शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
3
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
4
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
5
किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?
6
पोलिसांनी काठी मारली, दुचाकीवरील महिला तोल जावून डंपरखाली सापडली, जागीच मृत्यू   
7
बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं!
8
"एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त, आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन; सरकारला विनंती करतो की..."
9
ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..."
10
बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात, सरकारने दिला अलर्ट 
11
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
12
WhatsApp वर चुकूनही असे फोटो डाउनलोड करू नका; तुमचे बँक खाते होईल रिकामे
13
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
14
८ दिवसांपासून शेअर विक्रीसाठी रांग, सातत्यानं लागतंय लोअर सर्किट; गुंतवणूकदारांवर डोक्यावर हात मारण्याची वेळ
15
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
16
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
17
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
18
"माझे सगळे कपडे फेकून दिले आणि...", १८व्या वर्षी उषा नाडकर्णींना आईने काढलेलं घराबाहेर
19
भारी! बालपणीच्या सुंदर आठवणींना नवा साज देणारी 'आई'; खेळण्यांपासून बनवते अप्रतिम फर्निचर
20
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले

Gajanan Maharaj: अन्न हे पूर्णब्रह्म: उष्ट्या पत्रावळीतले अन्न खाऊन गजानन महाराजांनी केला अन्न संस्कार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 11:22 IST

Gajanan Maharaj : आज अन्नाची नासाडी मोठ्या प्रमाणात होत आहे, गजानन महाराजांनी उष्ट्या पत्रावळीतले अन्न खाऊन त्याची किंमत करा ही शिकवण दिली, त्याबद्दल...!

>> सर्वेश फडणवीस 

वऱ्हाडातल्या खामगाव तालुक्यातील शेगाव हे एक गाव. आता शेगाव ही तालुका ठिकाण आहे. गाव लहान पण त्याचे भाग्य महान म्हणून या गावात श्रीगजानन महाराज प्रगट झाले.  आज माघ वद्य सप्तमी, अर्थात श्री गजानन महाराजांचा प्रगट दिवस. महाराज फार उच्च पदाला पोहोचलेले विदर्भातील प्रमुख संत होते. 

खरंतर गजानन महाराज म्हणजे विलक्षण कृपामुर्तीचे धनी आहे. आज त्यांच्या प्रगट दिवसाला अनेक जण घरोघरी श्री गजानन विजय ग्रंथाचे वाचन करतील. प्रसंगी महाप्रसाद होईल. झुणका, भाकर, कांदा म्हणजे महाराजांचे अत्यंत आवडते पदार्थ आहेत. आज  महाप्रसाद ग्रहण करताना अन्नाची नासाडी होणार नाही हा संकल्प घ्यायला हवा आहे. श्री गजानन महाराजांच्या जीवन चरित्रात पहिलाच विचार अन्न आणि अन्नाचं महत्व यावरून सिद्ध होतो,

श्रीगजानन विजय ग्रंथात दासगणू महाराज लिहितात ,ती समर्थाची स्वारी । बैसोनिया रस्त्यावरी ।।शोधन पत्रावळींचे करी । केवळ निजलीलेने ।।शीत पडल्या दृष्टिप्रत । ते मुखी उचलुनी घालीत ।।हे करण्या हाच हेत । 'अन्नपरब्रह्म' कळवावया ।।

महाराज पत्रावळीवरची शित उचलून मुखी घालत होते.आपल्याला या वरून अन्नाचं महत्व समजून येते. आम्ही पोथीचे पारायण करतोच पण आज त्या परायणाच्या माध्यमातून महाराजांचा एक विचार आचरण्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात यशस्वी होऊया. आज माणसं कुठेही आणि कुणाकडेही जेवायला-खायला गेली,की तिथल्या अन्नपदार्थांबद्दल बोलत असतात.पण आज या प्रगट दिवशी श्री महाराजांचे स्मरण करून पाळाव , की मी अन्नाची निंदा करणार नाही आणि हेळसांड ही करणार नाही. अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्रीगजानन महाराज यांच्या प्रसंगी लहान लहान कृती आपल्याला खूप काही शिकवत आहेत. "सर्वे भवन्तु सुखिनः" "शिवभावें जीवसेवा" या व्रतांचा अंगीकार करून श्रीमहाराज आम्हा सर्वांना ते आचरणात आणण्यासाठी  सुख,शांती, समृद्धी व निरामय आरोग्य प्रदान करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. 

आम्हा वैदर्भीय भक्तांचे हक्काचे श्रद्धा आणि विश्रांती स्थान आहे. मंगलकार्य असो, प्रसंगी कुठलीही आनंदाची बातमी असो आम्ही विदर्भातील मंडळी शेगावच्या गजानन महाराजांना कधी जाऊन सांगतो इतकी दर्शनाची आतुरता आमच्या प्रत्येकाच्या देहबोलीत महाराजांच्या प्रति कायमच जाणवते. शनिवार-रविवार आणि लागून सुट्या आल्या की सहज गाडी वळते ती थेट शेगावलाच. प्रसंगी संकल्प, अनुष्ठान त्याची सांगता हे ही सारे मनात असतेच. स्वच्छता, सुंदर रमणीय परिसर आणि शांतता ह्या साऱ्या गोष्टींसाठी शेगाव आज विश्वपटलावर स्थान मिळवण्यासाठी अग्रेसर आहेच. आज संपूर्ण महाराष्ट्र प्रसंगी देश-विदेशातील मंडळी सुद्धा महाराजांच्या दर्शनासाठी येतात आणि मनःशांतीची, अनुभवांची शिदोरी घेत माघारी परतण्याचा प्रवास करतात. संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या अवताराविषयी दासगणू महाराज गजानन विजय ग्रंथात लिहितात,

ऐन तरुण्याभीतरी । गजानन आले शेगावनगरी ।शके अठराशेभीतरी । माघ वद्य सप्तमीला ।।

आजच्या दिवशी शेगाव येथे लाखो भाविकांचा मेळा जमलेला असतो, पण श्री महाराज आपल्या अवतीभवती,आपल्या प्रत्येक कृतीतून आपल्यासोबत आहे हाच भाव निरंतर ठेवत सकारात्मक वाटचाल करूया आणि अन्नाची हेळसांड होणार नाही हाच संकल्प प्रगट करूया..

जय गजानन !!

टॅग्स :Gajanan Maharajगजानन महाराजfoodअन्नShegaonशेगाव