार्य इ. अनेक व विविध क्षेत्रात यश संपादन करायचे असेल तर त्या त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तीला गुरु करून त्यांना शरण जाऊन त्यांच्याकडून ते विशेष ज्ञान संपादन करावे लागते नंतर तीच कला किंवा विद्या आपल्यातून जगाला दिसू लागते.

खरतर जगातील प्रत्येक व्यक्ती कडून आपण काहीना काही शिकतच असतो म्हणून ती आपल्याला गुरूस्थानीच असते.उदा.- अगदी दारु पिणारा माणूस सुध्दा आपला गुरु असतो, कारण तो आपल्याला शिकवितो की, या दारुच्या व्यसनापायी माझ्या जीवनाची जी वाताहात झाली, ती तूला जर तुझ्या आयुष्यात करुन घ्यायची नसेल तर दारु पासून दूर रहा.

तसेच जगातील प्रत्येक वृक्ष, वेली, फुले, पाखरे, प्राणी आपल्याला काहीना काही शिकवतच असतात. उदा. मुंगी कडून चिकाटी, सदाफुली कडून सतत आनंद रहाणे, गुलाब कडून परिस्थती कितीही काटेरी असो आपण मात्र इतरांना सुगंधच द्यायचा.

निसर्गाकडूनही आपण सतत शिकतच असतो, त्यातूनच आपले जीवन बहरत व फुलत असते. म्हणूनच आपले जीवन खर्‍या अर्थाने समृद्ध करणार्‍या या सर्व गुरुंच्या चरणाशी मनापासून नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा.

प्रापंचिक जीवनात जसे गुरूचे महत्त्व आहे तसेच पारमार्थिक अंगानेही सदगुरूंचे महत्त्व अनन्य साधारण आहे. म्हणूनच तर सर्व संत सदगुरूंची महती मुक्त कंठाने गायतात.

जाणतेने गुरू भजिजे...

गुरु (गुप्त+रुप) म्हणजेच जे आपल्या आत आहे ते आपले गुप्त रुप.

ज्ञानेश्वर माऊली म्हणतात..सर्व उपाधी माजी गुप्त। चैतन्य असे सर्वगत।

भगवान कृष्ण सांगतात...ईश्वर सर्व भूतानाम। हृदयस्य अर्जुन तिष्ठती 

चैतन्य किंवा ईश्वर म्हणजेच आपले गुप्त रुप अर्थात गुरु. वास्तविक ह्या गुप्त रुपामुळेच आपल्याला जीवन प्रकाश मिळतो.

पण माणूस ' मी अमुक ' या अहंकाराच्या म्हणजेच 'मी पणा'च्या अधिष्ठानावर जीवन जगतो म्हणून आमवस्येचा चंद्र जसा असून ही दिसत नाही व काळोख होतो. त्याचप्रमाणे आपल्या जीवनात दु:खाचा अंधार होतो.

म्हणून या आत्मसुर्याचा प्रकाश आपल्या शरीररुपी चंद्रातून जसाच्या तसा बाहेर पडतो त्यावेळी त्याचा आनंद समाजरूपी विश्वाला मिळायला लागतो.

हा आत्मसुर्याचा, चैतन्याचा म्हणजेच गुप्त रुपाचा प्रकाश कसा मिळवायचा ह्याचे ज्ञान जे देतात, त्यांनाच खरे सदगुरु म्हणतात. 

सदगुरूंनी दिलेले दिव्यज्ञान शिष्य आत्मसात करून आपल्या आचरणातून तो इतरांना देतो तेव्हा त्याचे ठिकाणी ज्ञान रुपाने मिळालेला प्रकाश, चंद्रा सारखा कले कले वाढत जातो व जीवनातील दु:खाचा अंधार कमी कमी होत जातो.

सदगुरुंचे दिव्य ज्ञान घेत घेत, कले कलेने वाढणार्‍या या शिष्याच्या ठिकाणी एक दिवस त्याचे गुप्तरुप प्रगट होऊन परीपूर्ण व स्वयंप्रकाशीत होते, हीच असते जीवनातील सार्थकता म्हणजेच गुरुपौर्णिमा.

ही गुरुपौर्णिमा साजरी करायची असेल तर सदगुरु शिवाय पर्याय नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, 

सदगुरु वाचोनी सापडेना सोय।धरावेते पाय आधी आधी॥

पण कोणालाही सदगुरू करून हा आध्यात्मिक प्रवास पुर्ण करता येत नाही. त्यासाठी सदगुरू ओळखायचे कसे? हेही जाणून घेणे गरजेचे आहे.१) ते निरपेक्ष असतात,२) ते आत्मज्ञानी असतात३) शिष्यांचा उध्दार करण्याची त्यांच्याजवळ तीव्र तळमळ असते.४) लोकांचा उध्दार करण्यासाठी ते सदैव आपला देह चंदनासारखा झिजवितात.५) दिव्यबोध व दिव्यसाधना शिकविण्याचे अतुल सामर्थ्य त्यांच्याजवळ असते.

असे "शाब्दे परेची निष्णात" सदगुरू आपल्याला लाभणे, ही आपली जन्मोजन्मीची पुण्याईच असते.

ज्या मार्गाने गेले असता सुखाचे दर्शन होते ते खरे मार्गदर्शन.                     -- सदगुरू श्री वामनराव पै.

असे सदगुरू गंडे-दोरे, उदी-भस्म, अंगारे-धुपारे देत नाहीत तर प्रपंचाच्या अंगाने शहाणपण व परमार्थाच्या अंगाने दिव्यज्ञान देतात. कर्मकांड नाही तर कर्मचांग करावयास शिकवितात. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, गुरू तेथे ज्ञान। ज्ञानी आत्मदर्शन॥दर्शनी समाधान। आथी जैसे॥

त्यांच्या कृपेने आपला प्रपंच चांग होतो व परमार्थ सांग होतो. सदगुरू माणसातील माणूसपण जागे करून त्याला दिव्यत्वाकडे नेतात. "अधिकार तैसा करू उपदेश" या संतोक्ती प्रमाणे ते शिष्यांची पात्रता पाहून उपदेश करतातच पण त्याची पात्रता वाढविण्याचा प्रयत्नही करतात. 

आपणासारिखे करीती तात्काळ।नाही काळवेळ तयालागी॥लोह परीसाची न साहे उपमा । सदगुरू महिमा अगाधची॥

परीसाच्या संगाने लोहाचे सोने होते पण त्याचा परीस होत नाही. पण सदगुरू शिष्याला आपल्यासारखेच देव पदावर नेतात.

देव पहावया गेलो। तेथे देवची होऊन ठेलो॥

हा प्रवास केवळ सदगुरूंमुळेच शक्य आहे. म्हणून अशा सदगुरूंचे उतराई होणे कधीच शक्य नाही.

काय द्यावे त्याशी व्हावे उतराई। ठेविताई पायी जीव थोडा॥

त्यांनी दिलेले दिव्यज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी साधकाच्या ठिकाणी सदगुरुंप्रती कृतज्ञता व शरणागती हवी असते. हीच कृतज्ञता व्यक्त करण्याची शिकवण देणारा सण म्हणजेच गुरुपौर्णिमा.

खर्‍या अर्थाने हा दिवस म्हणजे गुरु-शिष्यांच्या नात्यातं एकमेकांशी कृतज्ञता प्रगट करणारा "कृतज्ञता दिन" च आहे.

- संतोष तोत्रेजीवन विद्या मिशन

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक