शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

रसिक आणि सुंदर, ही ओळख आहे एप्रिल महिन्यात जन्म घेतलेल्या लोकांची!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 9:34 AM

क्रिडा, प्रसार माध्यमे, जाहिराती, राजकारण या क्षेत्रात त्यांना विशेष गती असते. आपल्याला जे हवे ते हट्टाने मिळवतात. यश त्यांचा सोबती असल्यामुळे ते ज्या क्षेत्रात जातील, त्यात यश संपादित करतात.

तुमचा वाढदिवस एप्रिल महिन्यात आहे? ज्योतिषशास्त्र सांगते, या महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती दिसायला मोहक, आकर्षक, जिद्दी, मेहनती, रसिक आणि हसतमुख असतात. कलांचा आस्वाद घेण्याची कला त्यांना चांगल्याप्रकारे अवगत असते. साहसी खेळात त्यांना विशेष रस असतो. स्वभाव थोडा अतरंगी असतो. घटकेत राग, घटकेत प्रेम. त्यामुळे समोरचा माणूस भांबवतो. तुम्ही कसेही वागलात तरी त्यांनी तुमच्याशी छानच वागावे, अशी तुमची अपेक्षा असते. परंतु, या व्यक्ती रंगात आल्या, की सभेचा आकर्षण बिंदू ठरतात. याचे कारण त्यांचा हजरजबाबीपणा आणि अलौकिक बुद्धीमत्ता!

ज्योतिषशास्त्राकडून रसिक अशी बिरुदावली मिळाली आहे, यावरून त्या लोकांचे प्रणयजीवन किती रंगीत असेल याची कल्पनाच केलेली बरी! सोळाव्या वर्षाचा टप्पा पूर्ण होता होताच यांचे प्रेमसंबंध सुरू होतात. एका वेळेस चार-पाच जणांवर भुरळ घालण्याचे कौशल्य त्यांच्याजवळ असते आणि प्रत्येक प्रकरण ते लीलया सांभाळतात. चोरी पकडली गेली, तरी त्यांच्या भोळ्या चेहऱ्यामुळे त्यांना शंभर गुन्हे माफ केले जातात. त्यांचे वैशिष्ट्य असे, हर तऱ्हेच्या नैतिक अनैतिक गोष्टी करूनही लग्नानंतर वैवाहिक जीवनात ते साळसूदपणाचा एवढा आव आणतात, की भूतकाळात त्यांच्याकडून काही `चूका' घडल्या आहेत, यावर जोडीदाराचाही विश्वास बसत नाही. 

क्रिडा, प्रसार माध्यमे, जाहिराती, राजकारण या क्षेत्रात त्यांना विशेष गती असते. आपल्याला जे हवे ते हट्टाने मिळवतात. यश त्यांचा सोबती असल्यामुळे ते ज्या क्षेत्रात जातील, त्यात यश संपादित करतात.

खर्चाच्या बाबतीत त्यांचा हात सढळ असतो. कोणी त्यांना खर्चावर नियंत्रण करण्याचा सल्ला दिला, तर ती व्यक्ती त्यांच्या शत्रूयादीत जमा होते. त्यांचा राग न परवडणारा असतो. लोक त्यांना बाचकून असतात. परंतु त्यांच्या गोड हास्याकडे पाहता त्यांच्या रागाची कल्पना येणेही कठीण जाते. 

या व्यक्तींनी बोलण्यावर आणि रागावर ताबा मिळवला, तर त्यांची खूप प्रगती होऊ शकेल. आपल्या चुकांचे खापर दुसऱ्यांवर फोडण्यापेक्षा अपयशाची जबाबदारी घ्यायला शिकले पाहिजे. आपल्या रंग-रूपाबद्दल वृथा अभिमान न बाळगता दुसऱ्यांच्या भावनांचाही आदर केला पाहिजे. 

या महिन्यातील अनेक व्यक्तींनी प्रसिद्धीचे शिखर गाठले आहे. मुकेश अंबानी, सचीन तेंडुलकर, पं. रवि शंकर, कपिल शर्मा, राम गोपाल वर्मा, मनोज वाजपेयी, जया बच्चन, अरजित सिंग,  प्रभू देवा, अजय देवगण, इ.

शुभ रंग : नारंगी, सोनेरीशुभ वार : रविवार, बुधवार, शुक्रवारशुभ रत्न : माणिकशुभ अंक : १,४,५,८